Maharashtra Live News Update: हिंगोलीत नागरिकांनी घेतला पेट्रोल पंपचा ताबा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले, गॅस सिलिंडरचा तुटवड्याचे संकट, इराण-इस्त्राइल-अमेरिका युद्धाचे अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam
Published On

हिंगोलीत नागरिकांनी घेतला पेट्रोल पंपचा ताबा

स्वतःच वाहन उभे करून डिझेल टाकून घेतले

हिंगोली शहरातील खटकाळी बायपास परिसरात असलेल्या चौधरी पेट्रोल पंपावरील प्रकार

पेट्रोल पंपावर प्रचंड गर्दी झाल्याने गदारोळ

वाहन चालकांची एकमेकांना शिवीगाळही केली

“बॉम्बे पाव”वरून मनसे आक्रमक; मुंबई पाव” नाव वापरण्याचा मनसेचा ब्रिटानिया कंपनीला इशारा

“बॉम्बे पाव” ऐवजी “मुंबई पाव” नाव वापरण्याचा मनसेचा ब्रिटानिया कंपनीला इशारा

मनसे शाखाध्यक्ष उदय कोंडविलकर यांचे ब्रिटीशिया कंपनीला पत्र

महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी नाव बदलण्याची सूचना

“बॉम्बे” ऐवजी “मुंबई” नाव वापरण्याचा आग्रह

सूचना न मानल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

अफवा पसरल्याने देवळा येथील पेट्रोल-डिझेल पंपांवर वाहनधारकांची तोबा गर्दी

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल महाग होणार,पेट्रोल मिळणार नाही अशा अफवा पसरवल्या जात आहे,नाशिकच्या देवळा येथे अशाच अफवेमुळे संध्याकाळच्या सुमारास नागरिकांनी वाहनां मध्ये पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली तर डिझेल घेऊन जाण्यासाठी चक्क कॅन रांगेत लावून नागरिक उभे होते,खरे तर पेट्रोल डिझेल ची टंचाई नाही याचा प्रशासनाने खुलासा केला असला तरी इंधन महाग होईल,भेटणार नाही या अफवामुळे त्याचा परिणाम होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

भोंदू अशोक खरातची आजची SIT चौकशी संपली

- दिवसभर सखोल चौकशीनंतर तपास पथकाकडून विचारपूस पूर्ण

- विविध मुद्द्यांवर खरातची चौकशी

- पुढील चौकशीसाठी नेटवर्कमधील पुन्हा इतरांनाही समन्सची शक्यता

- SIT तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

- खरातची आजची SIT चौकशी पूर्ण, उद्या पुन्हा चौकशी होणार

पुणे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण

जमीन खरेदी दस्त प्रकरणी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या चौकशी समितीचा अहवाल सादर

4 हजार 392 पानांचा अहवाल

रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे - तृप्ती देसाई

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात हा अहिल्यानगर पोलीस प्रशासनाच्या मुळे बरोबर जाळ्यात अडकला आणि त्यामुळेच भोंदू बाबा अशोक खरात याचं खरं रूप जगासमोर आणण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. मात्र सुरुवातीचे यश हे अहिल्यानगर पोलिसांना असल्यामुळे आज सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा सत्कार केला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सांगितले की या प्रकरणात सुरुवातीपासूनच आम्हाला माहिती होती मात्र अहिल्यानगर पोलीस आणि मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण यशस्वी आतल्यामुळे नाशिक पोलिसांना भोंदू बाबा अशोक खरात याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. तर या प्रकरणात प्रामुख्याने समोर आलेल्या रूपाली चाकणकर यांचे महिला आयोगाचे अध्यक्ष पद गेले असले तरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांना हटवावे तसेच सुनील तटकरे यांच्या हकालपट्टीची मागणी करत चाकणकर. यांची एस आय टी चौकशी करून त्यांना याप्रकरणी सह आरोपी करावे अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.कारण दोघांच्या अनामिका जखमी झाल्याने हे प्रकरण गंभीर आहे.

