Maharashtra Live News Update: फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२५, बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवा आजपासून सुरू होणार, मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची हजेरी, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Maharashtra Live News Update: फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ

ओबीसीवर अन्याय करू नका, असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला संभाजीनगरमध्ये आले होते. ते भाषण करण्यासाठी उभे राहिले, त्यावेळी काही लोकांनी जोरदार राडा घातला अन् घोषणाबाजी केली.

Beed : उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हुतात्मा चौकात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे या पार्श्वभूमी वरती राज्याचे मुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे आज बीडच्या हुतात्मा चौकात शहिदांना हुतात्मा चौकात अजित पवारांकडून अभिवादन मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे त्यांना अजित पवारांकडून अभिवादन करण्यात येत आहे

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरात स्वच्छता अभियान

- नागपूरातील डॅा. हेडगेवार चौकात स्वच्छता अभियान सुरु

- भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात अभियान

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्याने नागपूर शहर भाजप कडून 111 ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन

- नागपूर शहर संघटनेतील 20 मंडळ मिळून शहरातील विविध भागात 111 कार्यक्रमांचे आयोजन

- 111 ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात लाखो भाजप कार्यकर्ते होणार सहभागी

- स्वच्छता अभियान, नेत्र तपासणी, पूजा, अभिषेक, रुग्णालयात फळ वाटप सारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन

Jalgaon : जळगाव विमानतळावरून दीड वर्षांत ७३ हजार प्रवाशांचे उड्डाण

जळगाव विमानसेवेला पसंती देणाऱ्या जळगावकर प्रवाशांचा आलेख दिवसेंदिवस वाढताच आहे. प्रतिदिन सरासरी दीडशेवर प्रवासी विमान सेवेच्या माध्यमातून प्रवास करीत आहेत. एप्रिल २०२४ ते जून २०२५ या काळात ७३ हजार ५२९ प्रवाशांचे उड्डान झाले तर ७३ हजार ४३७ प्रवाशी जळगावात दाखल झाले.एप्रिल २०२४ मध्ये फ्लाय-९१ आणि जून २०२४ पासून अलायन्स एअरसह कामकाज पुन्हां सुरू झाल्यानंतर जळगाव विमानतळावरून सेवा उपलब्ध झाली आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद, गोवा आणि अहमदाबाद या शहरांसाठी सेवा सुरू असल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. या सर्वच मार्गावर प्रवाशांची ये-जा वाढत आहे.

Dharashiv : मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यु पावलेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबीयांना प्रताप सरनाईकांकडून 25 लाखांची मदत

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षण आंदोलनाची हाक दिल्यानंतर लाखो मराठे मुंबईत दाखल झाले. जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआरही काढला.मात्र या आरक्षण लढ्यामध्ये पाच मराठा आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आंदोलकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सरसावलेत . मुंबईतील आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयाला सरनाईकांकडून स्वखर्चाने पंचवीस लाखांची आर्थिक मदत करण्यात आली. प्रत्येक मयत आंदोलकाच्या कुटुंबीयांना पाच लाखांचा धनादेश देण्यात आला.धाराशिव इथं मदतीच वाटप करण्यात आलं.

Latur : मांजरा धरणाची चार दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सदरतेचा इशारा

मांजरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आहे, मागच्या तीन दिवसापासून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळतो आहे, दरम्यान धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने , मांजरा धरण 100 टक्के भरले आहे, तर पाण्याचे योग्य नियोजन आणि धरणाची सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने धरणाचे चार दरवाजे उघडून मांजरा नदी पात्रात 13, हजार 166 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय, तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देखील दिलाय, दरम्यान पुढील काही तास लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Latur News : शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशा ही, धुळीस मिळाल्या; लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी

लातूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानंतर सातत्याने अतिवृष्टी होत आहे, यंदा वेळेवर खरिपाच्या पेरण्या झाल्या तर त्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढतच गेलाय, लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने नगदी पीक म्हणून सोयाबीन, तूर, मूग उडीद मोठ्या प्रमाणात घेतली जातात, जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे ही सगळी पीक अगदी बहरली होती मात्र, ऑगस्ट पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत गेला आणि काढणीला आलेले मूग आणि उडीद पिक अक्षरशः पाण्यात गेले आहे. तर पुन्हा आता मागच्या तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाचा दूर वाढल्याने सोयाबीन संपूर्णतः पाण्यात गेले आहे, त्यामुळे शेतकऱ्याची उरलीसुरली अशा ही ,आता मावळली आहे, प्रशासनाने पंचनामे करून मदतीच आश्वासन जरी दिलं असलं तरी शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे. शेतकऱ्याचा काना पूर्णतः मोडून गेलाय ,आर्थिक नियोजन कोलमडलय,त्यामुळे हताश झालेल्या जगाच्या पोशिंदाला सरकारच्या मदतीची मोठी अपेक्षा आहे.

