
नांदेड :
हैदराबादच्या कुटुंबाला नांदेडमध्ये 23 जुलै रोजी मारहाण.
मारहाणीचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाईंदरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी भाईंदरच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या बाहेर रमी पत्त्यांचा डाव मांडला. कार्यकर्त्यांनी पत्ते खेळून राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन अप्पर तहशीदार शाम गौड यांना दिले आहे.
हवामान खात्याचा नंदुरबार जिल्ह्याला येलो अलर्ट
नंदुरबार शहरात रिमझिम पावसाला सुरुवात
पुढील तीन ते चार तासात नंदुरबार जिल्ह्यात विजांचा कडकडाटा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
ताशी 30 ते 40 किलोमीटर वारे वाहणार असल्याची माहिती
नागरिकांनी सतर्क राहण्याचा जिल्हा प्रशासनाचा आवाहन
राज्याचे कृषिमंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबारमध्ये दाखल
नंदुरबार शहरातील कार्यकर्त्यांचा घरी दिली भेट....
माणिकराव कोकाटे आज नंदुरबारमध्ये मुक्कामी....
- उद्या शनिवारी कोकाटे समर्थक करणार शक्तीप्रदर्शन
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघात सिन्नरमध्ये होणार शक्ती प्रदर्शन
- माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल खोटी बदनामी करून लोकांमध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांचा निषेध करण्यासाठी कोकाटे समर्थक येणार एकत्र
- उद्या सकाळी दहा वाजता कोकाटे समर्थक सिन्नरच्या बसस्थानकावर एकवटणार
मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या १५१ अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे. १९ जूनपासून नियमितपणे ही कारवाई सुरू असून त्यात शीळ येथील एम के कम्पाऊंडमधील २१ इमारतींच्या पाडकमांचाही समावेश आहे. या १५१ अनधिकृत बांधकामांपैकी ११७ बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत. तर, ३४ बांधकामांमधील वाढीव बांधकाम हटवण्यात आले आहे.
खोपोलीजवळ बोरघाटात मुंबई लेनवर दरड
० मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प
० दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू
सेवानिवृत महिला कर्मचाऱ्याच्या बिलासाठी पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्याला शिवसेनेचा दणका..
सेवानिवृत्त महिला कर्मचारीचे मुलीला शिवीगाळ करत केले गैरवर्तन ..
शिवसैनिकांनी दिला कर्मचाऱ्याला चांगलाच चोप ..
मेडिकल बिलासाठी मागत होता 25 हजार रुपये ..
- नागपूर विमानतळाकडे जाताना एक गाडीचा टायर फुटल्याने अपघात
- नागपूर वर्धा महामार्गावरून विमानतळाच्या दिशेने जाणारी ग्रँड डीव्हायडरवर चढली
- विमानतळापासून अगदी काही अंतरावर हा अपघात झालाय.....
- सदरील गाडीचा समोरचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज..
- सुदैवाने या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नाही...
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस
मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील राधानगरी धरण 99 टक्के भरले
मध्यरात्री राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता
नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
- त्र्यंबकेश्वर मंदिरात पेड व्हीआयपी दर्शन पासच्या नावाखाली काळाबाजार
- मंदिरात ऑनलाइन व्हीआयपी दर्शन पासच्या नावाखाली घोटाळा
- २०० रुपयांचा पेड व्हीआयपी दर्शन पासची काळयाबाजारात थेट १००० रुपयांना विक्री
- ऑनलाइन पासचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांना अटक
मराठी चित्रपटांना स्क्रीन न दिल्याबद्दल तसेच नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होताच एका आठवड्यात चित्रपट गृहातून काढल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेकडून आंदोलन
चित्रपटगृह व्यवस्थापनाला निवेदन देण्यात येणार, परिस्थिती न सुधारल्यास मोठ आंदोलन करण्याचा दिला इशारा
शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार आणि विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या उपस्थितीत आंदोलन
- जागेचा वाद मिटविण्यासाठी 30 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला चंद्रपूर मधून नागपुरातील तहसील पोलिसांनी अटक केली.....