भोंदू अशोक खरातची आजची SIT चौकशी संपली

- दिवसभर सखोल चौकशीनंतर तपास पथकाकडून विचारपूस पूर्ण

- विविध मुद्द्यांवर खरातची चौकशी

- पुढील चौकशीसाठी नेटवर्कमधील पुन्हा इतरांनाही समन्सची शक्यता

- SIT तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

- खरातची आजची SIT चौकशी पूर्ण, उद्या पुन्हा चौकशी होणार

पेट्रोल-डिझेल संपणार अफवा,लासलगाव पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी

सोशल मीडियावर पेट्रोल व डिझेल संपणार असल्याची अफवा पसरल्यानंतर दुपारनंतर लासलगाव येथील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या विशेषतः डिझेल भरण्यासाठी शेतकरी ड्रम आणि कॅन घेऊन पेट्रोल पंपांवर दाखल झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली अफवेच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केला दरम्यान, पेट्रोल पंप चालकांनी नागरिकांना आवाहन करत पेट्रोल व डिझेलचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन वाहनधारकांना करण्यात आले आहे

सांगलीचा मिरज परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, उकाडयाने हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा..

सांगली शहरासह मिरज परिसरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे.सायंकाळच्या सुमारास अचानकपणे लावलेल्या या पावसामुळे सांगलीकरांची चांगली दैना उडाली. सकाळपासून सांगलीचा परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढला होता त्यामुळे उघड्याने सांगलीकर हैराण झाले होते, सायंकाळी पडलेल्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात; मोरवाडी कोर्ट परिसर येथे दोन कारची समोरासमोर धडक, तिघे गंभीर जखमी

Summary

मोरवाडी कोर्ट परिसर येथे ही घटना घडली आहे. वळण घेत असलेल्या एका कारला समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारने जोरदार धडक दिल्याची माहिती समोर येतेय. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Maharashtra Live News Update: भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणातील सर्व गुन्हे SIT कडे वर्ग

- नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात असलेले सातही गुन्हे SIT कडे वर्ग

- यापुढे अशोक खरात प्रकरणाचा सर्व तपास SIT करणार

- नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात सात महिलांनी खरात विरोधात लैंगिक अत्याचाराचा दाखल केलाय गुन्हा

- तर सरकारवाडा पोलिसांकडून क्राइम ब्रँचकडे वर्ग केलेला गुन्हा देखील SIT कडे वर्ग

सांगली... देवदर्शन करून गावी निघालेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात, 6 जण गंभीर जखमी.

देवदर्शन करून गावी निघालेल्या भाविकांच्या गाडीचा सांगलीच्या विटा नजीकच्या सुळेवाडी येथे भीषण अपघात झाला आहे.अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना विटा येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,दोन जणांची प्रकृती चितांजनक आहे.हे सर्व जण कवठेमहांकाळ तालुक्यातल्या आरेवाडी यात्रा निमित्ताने देवदर्शन करून विटा मार्गे पुण्याकडे निघाले होते.दरम्यान विजापूर गुहागर महामार्गावरील सुळेवाडीजवळ भरधाव गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या होर्डिंगला गाडी धडकून तीन ते चार वेळा पलटी खाऊन, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यात पलटी झाली.या अपघातामध्ये इर्टीग गाडीचा अक्षरशः चक्काचुर झाला आहे.

सेना अधिकारी पदासाठी एसएसबी पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

भारतीय सैन्यदलातील अधिकारी पदासाठी भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेच्या तयारीसाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नाशिक येथील प्री-ट्रेनिंग सेंटर, नाशिक रोड येथे दि. ०४ मे २०२६ ते १३ मे २०२६ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. ६५ आयोजित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना विनामूल्य प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा देण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध

पुणे जिल्ह्यात युरिया खतांच्या तुटवड्याबाबत काही वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.

हंगाम २०२५-२६ साठी जिल्ह्याला एकूण ७४,००० मेट्रिक टन युरिया खतांचे मंजूर वाटप करण्यात आले होते. त्यापैकी आजअखेर ७०,२४९ मेट्रिक टन (९५ टक्के) पुरवठा झाला असून, मागील हंगामातील १३,३४७ मेट्रिक टन शिल्लक साठाही उपलब्ध आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामासाठी युरिया खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही, असे प्रशासनाने सांगितले आहे.

साताऱ्यात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

आखाती देशातील युद्धामुळे पेट्रोल - डिझेलच्या साठ्यामध्ये कमतरता आली असून पेट्रोल - डिझेल विक्री बंद होणार असल्याच्या अफवांनी सातारा शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी होऊ लागली आहे.त्यात भारत पेट्रोलियम चे काही पेट्रोलपंप बंद झाल्याने इंडियन ऑईल च्या पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. पेट्रोल - डिझेलच्या साठ्यांमध्ये कोणतीही कमतरता नसून लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सातारा जिल्हा पेट्रोलियम असोसिएशनचे उपाध्यक्ष रितेश रावखंडे यांनी केले आहे.

