Maharashtra Live News Update: शिवसैनिकांनी कोकाटेंचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयात खेळला जुगार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक २१ जून २०२५, आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

शिवसैनिकांनी कोकाटेंचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयात खेळला जुगार

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करत हिंगोलीत शिवसैनिकांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जुगार खेळत आंदोलन केले आहे, त्यासोबतच लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सुरत चव्हाण यांच्या विरोधात तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी देखील यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली दरम्यान यावेळी अजित पवारांच्या विरोधात देखील शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला होता

पालघर ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते रक्तपेढीचा शुभारंभ..

पालघर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरला आहे. पालघर ग्रामीण रुग्णालयात शासकीय रक्तपेढीचा शुभारंभ पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला.ही रक्तपेढी सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत गरजूंना वेळेवर रक्ताची उपलब्धता होणार आहे.रक्तदानाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत, ही शासकीय रक्तपेढी आरोग्य यंत्रणेतला एक ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याचं मत आरोग्य विभागाने व्यक्त केलं आहे.

नांदेडच्या धर्माबाद येथे छावा संघटना आक्रमक, राष्ट्रवादीचे बॅनर फाडून केला संताप व्यक्त

छावा संघटनेचे पदाधिकारी तथा शेतकरी नेते विजय घाडगे पाटील यांना मारहाण झाल्या नंतर छावा संघटना आक्रमक झालीय. नांदेड मध्ये ठीक ठिकाणी छावा संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. नांदेडच्या धर्माबाद येथे छावा संघटनेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे बॅनर फाडून संताप व्यक्त केला. दरम्यान धर्माबाद तहसील मध्ये छावा संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रम्मी खेळून लातूर मारहाणीच्या घटनेचा निषेध केला.

कोल्हापुरात चालक-कंडक्टरच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात

कोल्हापुरात आज दुपारी चालक आणि कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे भीषण अपघात थोडक्यात टळला. पुण्याहून कोल्हापूरला येणारी एसटी बस मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांना उतरवून छत्रपती संभाजीनगर डेपोकडे जात असताना, छत्रपती संभाजीनगर चौकात अचानक बसचा स्टिअरिंग रॉड तुटला. या घटनेमुळे मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, चालक विलास शिंदे आणि कंडक्टर धीरज डांगे यांनी तत्परता दाखवत बस ताब्यात ठेवली आणि अपघात टाळला.

नंदुरबार जिल्ह्यातील 54 दिव्यांग बांधवांना मिळाला इलेक्ट्रिक उपकरणांचा लाभ

शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक साहित्य वाटप करण्यात आला जिल्ह्यातील 54 दिव्यांग बांधवांना याचा लाभ मिळाला असून यात आठ इलेक्ट्रिक बॅटरी सायकल आणि वीस चेन सायकल, श्रावण यंत्र इत्यादी साहित्यांचा लाभ दिनांक बांधवांना देण्यात आला...

कोल्हापुरात चालक-कंडक्टरच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात

कोल्हापुरात आज दुपारी चालक आणि कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे भीषण अपघात थोडक्यात टळला. पुण्याहून कोल्हापूरला येणारी एसटी बस मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांना उतरवून छत्रपती संभाजीनगर डेपोकडे जात असताना, छत्रपती संभाजीनगर चौकात अचानक बसचा स्टिअरिंग रॉड तुटला. या घटनेमुळे मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, चालक विलास शिंदे आणि कंडक्टर धीरज डांगे यांनी तत्परता दाखवत बस ताब्यात ठेवली आणि अपघात टाळला.

सरकारला सत्तेच्या माज आहे, त्यामुळे राज्यात अराजकता फैलावत आहे - नाना पटोले

सरकारला सत्तेच्या माज आहे,त्यामुळे राज्यात अराजकता फैलावत आहे....कोकाटे यांचा तातडीनं राजीनामा घ्यावा आणि शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी करावी....- नाना पटोले..

परभणीत सूरज चव्हाण यांच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक

अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्याकडून छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ परभणीतही विविध मराठा संघटन आक्रमक झाल्याचा पाहायला मिळालं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा मंडळ, छावा दल, मराठा महासंघ आदी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सुरज चव्हाण यांच्या प्रतिकात्मक प्रतिक्रिमेला जोडे मारले तसेच राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महाराणीच्या घटनेचा निषेध केला आहे व सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी ही केली आहे.