- रमेश गायकवाड अस आरोपीचे नाव असून तो रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे...तहसील परिसरात एका धाब्याच्या जागेवरून वाद सुरू होता... तो वाद मिटवायचा असेल तर 30 लाख रुपये देण्याची मागणी आरोपीने केली सोबतच धमकी सुद्धा दिली....
- याची तक्रार फिर्यादीने पोलिसांकडे केली असता पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला....आरोपी हा चंद्रपूर मध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. महत्वाचं म्हणजे या आरोपीवर हत्ते चा गुन्हा सुद्धा दाखल आहे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडॉर बाबतचा आराखडा आज शासनाने नागरिकांना दाखवला आहे. यामध्ये मंदिर परिसरातील 68 हजार चौरस मीटर इतक्या भव्य जागेवर काशी आणि उज्जैनच्या धरतीवर कॉरिडॉर होईल. यामध्ये प्रत्यक्षात 48 हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन होणार आहे. यासाठी बाधित नागरिकांशी प्रशासनाने चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यामध्ये नागरिकांनी भूसंपादनाला थेट विरोध दर्शवला आहे. असे जरी असले तरी नागरिकांशी चर्चेतून मार्ग काढण्याचा विश्वास प्रशासन व्यक्त करते आहे. तर ऑगस्ट महिन्यात कॉरिडॉर बाबत प्रत्यक्ष गॅझेट नोटिफिकेशन निघणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
मी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर कोणतेही शासकीय पद घेणार नाही असे वक्तव्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केले..आज ते त्यांच्या दर्यापूर तालुक्यातील मूळगाव असलेल्या दारापूर याठिकाणी गेले तेव्हा त्यांचा पारिवारिक सत्कार सोहळा गावकऱ्यांनी आयोजीत केला होता तेव्हा त्यांनी हे विधान केले...
भूषण गवई पुढे म्हणाले की, एकामानाने राहणाऱ्या गावाच प्रतीक म्हणजे हे दारापूर आहे... आणि मी ठरवलं आहे की रिटायर नंतर कुठलंही शासकीय पोष्ट स्वीकारनार नाही... जास्तीत जास्त वेळ मी दारापूर आणि अमरावती, नागपूर मध्ये घालवणार असंही सरन्यायाधीश म्हणाले...
- ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे गोकुळ साखर कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन
- सोलापुरात ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक
- अक्कलकोट गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बील दिले नसल्याने शेतकऱ्यांचे चिमणीवर चढत आंदोलन
- चालू आणि मागील वर्षीचे बील तटल्याने शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
- जोपर्यंत उसाचे बिल अदा करणार नाही तोपर्यंत खाली न उतरण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
- कुरनूर भागातील आकाश मोरे, अमर बिराजदार, विकास कदम, खंडू कदम असे अनेक शेतकरी आंदोलनात सहभागी
सरसकट अवैध धंदे बंद करा, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
पुणे शहरातील अनधिकृत स्पा सेंटर, अवैध धंदे, मकोका मधील आरोपी यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्याचा सूचना
गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी जुनी पद्धत सोडा आणि नवीन उपाययोजना राबवा, आयुक्त यांचे आदेश
पुण्याच्या कोंढव्यातील संवदेशानील गुन्ह्याचा तपास कौशलयपूर्ण केल्यामुळे आयुक्तांकडून कौतुक
आगामी काळ हा सणासुदीचा असल्यामुळे शहरात चोख बंदोबस्त ठेवा, अमितेश कुमार यांचा अधिकाऱ्यांना सूचना
मंत्री माणिकराव कोकाटे आज जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील अजित पवार यांच्या वाढ दिवसानिमित्ताने आयोजित तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहणार होते. मात्र आयत्या वेळी कोणतेही कारण न देता ते जळगाव जिल्हा दौरा रद्द करून,नंदुरबारकडे रवाना झाल्याने,कार्यकर्त्यांचा आणि आयोजकांचा मात्र हिरमोड झाल्याचं पाहायला मिळाले आहे.माणिकराव कोकाटे यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती आयोजक सुनील पाटील यांनी दिली आहे.
दहिसर टोलनाका परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत, पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
मात्र महानगरपालिकेचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे संतप्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यातील खड्ड्यात आज मासे पकडण्याचे आंदोलन केले.