पुण्यात व्यापाऱ्याचे १.५ कोटी रुपयांसाठी अपहरण, सापळा रचून आरोपींना अटक

तब्बल दीड कोटीच्या खंडणीसाठी एका व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. याबाबत एका व्यापाऱ्याच्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या वरून स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी गुलटेकडी परिसरात राहायला आहे. २४ मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तक्रारदार महिलेचे पती दुकानात गेले. दुपारी ते घरी जेवण करण्यासाठी यायचे. मात्र, दुपारी जेवण करण्यासाठी पती घरी आले नाहीत. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास सोशल मिडीयाचा आधार घेत आरोपींनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे; रुग्णवाहिकेतून थेट 'पंचायत समितीत' धडकत अनोखे आंदोलन

शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जीवघेण्या आणि ढिसाळ कारभाराचा निषेध नोंदवण्यासाठी आज 'शिरपूर फर्स्ट' संघटनेच्या वतीने थेट पंचायत समिती कार्यालयात एक लक्षवेधी आणि अनोखे आंदोलन करण्यात आले, आंदोलकांनी एका प्रतीकात्मक रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवून, हातात सलाईनची बाटली घेत रुग्णवाहिकेतून थेट पंचायत समितीचे दालन गाठले, आरोग्य विभागाची अवस्थाच आज या स्ट्रेचरवरील रुग्णासारखी झाली असल्याचा घणाघात करत, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे, या अभूतपूर्व आणि थेट पंचायत समितीच्या आवारात झालेल्या अनोख्या आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून बघ्यांची मोठी गर्दी झाली होती

अंबरनाथ येथील वांद्रापाडा परिसरात भटक्या कुत्र्याचा विद्यार्थिनीवर हल्ला

  • अंबरनाथ येथील वांद्रापाडा परिसरात भटक्या कुत्र्याचा विद्यार्थिनीवर हल्ला

  • घटनेचा थरारक CCTV व्हायरल

  • विद्यार्थिनी लहान भावावर जात असताना कुत्र्याने केला हल्ला

  • कुत्र्याच्या हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी

गडचिरोली जिल्ह्यात बिबटचा मोठा हल्ला चार मजूर जखमी

गडचिरोली जिल्ह्यातील चांभारडा टोली या ठिकाणी रोजगार हमीच्या कामावर रोजगार सेवक व कामगारांवर बिबटचा अचानक हल्ला हल्ल्यात चार मजूर जखमी दोन गंभीर तर दोन किरकोळ जखमी घटनास्थळावर वनविभागाची टीम आलेली आहे

भोंदू अशोक खरातला फाशी द्या, बीडच्या परळीत सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

भोंदूबाबा अशोक खरात याच्या निषेधार्थ परळी तहसील कार्यालयासमोर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आले.यावेळी भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच त्याला अभय देणाऱ्या वर पण कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.याभोंदू बाबाच करायच काय खाली मुंडक वर पाय, फाशी द्या फाशी द्या भोंदू बाबाला फाशी द्या अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे शेतीचं नुकसान होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्याचा शेतातच आत्मदहनाचा प्रयत्न

  • धाराशिव तालुक्यातील कावळेवाडी येथील शेतकरी किशोर बरकते यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत केला आत्मदहनाचा प्रयत्न

  • ढोकी येथील तेरणा साखर कारखान्यातील सांडपाणी शेतात येत असल्याने विहिरीचे पाणी दूषित झालं असून शेतजमीन ही नापीक झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप

  • कारखाना प्रशासनाने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी या मागणीसाठी गेली दीड वर्षापासून जिल्हाधिकारी आणि कारखाना प्रशासनाकडे शेतकऱ्याने दिले होते निवेदने

  • दूषित पाण्यामुळे झालेली नुकसान भरपाई मिळत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांने आज आत्मदहनाचा केला प्रयत्न

  • २५ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा प्रशासनाला शेतकऱ्यने दिला होता इशारा

पुण्यात बोरवेलमुळे मेट्रो बोगद्याला भगदाड, मेट्रोचे काम सुरू असलेल्या बोगद्यात पाण्याची गळती

पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला मोठा धोका निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बोर पाडताना शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत मेट्रो बोगद्यात भगदाड पडून पाण्याची गळती सुरू झाली होती. वेळेत उपाययोजना करुन भगदाड बुजवण्यात आला आहे तर या गंभीर प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे

शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गात १४ मार्च रोजी बोगद्यात पाण्याची गळती असल्याचे मेट्रो ऑपरेटरच्या निदर्शनासाठी त्याचा दरम्यान वॉटर अलर्ट ही मेट्रो सिस्टीमवर दिसू लागला. मेट्रो अधिकाऱ्यांनी संपूर्ण बोगद्याची पाहणी केली.त्यात शुक्रवार पेठ परिसरातून बोरमुळे बोगद्याच्या सिमेंट रिंगला सुमारे ६ इंचाचे छिद्र पडून पाणी झिरपत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. तातडीने मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी बोरवेल चे छिद्र पूर्णपणे केमिकल आणि काँक्रीटने बुजवले आहे.

नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅस संदर्भात उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक

नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅस संदर्भात उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक

पेट्रोलियम मंत्री घेणार महाराष्ट्रातल्या प्रमुख आयुक्तांसोबत बैठक

सध्या राज्यासह देशभरामध्ये गॅस, पेट्रोल टंचाई आणि इतर विषयांवर होणार चर्चा

भविष्यात जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्या संदर्भात घेण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात होणार या बैठकीत चर्चा

दिल्ली इथल्या विज्ञान भवनात होणाऱ्या बैठकीसाठी कोल्हापूर सह इतर प्रमुख शहरातील आयुक्त रवाना

Mahad : रस्ता आणि गटारांवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर महाड नगर पालिकेचा हातोडा

रस्ता आणि गटारांवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर महाड नगर पालिकेचा हातोडा

उपनगराध्यक्ष संदिप जाधव यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर नगर पालिकेची मोठी कारवाई

व्यवसायीकांचे नुकसान टाळले जावे यासाठी नगर पालिकेने दवंडी देऊन कठोर कारवाईचा इशारा दिला होता.

Nandurbar : नंदुरबार पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नंदुरबार पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट ऑफिस आरडीएक्स बॉम्बचा स्पोर्ट होणार असल्याची असल्याच्या मेल आल्याने नंदुरबार मध्ये एकच खळबळ

नागपूर कार्यालयाला मेल आला असून राज्यातील सर्वे पासपोर्ट ऑफिस आणि पोस्ट ऑफिस उडवून देण्याची मेल

विभागीय कार्यालयातून माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोस्ट ऑफिस खाली करण्यात आलं

राज्यातील सर्व टपाल कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालय दुपारी बारा वाजून दहा मिनिटाला उडवून देण्यात येणार असल्याचा मेल आला आहे

माहिती मिळाल्यानंतर तातडीने नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आहे

विभागीय कार्यालयाकडून माहिती मिळाल्यानंतर तातडीने टपाल कार्यालय करण्यात आले रिकामे

Dhule: धुळ्यातील पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

धुळे -

धुळ्यातील पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल नंतर शहरात उडाली एकच खळबळ

धुळे पोलीस सायबर यंत्रणेसह मुख्य पोस्ट कार्यालयात दाखल

दरम्यान अज्ञात व्यक्तीने केल्याचा प्रकार समोर

मात्र गंभीर बाब म्हणजे पोस्ट कार्यालयातील मुख्य ईमेलवर हा संदेश प्राप्त झाल्याची माहिती

सुरक्षेच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले

बॉम्ब शोध पथक आणि पोलीस प्रशासन संपूर्ण पोस्ट कार्यालयाची करत आहेत तपासणी

Nashik: अशोक खरातविरोधात आतापर्यंत सरकारवाडा पोलिस ठाण्यात ७ गुन्हे दाखल

नाशिक -

- एसआयटी पथकातील अधिकारी नाशिक क्राईम ब्रँच युनिट एकच्या कार्यालयात दाखल

- एसआयटीकडून तपासाबाबत घेतली जात आहे माहिती, क्राइम ब्रँचकडून माहिती...

- अशोक खरातवर आत्तापर्यंत सरकारवाडा पोलिस ठाण्यात सात गुन्हे दाखल...

- एसआयटी आणि नाशिक पोलीस संयुक्तपणे करत आहे गुन्ह्यांचा तपास ...

- आज पुन्हा भोंदू अशोक खराची एसआयटीकडून सुरू आहे चौकशी

Pune: पुण्यात कोणत्याही प्रकारे इंधनाचा तुटवडा नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

पुणे -

पुण्यात कोणत्याही प्रकारे इंधनाचा तुटवडा नसल्याची जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची माहिती.