रायगड जिल्ह्याला हवामान खात्याने दिला पावसाचा ऑरेंज अलर्ट

० रायगड जिल्ह्याला हवामान खात्याने दिला पावसाचा ऑरेंज अलर्ट

० आज पासून पुढे पाच दिवस जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता

० आज ताशी 50 ते 60 किलो मिटर वेगाने वाऱ्यासह पाऊसाचा दिला इशारा

० आपत्ती यंत्रणा सज्ज

पुणे बाजारात खोबऱ्याचे दर, १ किलोमागे १०० रुपयांनी वाढले

खोबरे शंभर रुपयांनी महाग..

पुणे बाजारात खोबऱ्याचे दर किलोमागे तब्बल १०० रुपयांनी वाढले असून, किरकोळ बाजारात दर ४२० रुपये किलोवर पोहोचले आहेत.

तमिळनाडू आणि कर्नाटकातील नारळाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झाल्याने ही दरवाढ झाली आहे.

रोजची मागणी २० ते ३० टन असतानाही केवळ १५ ते २० टन खोबरे बाजारात येत आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मागणी आणखी वाढणार असून दरात अधिक वाढ होण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.

नारळ आणि नगामागेही पाच ते सात रुपयांची वाढ नोंदवली जात आहे

एका नारळाची किंमत ४० रुपयांवर गेली आहे. खोबऱ्याच्या तुटवड्यामुळे ग्राहकांना खर्चाचा फटका बसणार आहे.

धाराशिवमध्ये छावा व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

धाराशिवमध्ये छावा व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक, सुनिल तटकरे यांचे बॅनर फाडले.

तटकरे यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते आक्रमक.

पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात पुन्हा बाचाबाची.

राष्ट्रवादी मेळावा ठिकाणी मोठा गोंधळ.

नागपूरच्या रेशीमबाग परिसरात सायकल चोरीची घटना; सीसीटीव्हीत चोरटा कैद

नागपूर शहरातील रेशीमबाग परिसरातील एका सोसायटीत सायकल चोरीची घटना घडली असून, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चेहऱ्यावर कपडा बांधलेला एक अज्ञात चोरटा सोसायटीत शिरला आणि सायकल घेऊन पळून गेला.

ही घटना इमामवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. विशेष म्हणजे, याआधीही या सोसायटीत चोरीच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे खबरदारी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.

दरम्यान, अज्ञात आरोपीविरुद्ध इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे. घटनास्थळाचा सीसीटीव्ही फुटेज तपासला जात असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

नागपूरच्या रेशीमवाग परिसरातील सोसायटीमधून सायकलची चोरी

नागपूरच्या रेशीमवाग परिसरातील सोसायटीमधून अज्ञात आरोपींनीने सायकल चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद...

चोरटा चेहऱ्यावर कपडा बांधून सोसायटी मध्ये शिरला आणि सायकल घेऊन निघून गेला..

ही घटना इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील रेशिमबाग परिसरात घडली...

याआधी या सोसायटी मध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे सीसीटीव्ही लावण्यात आले होते...

अज्ञात आरोपीच्या विरोधात इमामवाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून चोरट्याचा शोध सुरू आहे..

Latur News: सुरज चव्हाण यांच्यासह १२ जणांवर गुन्हे दाखल...

लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

विवेकानंद पोलीस ठाण्याचे एक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक असे दोन पथके सुरज चव्हाण यांच्या शोधा साठी मार्गस्थ...

Amravati: अमरावतीत कृषीमंत्र्यांच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक...

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ सुरू आहे. अमरावतीमध्येही प्रहार संघटनेचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांचे नेतृत्वात अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पत्ते फेकून आंदोलन करण्यात आले. कृषी मंत्रांचा निषेध करत त्यांचा निषेध करण्यात आला,यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पोस्टरला जोडे चपला देखील आंदोलकांनी मारल्या. विधानभवनातून शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांच्या फायद्याचे निर्णय होतील अशी अपेक्षा असताना मंत्री मात्र पत्ते खेळण्यात आणी मारामाऱ्या करण्यात व्यस्त आहेत.अशा मंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी यावेळी आंदोलकांतर्फे करण्यात आली.

सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश

काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे, असं अजित पवारांनी सांगितले आहे.