खड्ड्यांमध्ये मासे पकडण्यासाठी लागणारे जाळे टाकून त्यातून गाजर, लॉलीपॉप, केळी अशा वस्तू 'पकडून' पालिकेचा विरोध नोंदविला
मुंबईसारख्या महानगरात अजूनही रस्त्यांची ही दुर्दशा असणे ही शरमेची बाब आहे," असे मनसे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
पालघर जिल्ह्यात उद्या पावसाचा रेड अलर्ट . जिल्ह्यातील अंगणवाडी , शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर . मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे जिल्हा प्रशासनाची खबरदारी . जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांच्या आदेश . जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता . पालघर जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज तर उद्या रेड अलर्ट . जिल्ह्यातील काही भागात आज पावसाची संततधार सुरू.
- कृषीमंत्री माणिकराव कोकटेंच्या दौऱ्यात पुन्हा बदल
- जळगाव जिल्ह्यातील चोपड्याचा कार्यक्रम रद्द करून कोकाटे नंदुरबारच्या दिशेने रवाना
- माणिकराव कोकाटेंचा चोपड्याचा कार्यक्रम परवा होणार
- उद्या दिवसभर माणिकराव कोकाटे नंदुरबारमध्ये असणार
- कोकाटे यांच्याकडे सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही आहे जबाबदारी
- आज धुळ्यामध्ये कोकाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस ( SP ) आणि ठाकरे गटाकडून करण्यात आला जोरदार विरोध
- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या मंदिराला गळती
- पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे मंदिराची दुरावस्था
- देवस्थान आणि विश्वस्तांकडून पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा
- पुरातत्व विभागाकडून मात्र पाठपुरावा करूनही मंदिर दुरुस्ती नाहीच
- त्र्यंबकेश्वर मंदिराचा गाभारा आणि सभामंडपात मोठ्या प्रमाणात गळती
- सभा मंडपात होणाऱ्या गळतीमुळे भाविकांची गैरसोय
- तर गाभाऱ्यात होणाऱ्या गळतीमुळे मंदिरालाही धोका
- चोल आणि नागरी शैलीतील या मंदिराचा 1754 साली माधवराव पेशवे यांनी केला होता जीर्णोद्धार
नाशिक -
- गेल्या तीन ते साडेतीन तासांपासून सुरु असलेला रस्तारोको आंदोलन स्थगित...
- आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते विस्थापित गाळेधारकांचे रस्ता रोको आंदोलन...
- गळ्यांचे ई लिलाव वर तोडगा काढण्यासाठी पंधरा दिवसाची मागितली अधिकाऱ्यांनी मुदत...
- पंधरा दिवसात निर्णय न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा...
बुलडाणा -
शाळेतील रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांनी चक्क जिल्हा परिषद सीईओंच्या दालनाबाहेर भरवली शाळा...
शिक्षक मिळण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकरी आक्रमक...
नागपूर -
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘कॅरी ऑन’ची मागणी करत विविध राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनांचे आंदोलन
- कुलगुरू डॉ सुभाष कोंडावार यांनी विद्यार्थी संघटनानी भेटून विद्यार्थ्यांचे मुद्दे सांगितलं.. तसेच निवेदन देत मागणी केली..
- अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी विद्यापीठाने २०२४-२५ सत्रात अतिरिक्त संधी देण्याचे परिपत्रक तत्काळ काढावे, अशी मागणी करण्यात आली.
- मागीलवर्षी असेच परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र, यावर्षी अद्याप कोणतीही अधिसूचना नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचा विद्यार्थी संघटनाकडून मागणी होत आहेय...
- विद्यापीठ प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. तसे
दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट
वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई होण्याची शक्यता
पुणे -
विजय घाडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सर्किट हाऊसला होणार भेट
काही वेळात के इ एम हॉस्पिटल मधून ॲम्बुलन्सने विजय घाडगे यांना सर्किट हाऊसला घेऊन जाणार
अजित पवार सर्किट हाऊस येथे पोहचले आहेत.