राज्यभरात पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय...

मात्र पुणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे पेट्रोल आणि डिझेलचा तू तेवढा नसल्याची माहिती पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय...

नागरिकांनी भयभीत होऊन पेट्रोल पंपावर रांगा करू नये असे देखील आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेय.

Pune: पुणे पोलिस राबवणार 'ऑपरेशन फ्लश आऊट', हातभट्टीच्या कारखान्यांवर होणार कारवाई

पुणे -

पुणे पोलिस राबवणार "ऑपरेशन फ्लश आऊट"

"ऑपरेशन फ्लश आऊट" च्या माध्यमातून हातभट्टीच्या कारखान्यांवर पोलिसांकडून होणार छापेमारी

पुणे पोलिसांकडून हातभट्टी अड्डे केले जाणार उद्ध्वस्त

लोणी काळभोर, लोणी कंद तसेच शहरातील ठिकठिकाणी अवैधपणे सुरू असलेल्या हातभट्टीचे अड्डे होणार उद्ध्वस्त

"ड्रग्स फ्री पुणे" या मोहिमेंतर्गत पुणे पोलिसांकडून राबवलं जाणार विशेष ऑपरेशन

Nashik: रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीत दोन गट

नाशिक -

- रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादीत दोन गट

- नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी पक्षाकडे केली चाकणकर यांना सर्व पदावरून बडतर्फ करण्याची मागणी

- चाकणकर यांचे भोंदू बाबा अशोक खरात सोबत थेट संबंध ही लज्जास्पद बाब, प्रेरणा बलकवडे यांची भूमिका

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहीत चाकणकर यांना तातडीने सर्व पदावरून बडतर्फ करण्याची केली मागणी

Yavatmal: यवतमाळमध्ये सिलेंडर नागरिकांनी एजन्सीबाहेर रात्रभर ठोकला मुक्काम

यवतमाळ -

नेरमध्ये सिलेंडर नागरिकांनी एजन्सी पुढे रात्रभर ठोकला मुक्काम

यवतमाळच्या नेर शहरातील नागरिकांची एजन्सी समोर सिलेंडर साठी जागल

अॅकर - आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण होणार असे संकेत वारंवार दिले जात होते. आता ती वेळ आल्याचे दिसून येत असून सामान्य नागरिकांना गॅस मिळविण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत तर यवतमाळच्या नेर इथे चक्क एजन्सी समोरच नागरिकांनी सिलिंडर साठी रात्र काढली.नेर शहरातील प्रथमेश गॅस एजन्सी यांच्याकडून इंडियन कंपनीचे सिलेंडर वितरित केले जाते या एजन्सीच्या ग्राहकांना सिलेंडर मिळत नसल्याने सायंकाळी सात वाजता पासून इथे ग्राहकांनी रांगा लावली रिकाम्या सिलेंडर सोबत अनेकांनी तेथील मोकळ्या जागेत रात्र काढली.

Thane: ठाण्यात वर्गणी देण्यास नकार दिल्यामुळे एका व्यक्तीवर चॉपरने हल्ला

ठाणे -

वर्गणी देण्यास नकार दिल्यामुळे एका व्यक्तीवर चॉपरने हल्ला केल्याची गंभीर घटना नौपाडा परिसरात घडली आहे.

ठाणे,नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावदेवी परिसरातील साई मंदिरात येत्या काही दिवसांत भजन-कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी वर्गणी मागण्यासाठी गावदेवी मार्केटमध्ये गेलेल्या काही मंडळाच्या सदस्यांवर एका स्थानिक गुंडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेचे CCTV फुटेज उपलब्ध असून, याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास नौपाडा पोलिस करीत आहेत.

Amravati: अमरावतीत 5 आणि 10  रुपयांच्या मुद्रांकाचे मार्केट ठप्प

अमरावती -

अमरावतीत पाच आणि दहा रुपयांच्या मुद्रांकाचे मार्केट ठप्प

चार ते पाच महिन्यांपासून बाजारपेठेत पाच आणि दहा रुपयांचे मुद्रांक नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणी..

मुद्रांक उपलब्ध होत नसल्याने न्यायालयाचे कामकाजही प्रभावीत, मुद्रांक उपलब्ध करून देण्यासाठी बार असोसिएशनचे कोषागारला निवेदन.