डोंबिवलीत भव्य कावड पदयात्रा

डोंबिवली शहरात श्रावण मासानिमित्त भक्तिभावाने भरलेली भव्य कावड पदयात्रा काढण्यात आली. डोंबिवलीतील पवित्र पिंपळेश्वर महादेव मंदिरापासून सुरू झालेल्या या पदयात्रेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही सहभाग घेतला. ही पवित्र यात्रा डोंबिवलीपासून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरापर्यंत पार पडत असून, कावड यात्री पिंपळेश्वर मंदिरात जल भरून पदयात्रेच्या माध्यमातून अंबरनाथमधील शिवमंदिरात पोहोचून महादेवाला जलाभिषेक करणार आहेत. हर हर महादेव आणि 'बोल बम'च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

सुरज चव्हाण यांच्या घटनेची पक्षाने घेतली गंभीर दखल-सुनील तटकरे

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची संकेत

कालच्या घटनेबद्दल सुरज चव्हाण यांच्या घटनेची पक्षाने घेतली गंभीर दखल

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांच्यासमोरील अडचणीत वाढणार

कृषिमंत्री कोकाटे यांच्या व्हिडिओबद्दल निषेध नोंदवण्यावरून काल लातूर मध्ये हाणामारी

एकीकडे कालच्या घटनेचे राज्यभरात उमटत असलेले पडसाद तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे कारवाईचे संकेत

कोल्हापूरच्या शाळेचा विद्यार्थ्यांना लावला परदेशी भाषेचा लळा...

राज्य सरकारला हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घ्यायला लागला तर दुसरीकडे मराठीसाठी राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले ठाकरे बंधू एकत्र आले, भाषेवरून सुरू असलेला वाद निवडणुकीपर्यंत चालूच राहणार आहे. शाळांमध्ये त्रैभाषा शिकवण्यावरून राज्यात वादंग उठले असताना कोल्हापूरात मात्र एका शाळेत जर्मन, रशियन, जापनीज अशा सात भाषा शिकवल्या जातात, पहिलीपासून बाराखडीचे धडे गिरवणार्‍या विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीप्रमाणे भाषा शिकायला मिळत असल्यामुळे ना पालकांची तक्रार आहे ना विद्यार्थ्यांची अडचण.

Sunil Tatkare: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे धाराशिव जिल्ह्यात दाखल

लातूर येथे काल घडलेल्या मारहाणीच्या घटनेबाबत तुळजापूर येथील छावा संघटनेच्या पदाधिकारी व स्थानिक संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत तटकरे यांची बैठक

तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थांच्या कार्यालयात बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा आणि सुरज चव्हाणांचा राजीनामा घेऊन न्याय देण्याची मागणी

थोड्याच वेळात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे घेणार दर्शन

Nashik: नाशिकमध्ये छावा संघटनेचं आंदोलन

- नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस ( AP ) कार्यालयाबाहेर आंदोलन

- छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन

- नाशिकमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या कामबंद आंदोलनाचा आजचा चौथा दिवस...

- सातव्या वेतन आयोगातील त्रुटींच्या निषेधार्थ आणि इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने पुकारला बेमुदत संप...

- नागपुरातील शासकीय मेडिकल, सुपर, आणि मेयो रुग्णालयातील परिचारिका कामबंद आंदोलनात सहभागी... यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण वाढला आहे...

- नर्सेसच्या काम बंद आंदोलनामुळे मेडिकल रुग्णालयात निम्म्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, तातडीची शस्त्रक्रिया पार पडली आहे....

- नेत्ररोग, इएनटी, सामान्य सर्जरी आणि आर्थोपेडिक विभागांचा या शस्त्रक्रियांमध्ये समावेश

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर टायर पेटवले

राज्याच्या विधिमंडळात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता हिंगोलीत रविकांत तुपकर यांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या म्हणत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हिंगोलीच्या गोरेगाव मध्ये रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर टायर पेटवले आहेत दरम्यान लातूरमध्ये खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा निषेध देखील यावेळी करण्यात आला.

Ratnagiri Rain: रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची सकाळपासून रिपरीप

जिल्ह्याला २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाची सरींवर बरसात

आजही जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच

दमदार पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३२.९४ सरासरी पाऊस

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात विदेशी दारू तस्करांवर पोलिसांची कारवाई....

कारवाई विसरवाडी पोलिसांनी रात्री 9 लाख 36 हजार रुपयांची अवैध विदेशी दारू केली जप्त....

दहिवेलकडून विसरवाडीकडे हुंडाई आय ट्वेंटी कारमधून दमणसाठी दारू तस्करीची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.घटनास्थळ सरपणी नदी पुलाजवळ नाकाबंदी करण्यात आली...