जल जीवन मिशन अंतर्गत काम करण्यात येत असलेल्या बिलाची रक्कम थकीत असल्याने निराश झालेल्या हर्षल पाटील या तरुण कॉन्ट्रॅक्टदार युवकांने आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टदार संघटनेने काळी फित लावून सरकारचा निषेध केला.हर्षल पाटील सारख्या युवकाने आत्महत्या केली तशी वेळ आमच्यावर आणू नका. त्यामुळे प्रलंबित बिले देण्यात यावी अशी मागणी संघटनेने यावेळी केली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाचे स्वयंचलित 19 दरवाजे उघडले गेले असून असून धरणातून
20995 क्युसेस ने पाण्याचा विसर्ग
तानसा नदीत पत्रात केला जात आहे.
धरणाला एकूण स्वयंचलित 38 दरवाजे असून त्यापैकी 19 दरवाजे उघडले गेले आहेत.
शहापूर मध्ये रात्रीपासून संतधर पाऊस चालू आहे.
पावसाचा जोर असाच राहिला तर अजून दरवाजे उघडले जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘कॅरी ऑन’ची मागणी करत विविध राजकीय पक्षांचा विद्यार्थी ससंघटनांनी आंदोलन सुरू केले...
- प्र. कुलगुरू डॉ सुभाष कोंडावार यांनी विद्यार्थी संघटनानी भेटून विद्यार्थ्यांचे मुद्दे सांगितलं.. तसेच निवेदन देत मागणी केली..
- अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी विद्यापीठाने २०२४-२५ सत्रात अतिरिक्त संधी देण्याचे परिपत्रक तत्काळ काढावे, अशी मागणी करण्यात आली.
- मागीलवर्षी असेच परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र, यावर्षी अद्याप कोणतीही अधिसूचना नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचा विद्यार्थी संघटनाकडून मागणी होत आहेय...
- विद्यापीठ प्रशासनाने यावर तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. तसेच इथंच बसून राहू असा इशाराही दिला..
कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील नांदणीतल्या स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक मट्टाचार्य संस्थान मठाचा "महादेवी" नावाची हत्तीण गुजरातच्या वनतारा हत्ती केंद्रात नेला जाणार आहे. ही हत्तीण गुजरातला नेऊ नये यासाठी नांदणी पंचक्रोशीतील नागरिकांनी हत्तीण बचाव कृती समितीच्या माध्यमातून तीव्र विरोध सुरू केलाय. या विरोधाचा भाग म्हणून आज पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी एकत्र येत नांदणी परिसरातून विराट मूक मोर्चा काढला. माजी खासदार राजू शेट्टी यांची देखील मूक मोर्चाला उपस्थिती होती. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हत्तीणीला येऊ देणार नाही अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. नांदणी येथील मठाला बाराशे वर्षाचा इतिहास आहे.
अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्याचा नागरिक,पर्यटक, विद्यार्थी,रुग्णांना त्रास होत आहे, रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत व लवकरात लवकर सदर रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रीटीकरण करावे या मागणीसाठी दिघोडे गावातील संतप्त नागरिकांनी चक्क दिघोडे फाट्यावरील चिखलात रुतलेल्या खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केले.
मुंबई आग्रा महामार्गावरील बाबळे फाट्यावर ठाकरे गटाचे शिवसेनेने कृषी मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली ..
यावेळी कृषिमंत्री कोकाटे यांची गाडी कार्यक्रम स्थळी पोहोचत असताना अडवण्याचा प्रयत्न..
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात..
दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा
आदिवासी विद्यार्थी साखळी उपोषणाला बसले असताना सरकार दखल घेत नसल्याने रस्ता रोको सुरू
दहा दिवसापासून हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आदिवासी विद्यार्थ्यांचे सुरू आहे आंदोलन
महाड तालुक्यातील नडगावमध्ये घराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.
आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
कविता घुरुप असे घर मालकाचे नाव आहे.
हे घर रस्त्या शेजारी उंच भागी असून घरातील स्वयंपाक घराच्या एक बाजूची भिंत दगडी जोत्यासह कोसळली आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
मोबाईल लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रिपेरिंगच्या नावाखाली दुकान थाटले .या दुकानात परदेशातून एकादशी रित्या भारतात एक्साईज ड्युटी चुकवून भारतात आणलेल्या महागड्या दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका दारू तस्कराला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याणच्या भरारी पथकाने बेडा ठोकल्यात.कमलेश दहराम असे या आरोपीचे नाव आहे . कमलेश कधीपासून हा व्यवसाय करत होता याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक करत आहे .
खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी उत्तर दिल आहे,
राज्यात महायुतीचे सरकार आणि महायुतीचे सर्व मंत्री उत्तम काम करत आहेत त्यात दुमत नाही,
संजय राऊत काहीही बोलतात काहीही म्हणतात असे सांगत राज्यात मंत्रिमंडळात बदल झाला तर संतोष बांगर यांना मंत्रिपद मिळणार असे देखील बांगर म्हणाले आहेत
दरम्यान संतोष बांगर यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा मंत्रीपदाची मागणी केल्याचं पाहायला मिळालं.
भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाने आज रेड अलर्ट दिला आहे
त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
तर काल सायंकाळ पासून सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली.
जिल्ह्यातील सातही तालुक्यात कुठं हलका तर, कुठं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर पावसाचे रिपरिप सुरू झाली आहे
रायगडच्या खालापूर तालुका आणि परिसराला जोरदार पवसाने झोडपले आहे.
रात्री पासून या बरसणाऱ्या या पावसामुळे पाताळगंगा नदी दुथडी भरून वहात असून खोपोलीतील सखल भागात पाणी साचले आहे.
खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी परिस्थिती पाहून शाळा व्यवस्थानाला सुट्टीबाबत निर्णय घेण्याच्या सुचना दिल्या आहेत त्या प्रमाणे खालापुर तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या खालापूर तालूका शिक्षण प्रसारक मंडळाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान खालापुरमध्ये कोणतेही रस्ते, पुल बंद झाले नसलेतरी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील ओणी - पाचल यारस्त्यावर एसटी बस आणि दुधाची वाहतूक करणारा टेम्पो यांच्यात अपघात झाला.
अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी झाले.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ट्रक चालक आणि क्लिनर यांना काही जास्त प्रमाणात दुखापत झाली असून रायपाटण त्यांच्यावरती ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
चालकाने वेगावरचे नियंत्रण गमावले आणि अपघात झाल्याचं एसटीतील प्रवाशांचे म्हणणं आहे.
पुण्यात गाड्यांची तोडफोड सुरूच
फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड
शिवशक्ती चौक आरु विहार सोसायटी येथील पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून तोडफोड दहशत
काही गुंडांनी हैदोस घातला गेले 6 महिन्यातील 2 वेळा हा प्रकार झाला
अमरावती -
अमरावती जिल्ह्यातील पारडी येथील रेल्वे भुयारी मार्गात आढळला आठ फुटाचा अजगर
सर्प मित्र आकाश गायधने व चेतन माकडे यांनी त्या अजगराला रेस्क्यू करून सोडले जंगलात
याच रेल्वे भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्याने लोकांना तो अजगर दिसला नाही मात्र रात्रीच्या वेळी अजगर बाहेर आल्याने पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
सोलापूर -
- बार्शी शहरात जागेच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालंय
- पोलिसांसमोरच दोन गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले
- बार्शीतील पांडे चौक येथे एका जागेच्या वादातून हा राडा झालाय
- जागेच्या मालकांनी धोकादायक इमारत पाडल्यामुळे ताबा असलेल्या भाडेकरू आणि जागा मालक यांच्यात हा राडा झाला
- मागील 60 ते 70 वर्षांपासून या जागेत भाडेकरू व्यवसाय करत होते मात्र ही इमारत धोकादायक झाल्याने पाडण्यात आली
- पोलीस बंदोबस्तात हो पूर्ण इमारत पाडण्यात आली
- त्यामुळे जागेचे मालक आणि भाडेकरू यांच्यात ही वादावादी झाली
पुणे -
- चाकण औद्योगिक क्षेत्रात मुसळधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी
- पुणे- नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर महामार्गावर वाहतूक कोंडी,
- वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा
- पावसात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीसांची कसरत सुरु
- प्रवाशांसह कामगारांचे वाहतूक कोंडीमुळे हाल
या चक्काजाम आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांच्यासह 18 कार्यकर्त्यांवर अमरावतीमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.....