तर पाच आणि दहा रुपयांच्या मुद्रांकाची शासनाकडे मागणी, एप्रिल महिन्यात पुरवठा सुरळीत होणार, कोषागार विभागाच स्पष्टीकरण.

Yavatmal: मारेगावात अफवेमुळे पेट्रोल पंपावर नागरिकांची झुंबड

यवतमाळच्या मारेगाव येथे पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवेमुळे शहरातील पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी उसळली.

रात्री उशिरापर्यंत, तब्बल दोन वाजेपर्यंत नागरिकांनी इंधन भरण्यासाठी धावाधाव केली. अनेकांनी गाड्यांच्या टाक्या फुल करून घेतल्या तर काहींनी डबे व कॅनमध्येही इंधन साठवण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावर आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे पुरवठा खंडित होणार असल्याची चर्चा व्हायरल झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.

मात्र, अधिकृतरीत्या कोणताही तुटवडा नसल्याचे सांगण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik:भोंदू बाबा अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून दीड कोटींचा निधी मंजूर

भोंदू बाबा अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारकडून दीड कोटींचा निधी मंजूर

पर्यटन खात्यामार्फत ३१ मार्च २०१८ रोजी जीआर जारी

मंदिर परिसर विकासासाठी निधीला हिरवा कंदील

समारंभ मंडप बांधकामासाठी सर्वाधिक निधी मंजूर

पेव्हर ब्लॉक, प्रसाधनगृह व चेंजिंग रूमची कामे प्रस्तावित, भक्तनिवास बांधकामाचाही योजनेत समावेश

विद्युतिकरण व लँडस्केपिंगसाठी स्वतंत्र तरतूद, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामे पूर्ण

खटल्याच्या पार्श्वभूमीवर निधी मंजुरीवर प्रश्नचिन्ह, विरोधकांकडून सरकारवर ‘मेहेरबानी’चा आरोप

राजकीय वर्तुळात निर्णयाची जोरदार चर्चा

Nanded: नांदेड शहरात मध्यरात्री पेट्रोलसाठी रांगा

नांदेड शहरात मध्यरात्री पेट्रोल टाकण्यासाठी रांगा लागल्या होत्या. आखाती देशात वृद्ध सुरू असल्याने , पेट्रोलचा तुटवटा निर्माण होणार अशा अफवा पसरल्याने, नागरिकांनी पेट्रोल टाकण्यासाठी पंपांवर गर्दी केली होती.रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर गर्दी कायम होती.सकाळपासून परिस्थिती मात्र सामान्य आहे.यापूर्वी देखील अशाच अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी झाली होती.

Yavatmal: यवतमाळमध्ये पेट्रोल पंपावर दुचाकी आणि फोर व्हीलर च्या इंधन भरण्यासाठी रांगा

यवतमाळ, घाटंजी आणि वणी येथे पेट्रोल पंपावर दुचाकी आणि फोर व्हीलर च्या इंधन भरण्यासाठी रांगा

संध्याकाळी साडेसात ते आठ वाजता पासून इंधन पुरवठा खंडित होणार या अफवेतून ग्राहकांच्या रांगा

पेट्रोल पंपावरती कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस तैनात

यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी पेट्रोल साठी वाहन चालकांची पंपावर तुफान गर्दी, इंधन तुटवड्याची अफवा

पेट्रोल पंप संचालक यांच्याकडून सुरळीत इंधन पुरवठा होत असल्याची माहिती

एक दिवसाआड पेट्रोलचा टँकर पंपावरती येत आहेत त्यामुळे ग्राहकांनी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.

Latur: लातूर अंबाजोगाई महामार्गाला तडे, अपघाताचे प्रमाण वाढले

लातूर अंबाजोगाई महामार्गाला ठिकठिकाणी तडे गेले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आलाय, दुचाकी चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो आहे, तर तात्काळ महामार्गावरील तडे दुरुस्त करण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून करण्यात येते आहे.

Ramnavmi: रामनवमीनिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराजांचे मंदिर २४ तास खुले राहणार

रामनवमीनिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराजांचे मंदिर आज आणि उद्या 24 तास भाविकांसाठी खुले असणार आहे. मंदिर प्रशासनाचा निर्णय.

उद्या रामनवमी असल्याने राज्यभरातून शेकडो दिंड्या या शेगावच्या दिशेने निघाल्या आहेत.