संशयित कार थांबवण्याचा इशारा दिल्यावर चालकाने पोलिसांवर गाडी चालवून पळण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या वाहनाला धडक दिली.

अवजड वाहनांमुळे कार अडकल्याने हेमंतकुमार धनसुखभाई राठोड ,वलसाड, गुजरात आणि जैनील रमेश पटेल ,दमण या दोन तस्करांना घेतलं ताब्यात....

फक्त 108 रुपयात आणि 2 मिनिटांत हृदयविकाराचा धोका ओळखा | AI Heart Disease Test

धाराशिवमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला, दंगल नियंत्रण पथक केले तैनात

वसई विरार सह मीरा-भाईंदर मध्ये पावसाची जोरदार हजेरी

वसई विरारसह मिराभाईंदर मध्ये रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. यामध्ये नालासोपाराच्या गाला नगर शिर्डी नगर संकेश्वर नगर, तर विरारच्या विवो कॉलेज मार्ग जैन मंदिर मार्ग या सकल भागातील रस्त्यावर पाणी साचले होते.

मात्र सकाळपासूनच वसई विरार शहरात पावसाने ओसंती घेतल्यामुळे रस्त्यावरील पाण्याचा निचरा झाला आहे. मात्र आकाशात ढगाळ वातावरण झाल्यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचाच आठवा घेतला आहे.

ठाकरेंच्या शिवसैनिकांनी शहरातील कचरा गोळा करत हिंगोली पालिकेत फेकला

हिंगोली शहरात कचऱ्याचा प्रश्न पेटला आहे, गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छता सेवेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला देयक मिळालं नसल्याने शहरातील स्वच्छता बंद आहे त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत.

लोकशाहीच्या पवित्र मंदिरात जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी पत्त्यांचा जुगार खेळणारा सत्ताधाऱ्यांसाठी ‘माणिक’ असला तरी तो शेतकऱ्यांच्या गळ्यात अडकवण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या गळ्यात बांधून घ्यावा… आणि रात्रंदिवस मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी खातं संवेदनशील मंत्र्याकडं द्यावं.
रोहित पवार, राष्ट्रवादी आमदार

कुंडमळा पूल दुर्घटना प्रकरण

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आज आपला चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर करणार

चौकशी अहवालात बांधकाम विभाग आणि पुणे जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार?

बांधकाम विभागाने पूल पुणे जिल्हा परिषदेकडे वर्ग केला नाही

तर पुणे जिल्हा परिषदेने पुलाची देखभाल, दुरुस्ती केली नाही

2017 सालीचं कुंडमळा पूल धोकेदायक असल्याचं निष्कर्ष

पूल धोकेदायक असतानाही प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष

कुंडमळा पूल दुर्घटनेमध्ये चार जणांचा झाला होता मृत्यू

संभाजीनगर 3 बालकांना लुळेपणा; आज येणार अहवाल

खंबाट वस्तीवरील 3 बालकांना लुळेपणा; आज येणार अहवाल

गावात भेट देऊन पथकाने घेतले तपासणीसाठी पाण्याचे नमुने

शनिवार आणि रविवारी 480 नागरिकांची करण्यात आली तपासणी

लुळेपणा आलेल्या तीनही बालकांवर उपचार सुरू; तिघांच्याही प्रकृतीत हळूहळू सुधार

आरोग्य विभागाने बालकांच्या घेतलेल्या रक्त, लघवी तपासणीचा अहवाल येईल

अमरावती शहरातील युनिकॉन स्पावर  कारवाई

अमरावती शहरातील युनिकॉन स्पा सेंटरवर अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट-२ कडून धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्पामधील ३ ग्राहकांना अटक करण्यात आली असून, )६ तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.संबंधित तरुणी दिल्ली,मुंबई व औरंगाबाद येथील असल्याचे उघड झाले आहे.या स्पा सेंटरचे मालक सोमेश्वर येवते, रहिवासी मुंबई, यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर स्पाचा व्यवस्थापक संजय भरतसिंग राजपूत यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही धडक कार्यवाही करण्यात आली.या कारवाईमुळे शहरातील बोगस स्पा सेंटर्सवर पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईचा धसका दिसून येत आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज धाराशिव दौऱ्यावर

लातूर मधील राड्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज धाराशिव दौऱ्यावर