अमरावतीनागपूर महामार्ग रोखल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोडी निर्माण झाली होती आणि त्यामुळे गुन्हे दाखल झाले आहे.
आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसून आंदोलन करू असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.
- प्रसिद्धी माध्यमांशी न बोलताच माणिकराव कोकाटे धुळ्याच्या दिशेने रवाना
- पुढील दोन ते तीन दिवस माणिकराव कोकाटे खान्देशच्या दौऱ्यावर
- राज्य सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या तीर्थदर्शन योजनेचे 1 कोटी 86 लाख शासनाकडे थकीत...
- थकीत निधी न मिळाल्याने आयआरसीटीसी कडून आगामी यात्रा स्थगित....
- राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे 2024-25 या वर्षात 25 यात्रा आयआरसीटीसीने आयोजित केल्या होत्या, या यात्रेसाठी 1 कोटी 86 लाख 47 हजार 875 रुपयाचा खर्च झाला...
- तो निधी अद्याप शासनाकडून मिळाला नाही.
- नागपुरातून 27 जुलैला बाराशे यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठीरवांना होणार होते. त्यासाठी शासनाकडून कुठलीही परवानगी न मिळाल्याने बाराशे यात्रेकरूंची अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली.
- गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट तर नागपूर, वर्धा, अमरावती मध्ये ऑरेंज अलर्ट
- पुढील 24 तासात विदर्भात मुसळधार पावसाचा अलर्ट
- नागरिकांना प्रशासनाच्या सतर्कतेच्या सूचना...
जळगाव जिल्ह्यात लंम्पी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार वाढतच चालल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये गुरांवर लंबे आजार होताना दिसून येत आहे
अनेक गुरांना लंबीची लागण झाल्याचे दिसून येतात जिल्हा प्रशासनाच्या वतीने तात्काळ लसीकरणास सुरुवात करण्यात आली असली तरी या लांबी आजारामुळे एका गुराचा मृत्यू देखील झाला असून मोठ्या प्रमाणात गुरांना याची लागण झाली आहे.
यात एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील २८ गावांमध्ये आढळून आल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी केले
धरणं खोऱ्यातील दुर्गम भाग असलेल्या घेवंडे, गेळगणी, निवी आणि परिसरातील वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थी आणि धरणग्रस्त रहिवाशांची सोय व्हावी यासाठी धरणात बोटं सेवा सुरू
पावसाळ्यात दळणवळणांच्या साधनांअभावी गुंजवणी धरण खोऱ्यातील डोंगर माथ्यांवरील वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते तसेच धरणग्रस्त नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने बोटं सेवा सुरू
धरण भागात बारमाही रस्ता नसल्याने दरवर्षी पावसाळा सुरू होताच विद्यार्थी धरणग्रस्त रहिवाशांसाठी गुंजवणी धरणात घेवंडे ते निवी अशी बोट सेवा सुरू केली जाते,
मात्र यंदा कानंद ते घेवंडे या बारमाही रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाल्याने ठेकेदारांनी या ठिकाणी बोट सेवा सुरू केली नव्हती.त्यामुळं नागरिकांची मोठी अडचण होत होती
त्यानंतर स्थानिकानी केलेल्या मागणीनंतर ही बोट सेवा पुन्हा सुरू करण्यात आलीय.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार आज पूर्णपणे बंद राहणार असून त्यासाठी बाजार समितीकडून नाणे-भिड अर्थात अडत्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकल्याचं कारण देण्यात आलंय. मागील काही दिवसांच्या व्यवहाराचे पैसे खरिदाराकडून अडत्यांना देण्यात आले नाहीत, त्यामुळं शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून अडत्यानी बाजार समिती बंद ठेवण्याची मागणी केली होती ती मान्य करत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
पहीला लाडु तुळजाभवानी मातेच्या चरणी करण्यात आला अर्पण
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी
तुळजाभवानी मातेच्या भाविकांना आजपासून चितळे बंधूंच्या लाडूचा प्रसाद वाटपाला झाली सुरूवात
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पुजारी,भाविक व मंदीर संस्थानच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत पुजा करून प्रसाद वाटप करण्यात आले सुरू
मोतीचूर लाडु चा प्रसाद सुरू करण्यात आल्याने भाविकात आनंदाचे वातावरण
जालना शहरातील नवीन मोंढा परिसरातील हिंद नगर मधील एका घराला काल मध्यरात्री अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे.
शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची प्राथमिक माहिती असून या आगीमध्ये घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल आहे.
काल मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास या घराला अचानक आग लागली घरात कोणीही झोपलेलं नसल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
मात्र या आगीमध्ये घरातील संसार उपयोगी व साहित्य जळून खाक झाला आहे. दरम्यान रात्री उशिरा अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली आहे...
अकोला पोलिसांनी 26 किलो गांजा जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
गांजाची खरेदी-विक्री करताना या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यातील एमआयडीसी हद्दीत एसडीपीओ पथकाने छापा टाकून ही कारवाई केली आहे.
26 किलो गांजा जप्त असून त्याची किंमत 5 लाख 25 इतकी आहे.
अकोल्यातल्या नीलकंठ सहकारी सुतगिरणीसमोर आरोपी मोहम्मद जाकीर अब्दुल कदिर व समीर खान मेहबूब खान हे गांजाची खरेदी-विक्री करत असताना पकडले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.
वाशिम जिल्ह्यात २२ व २३ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे १५ हजार ५९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू असून, नुकसानाची व्याप्ती आणखी वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांवर पाणी फेरल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगले आहेत. कृषी व महसूल प्रशासनाकडून नुकसानाचे पंचनामे करण्यात येत आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल. पीक नुकसानभरपाई केव्हा मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यातील 11 हजार 220 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
शेतकऱ्यांना मिळणार काही प्रमाणात दिलासा
अतिवृष्टीमुळे 4694 हेक्टर क्षेत्रावरील फळबागा आणि पिकांना बसला होता फटका
एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानी संदर्भात 64 लाख 83 हजार रुपयांचा निधी, तर मे महिन्यातील नुकसान भरपाई म्हणून 8 कोटी 37 लाख 2 हजार रुपयांचा निधी मंजूर
जमिनीची मोजणी न करताच परत फिरण्याची नामुष्की
पाच गावातील जमिनीची मोजणी करण्याचा होता नियोजन , शेतकरी विरोधामुळे प्रक्रिया रद्द
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न
मात्र जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध
चेन्नई सुरत महामार्ग आणि शक्तिपीठ महामार्गाचे खुंटेवाडी येथे होणार इंटरसेक्शन
इंटरसेक्शनला कमीत कमी जागेत काम करण्याचा प्रशासनाचा शब्द, मात्र शेतकऱ्यांचा जमीन देण्याला विरोध
\
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता शाळा- महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडत आहे. आणि आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आज जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस यांना सुटी जाहीर केली. दरम्यान, रात्रीपासून पावसाचा वेग मंदावला असून, मोठ्या नदी नाल्यांनी अजून पात्र सोडलेले नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे.
भारतीय संविधानांचा अमृत महोत्सव नवी मुंबई शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना विश्वशांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे
नवी मुंबई शहरामध्ये गौतम बुद्ध यांचं स्मारक मंदा म्हात्रे यांच्याकडून करण्यात आला आहे त्यानिमित्ताने विश्वशांती या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे
पुणे -
छावा संघटनेचे विजय घाडगे आज पुण्यात
सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घाडगे घेणार भेट
सूरज चव्हाण यांनी केलेल्या महाराणी नंतर अजित पवार यांची घेणार भेट
दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी
काल रात्रीच विजय घाडगे पुणे मुक्कामी
पुणे -
अनधिकृत होर्डिंगविरोध महापालिकेची कारवाई तीव्र
आतापर्यंत ८८ अनधिकृत होर्डिंग असल्याचे समोर आले आहे यापैकी २४ होर्डिंग उतरवण्यात आले आहेत
१५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये ही मोहीम राबविण्यात आली यात सर्वाधिक ३७ अनधिकृत होर्डिंग हडपसर मुंडवा कार्यालयाच्या हद्दीत आहेत
इतर होर्डिंग ही लवकरच उतरवले जातील अशी माहिती उपाय संतोष वारुळे यांनी दिली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.