उद्या रामनवमी असल्याने आजपासून शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी.

उद्या रामनवमीनिमित्त शेगावातील श्री संत गजानन महाराज मंदिरात साजरा करण्यात येणार आहे राम जन्मोत्सव.

Wardha: वर्ध्यात पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या सकाळपासून पेट्रोल पंपावर रांगा

पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या सकाळपासुन पेट्रोल पंप वर रांगा

पेट्रोल पंप उघडण्यापूर्वी नागरिकांनी लावली रांग

अफ़वामुळे कालपासून नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी

जिल्ह्यात पेट्रोल डिजेलचा स्टॉक असून नागरिकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये, जिल्हा पुरवठा अधिकारी राजू रणवीर यांचे आवाहन

नागरिकांनी डिजल पेट्रोलची साठेबाजी करू नये असा ही प्रशासन कडून आवाहन

पेट्रोल पंप नियमित सुरळीत सुरु राहतील, जिल्हा पुरवठा अधिकरी यांची माहिती

एस.टी. आरक्षणासाठी बोरकरांचा ‘शोले स्टाईल’ आंदोलन

धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र होत असून, मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत मेहकर तालुक्यातील जाणेफळ येथे गजानन बोरकर यांनी बीएसएनएल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, दीपक बोऱ्हाडे यांचे आझाद मैदानातील उपोषण नवव्या दिवशी पोहोचले असून “एकच मिशन, धनगर एस.टी. आरक्षण” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. शासनाने मागण्या मान्य करेपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नाही, असा निर्धार बोरकर यांनी व्यक्त केला असून प्रशासन सतर्क झाले आहे.

भंडारा जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा!

भंडारा जिल्ह्यात १७ ते २३ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ७६.३० हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. एकट्या लाखनी तालुक्यातील १६ गावांमधील शेती प्रभावित झाली असून १७५ शेतकऱ्यांचे प्राथमिक नुकसान नोंदवण्यात आले आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा, पोपट, उडीद, जवस आणि लाखा-लाखोरी ही पिके पावसामुळे मातीमोल झाली आहेत.

Sangli: कासेगाव येथे जयंत हिंदकेसरी बैलगाडी शर्यतीचा आयोजन..

सांगलीच्या कासेगाव या ठिकाणी जयंत हिंदकेसरी बैलगाडी शर्यतींचा मैदान आयोजित करण्यात आला आहे 26 मार्च रोजी रामनवमीच्या निमित्ताने भव्य बैलगाडी शर्यती पार पडणार असून बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने लाखो रुपयांची बक्षिसा बरोबर महाराष्ट्रात पहिल्यांदाचं बैलगाडी शर्यती मधील सहभागी बैलगाडी चालक व बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांना मोफत हेलिकॉप्टर राईड आयोजित करण्यात आली आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अतुल लाहिगडे यांच्या वतीने कासेगाव येथे जयंत बैलगाडी हिंदकेसरी बैलगाडी शर्यतींचा आयोजन करण्यात आले असून,त्यासाठी मैदान तयारीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे,या स्पर्धांमध्ये जवळपास 500 हून अधिक बैलगाडी स्पर्धा सहभागी होणार असून या ठिकाणी लकी ड्रॉच्या पद्धतीने बैलगाडी शर्यती पाहण्यासाठी येणाऱ्या महिलांना मोफत हेलिकॅप्टर मधून फेरफटका मारण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Mumbai Goa Highway: महामार्गावर केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर कार्यकर्ते अडचणीत

आंबा काजू बागायतदारांच्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी मुंबई गोवा महामार्गावर केलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाला न जुमानता रस्ता रोखल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी,माजी आमदार वैभव नाईक,नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह ३७ बागायतदार शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणात तपास सुरू असून आणखी काही जणांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Hadapsar: हडपसर परिसरातील कालवा फुटी प्रकरणी जलसंपदा मंत्र्याकडून अभियंत्यांना नोटीस

हडपसर परिसरातील कालवा फुटी प्रकरणी जलसंपदा मंत्र्याकडून अभियंत्यांना नोटीस

सोमवारी पहाटे शिंदे वस्ती येथे 22 किलोमीटरचा नवीन मोठा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे

पडसाद विधानमंडळात आणि सभा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाली आहेत

खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता उभा अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या तिघांना जलसंपदा मंत्री यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे

Pune: पुण्यातील कोंढवा येरवडा ड्रग्स हॉटस्पॉट शहरात पोलीस आयुक्त कडून विशेष मोहीम राबवली जाणार