आई तुळजाभवानी देवीचे आशीर्वाद घेऊन करणार धाराशिव दौऱ्याला सुरुवात

धाराशिवमधील शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

काल झालेल्या हाणामारीच्या निषेधार्थ धाराशिव मध्ये आंदोलन होण्याची शक्यता

समाज माध्यमातून देखील घटनेचा तीव्र निषेध

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसह तटकरे धाराशिव मध्ये घेणार पत्रकार परिषद

काल लातूरमध्ये हाणामारीची झालेली घटना ताजी असल्याने तटकरेंच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष

Mumbai : : पूर्व उपनगरात पावसाची जोरदार हजेरी

मुलुंड नाहूर भांडुप कोळी घाटकोपर भागात जोरदार पाऊस

सखल भागात पाणी साचायला सुरुवात

घाटकोपर पश्चिमेकडे रेल्वे स्थानकाजवळ पाणी साचल्यामुळे नदीचे स्वरूप

जवळच रेल्वे स्थानक असल्यामुळे चाकरमाने यांना रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यामध्ये येत आहेत अडथळे

Maharashtra Live News Update: श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना कुठलीही बॅग, पिशवी, बाटली नेण्यास बंदी

- भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसच सुलभ दर्शनासाठी निर्णय

- श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून त्र्यंबकेश्वरला तयारी

- त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरासह शहरात देखील पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त असणार तैनात

- तर मंदिर देवस्थान समितीकडूनही प्रत्येक भाविकाला दर्शन व्हावं, यासाठी नियोजन पूर्ण

- भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन

DHULE अनिसच्या पदाधिकाऱ्यांतर्फे बालविवाह संदर्भात करण्यात येत आहे जनजागृती

बालविवाह संदर्भात अनिसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे, धुळे तालुक्यातील बाबरे गावामध्ये हे जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे, बाबरे या गावामध्ये अशिक्षित व ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी अनिसच्या पदाधिकाऱ्यांनी या गावातील ग्रामस्थांमध्ये जाऊन बालविवाह संदर्भात जनजागृती केली आहे,

विमा रक्कम देण्यासाठी वारसा हक्क लागू होत नाही

- विमा रक्कम देण्यासाठी वारसा हक्क लागू होत नाही.. तर लाभार्थी म्हणून नामनिर्देशित व्यक्तीचाच विम्याच्या रकमेवर हक्क असल्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने दिलाय...

- विम्याची कोट्यावधी रुपयाच्या रक्कमेला धरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादावर नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला..

- विमा कायद्याच्या कलम 39(7) चा आधार घेत नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला...

- यात मृतकाची पत्नी आणि मुलांनी वारसा हकाने विमा रक्कम मागितली होती.. तेच दोन आणि मृतकाची आईचे नाव विमा लाभार्थी म्हणून निर्देशित होते. त्यामुळे हा कौटुंबिक वाद सुरू होता

- यावर नागपूर खंडपीठाने वारसा हक्काने नाही तर विमा कायद्याचा नाम निर्देशित असलेल्या लाभार्थीना विमा रक्कम देण्याचा निंर्णय दिला..

Maharashtra Live News Update: नागपूरसह विदर्भात आजपासून पावसाचा अंदाज

- नागपूरसह विदर्भात आजपासून पावसाचा अंदाज

- २१ ते २३ जुलैदरम्यान विदर्भातील आठ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

- नागपूर हवामान विभागाने वर्तवला पावसाचा अंदाज

- विदर्भात 8 ते १० दिवस हुलकावणी देत अधून मधून येणारा पावसाचा जोर वाढणार

साकुर येथे अघोरी कृत्याचा प्रयत्न फसला,पाच आरोपी अटकेत

यवतमाळ तालुक्यातील साकुर येथे काही व्यक्ती मिळून अघोरीकृत्य करण्याचा प्रयत्नात होते मात्र त्यांचा प्रयत्न यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी हाणून पाडला असून रात्रीच्या सुमारास यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला तेव्हा घरातील एका खोलीत मोठा खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. खड्ड्याच्या बाजूलाच लिंबू, नारळ,ओटीचे सामान आढळून आले घटनास्थळावरून पाच आरोपीला पकडण्यात आले तर एक आरोपी पसार झाला.साकुर गावातील आकाश कोटनाके यांच्या घरात काही बाहेर गावातील व्यक्ती संशयित हालचाली करीत होते या माहितीच्या आधारावर पोलिसांनी साकुर येथील आरोपीच्या घरी छापा मारला.आकाश कोटनाके,कुणाल खेकारे,वृषभ तोडसकर,प्रदिप इळपाते,बबलू येरेकर असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे पोलिसांनी घटनास्थळावरून आघोरी कृत्याचे साहित्य आणि तीन मोटरसायकल ताब्यात घेतल्या असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.