Nagpur : शालार्थ घोटाळ्यामधील चौकशीला संशयित शिक्षक गैरहजर

- शालार्थ घोटाळ्यामधील चौकशीला संशयित शिक्षक गैरहजर... शिक्षण उपसंचालक ह्यांच्याकडून चौकशी सुरू

- ६३२ जण संशयितांच्या यादीत आहेत. शासनाने सुनावणीसाठी उपसंचालकांकडून कारवाई सुरू केली, पण संशयित शिक्षकांची चौकशी समिती समोर गौरहजेरी लावल्याचा बोललं जातं आहेय...

- पहिल्या दिवशी ५० जणांना हजर राहायचे होते, मात्र केवळ १७ जणच सुनावणीला सामोरे आले.

- रविनगर येथील डायटच्या कार्यालयात ही सुनावणी इन कॅमेरा घेण्यात येत आलीय...

- यात चौकशी करत कागदपत्र तपासताना नियुक्तीची तारीख, शिक्षण पद्धत, पगाराचे स्वरूप, पहिली शाळा आणि कार्यरत कालावधी यासंबंधी प्रश्न विचारले हे ऑन कॅमेरा घेतले जात आहेय...

- या प्रकरणात शेकडो शिक्षक आक्रमक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बनावट कागपत्राचा आधारे नोकऱ्या मिळवल्या, वेतनह लाटले, २० अधिकारी, कर्मचारी शाळा संचालकांवर गुन्हे दाखल झाले...

Jalna News : पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना जिल्हा दौऱ्यावर, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची करणार पाहणी...

जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालना जिल्ह्या दौऱ्यावर आहेत. जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची त्या पाहणी करणार आहे. जालना जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार घातला असून जिल्ह्यातील 15 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झालीय . या पावसामुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं असून खरिपातील सोयाबीन कपाशी यापिकासह फळबागांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आज जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

Maharashtra Live News Update: अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल

अमरावती-मुंबई-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल..नवीन वेळापत्रक प्रवाशांना दिलासा देणारे...

येत्या 7 आक्टोंबर पासून विमान हे मुंबईवरून अमरावतीसाठी 7 वाजून 5 मिनिटांनी अमरावती साठी उड्डाण घेणार...

त्यानंतर हे विमान अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर 8 वाजून 50 मिनिटांनी दाखल होईल..

आणि 9 वाजून 15 मिनिटांनी हे विमान पुन्हा अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून मुंबईसाठी उड्डाण घेईल.. त्यानंतर सकाळी 11 वाजता हे विमान मुंबईत पोहोचणार

आता आठवड्यातून तीन ऐवजी चार दिवस राहणार विमान फेरी आता रविवारीही मिळणार विमानसेवा.

Junnar- आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

जुन्नर तालुक्यातील सोनावळे येथील आदिवासी आश्रम शाळेत प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई अचानक आले. त्यांनी मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर पीडित महिला शिक्षिकेच्या वर्गात घुसून त्यांच्याकडे अश्लील नजरेने पाहत दमदाटी केली आणि त्रास दिला हा प्रकार इथेच न थांबता पीडित महिला शिक्षिकेच्या शाळेवर पुन्हा पाहणे करतेवेळी दमबाजी करून अश्लील भावनेने पाहि या घटनेमुळे संतप्त झालेल्या शिक्षिकेने घडलेला प्रकार पोलिसांकडे नोंदवला. त्यांच्या तक्रारीनंतर प्रदीप देसाई यांच्याविरोधात विनयभंगासह संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Ambegoan - अवसरीच्या माळरानावर मुसळधार पाऊस. .

आंबेगाव तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. अशातच माळरानासह तांबडेमळा व अवसरी बुद्रुक परिसरात मुसळधार पाऊस झालाय. या मुसळधार पावसामुळे अवसरी बुद्रुक परिसरातील ओढेनाले तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या आठ ते दहा वर्षात ओढ्याला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Ambegoan-मंचरमध्ये भर पावसात काढले कोथिंबिरीचे पीक

उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सततधार पडणाऱ्या पावसामुळे शेतीकामे पूर्णपणे रखडली असली तरी आंबेगाव तालुक्याच्या अवसरी बुद्रुक गावातील शेतकरी बापू टाव्हरे यांनी भर पावसात आपल्या शेतातील कोथिंबिरीचे पीक काढले आहे.

पावसामुळे बाजारात कोथिंबिरीची आवक कमी होत असते त्यामुळे यावेळी चांगला बाजारभाव मिळत असतो. त्याचबरोबर सततच्या पडणाऱ्या पावसाने शेतात काढणीला आलेले कोथिंबिरीच्या पिकाचे नुकसान होणार याचीही भीती असते. या दोन्ही बाबींचा विचार करून या शेतकऱ्याने भर पावसात आपल्या शेतातील कोथिंबिरीचे पीक काढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com