कोंढवा येरवडा खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक ड्रग्स प्रकरणे झाल्याचे पोलीस निरीक्षणात समोर

कोंढवा लक्ष्मी नगर येरवडा काळेपडळ खडक आणि लोणी काळभोर पोलीस ठाणे अमली पदार्थाच्या प्रकरणात टॉप मध्ये

शिवाजीनगर डेक्कन कोथरूड वारजे पर्वती मार्केट यार्ड बाणेर लष्कर मुंडवा वानवाडी हडपसर लोहगाव वाघोली खराडी लोणीकंद सहकार नगर या सतरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणात आम्ही पदार्थाचे प्रकरणे समोर येत आहेत

यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून तर तंत्र अँटी ड्रग्स पथक स्थापन करण्यात येणार आहे.

दोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असूनही ड्रग्स विरोधी कारवाईवर लक्ष ठेवणार आहे

नगरसेवकांना माझ्या प्रभाग ड्रग्स मुक्त अभियान राबवण्यात येणार आहे प्रायोगिक तत्त्वावर चार प्रभागात उपक्रम राबवला जाणार

Pune: पहिल्या टप्प्यातील जनगणना एक मे पासून होणार...

जनगणनेच्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर घरी यादी व घरघरणा हे काम 16 मे ते 14 जून या कालावधीत पार पडणार आहे त्यापूर्वी एक ते पंधरा मे या कालावधीत नागरिकांना स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे...

Satara: सातारा जिल्हा परिषद निवडणूक अपहरण प्रकरणात महत्त्वाची अपडेट; तपास अधिकाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी अपहरण प्रकरणात अटकेत असलेल्या झेडपी सदस्य अनिल शिवाजीराव देसाई आणि संदीप नारायण मांडवे याना आज महाबळेश्वर न्यायालयाने प्रत्येकी ५०,०००/- च्या वैयक्तिक जामीन आणि तितक्याच रकमेचा हमीदार देण्याच्या अटीवर पोलिसांना तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले.

Ekvira: आई एकविरा देवी गडावर चैत्र यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी...

आई एकविरा देवी गडावर सुरू असलेल्या चैत्र यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली आह... पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून “आई ईकविरा देवी”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे. राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक गडावर दाखल होत आहेत.

यात्रेनिमित्त अभिषेक, महाआरती यांसारखे धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडत आहेत. तसेच गडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून त्यामुळे वातावरण अधिकच प्रसन्न आणि भक्तिमय झाले आहे.भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा तसेच वाहतूक नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत...

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल

भोंदूबाबा अशोक खरातवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल

नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात सातवा गुन्हा दाखल

करिअर घडवण्याच्या आमिषाने तरुणीचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार

संमोहित करून अत्याचार केल्याचा तक्रारीत उल्लेख

स्वतःला “महादेवाचा अवतार” सांगत विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी

जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यान वारंवार अत्याचार

भीतीमुळे पीडिता गप्प, अखेर तक्रार दाखल

आत्तापर्यंत अशोक खरातवर महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे ७ गुन्हे दाखल, गुन्ह्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत

मुंबईतील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची पहिली बदली

अभिजित भांडे पाटील यांची झोपडपट्टी पुनर्वसन विभागात बदली

अशोक खरातसोबत पत्नीच्या नावे गुंतवणूक भोवली, आता अनेक महसूल अधिकारी रडारवर

Mumbai: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सर्व आमदार आणि मंत्र्यांची पार पडली बैठक

मुंबई-

शिवसेनेचे आमदारांची बैठक पार पडली

या बैठकीला आमदार आणि मंत्री उपस्थित

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत

सातारच्या जिल्हा परिषदेच्या राड्यानंतर ही महत्त्वाची बैठक असणार आहे

या बैठकीतून शिवसेना आमदार आणि मंत्र्यांची भूमिका या बैठकीतून स्पष्ट होणार आहे

Mumbai: मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्कमध्ये भीषण आग, अनेक इमारतींचे नुकसान

मिरा-भाईंदर -

प्लेझंट पार्कमध्ये भीषण आग, अनेक इमारतींचे नुकसान

मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली.

सुदैवाने दुर्घटनेत कोणती जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

चार ते पाच इमारती या आगीच्या विळख्यात सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेनंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून वातावरण अत्यंत धोकादायक बनले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com