Ahmednagar News
Ahmednagar NewsSaam tv

Ahmednagar News: प्रांत कार्यालयाला घातली कांद्याला माळ; दर घसरल्‍याने राष्‍ट्रवादीचा रास्‍ता रोको

प्रांत कार्यालयाला घातली कांद्याला माळ; दर घसरल्‍याने राष्‍ट्रवादीचा रास्‍ता रोको
Published on

सुशील थोरात

अहमदनगर : कांद्याचे भाव कोसळल्याने पाथर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त (farmer) शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयाला कांद्याच्या (Onion) माळीचा हार घालून राज्य शासनाचा निषेध केला. (Breaking Marathi News)

Ahmednagar News
Sangli News: गावासाठी खोदली विहीर; कमी पडणारा निधी खिशातून टाकत पाणी प्रश्न लावला मार्गी

कांदा आणि कापूस या पिकाला हमीभाव मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत. या विरोधात केंद्र व राज्य सरकार निषेधात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव येथील प्रांत कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सरकार विरोधात घोषणाबाजी

या आंदोलनादरम्‍यान शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, पिक विमा रक्कम मिळाली पाहिजे; अशी आंदोलकांनी मागणी केली. तसेच चांगला भाव मिळत नसल्‍याने यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com