राज्यातला शेतकरी प्रचंड संकटात असताना राज्याचे कृषिमंत्री सभागृहात रमीचे पत्ते फेकत असतील तर जनतेत संतापाचा आगडोंब उसळणारच आहे. या विषयावर लातूर येथे #छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे साहेबांना निवेदन देत असताना झालेला वाद दुर्दैवी आहे. तटकरे साहेबांवर अशा प्रकारे पत्ते फेकणे चुकीचेच आहे, परंतु त्यांनतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना करण्यात असलेली मारहाण अधिक चुकीची आहे. लोकांनी प्रश्न विचारले की आम्ही फटके देऊ, हाणामारी करू आणि विरोध चिरडून टाकू हा संदेश सत्ताधारी देऊ पाहत आहेत का?
रोहित पवार, राष्ट्रवादी आमदार

Maharashtra Live News Update: राज्यातील ६५ कारखान्यांकडे एफआरपीचे 411 कोटी रुपये थकीत

साखर आयुक्तालयाने एफआरपी थकीत रक्कम देण्यासाठी कारखान्यांच्या वेळोवेळी घेतलेल्या सुनावण्या आणि शेतकर्‍यांना दिलेली रक्कम यामुळे सद्य:स्थितीत 411 कोटी रुपयांइतकीच एफआरपीची रक्कम देणे बाकी राहिले आहे. 200 पैकी 135 कारखान्यांनी शंभर टक्के किंवा त्यापेक्षाही अधिक रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केली असून अद्यापही 65 कारखान्यांनी संपूर्ण रक्कम दिली नाही. 15 जुलैअखेरच्या ताज्या अहवालानुसार एफआरपीचे अद्यापही 411 कोटी रुपये शेतकर्‍यांचे मिळणे बाकी असल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले.

पुण्यातील एसटी प्रवाशांना 'लाइव्ह लोकेशन'ची सुविधा ऑगस्टअखेरपासून सेवा सुरू

पुण्यातील ७०० हून अधिक एसटी बसचं 'लाइव्ह लोकेशन' आता प्रवाशांना 'एमएसआरटीसी' अॅपवर दिसणार आहे.

मोबाईल अॅपमधील 'ट्रीप कोड' टाकल्यास बस सध्या कुठे आहे, किती वेळात स्थानकात पोहोचेल, याची अचूक माहिती मिळणार आहे.

ही यंत्रणा ऑगस्टअखेर सर्व प्रवाशांसाठी सुरू होणार आहे

या सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे .. प्रवास नियोजन अधिक सोयीचं होणार आहे

. अॅपमध्ये तिकीट आरक्षण, मार्ग माहिती, सुरक्षा, बिघाड, वैद्यकीय मदत व अपघातप्रसंगी मदतीच्या सुविधाही असणार आहेत.

'एमएसआरटीसी' अॅप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून 'प्रवासी लाइव्ह' सेवा वापरता येणार आहे.

पुणे विमानतळावर सर्वात मोठं ‘मॉक ड्रिल’ यशस्वी

अहमदाबाद विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर शनिवारी सकाळी ११.३० वाजता भव्य ‘मॉक ड्रिल’ राबवण्यात आली.

यामध्ये विमानाला आग लागल्याची माहिती देत बचाव कार्याचा सराव करण्यात आला. प्रत्यक्ष विमानाऐवजी बसचा वापर करून धावपट्टीवर आपत्कालीन परिस्थितीची निर्मिती करण्यात आली.

या ड्रिलमध्ये भारतीय वायुसेना, सीआयएसएफ,एनडीआरएफ, पीएमसी, जिल्हा प्रशासन, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि अग्निशमन दल अशा अनेक यंत्रणांनी सहभाग घेतला.निर्धारित वेळेत सर्व पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू केलं.

संचालक संतोष ढोके यांनी सांगितलं की, विमान दुर्घटना घडल्यास विमानतळ प्रशासन आणि यंत्रणा किती अलर्ट आहेत, हे या मॉक ड्रिलमधून दिसून आलं आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी ही यंत्रणा नेहमी तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com