Breaking News: 'अहिल्यानगर' नामांतराला आव्हान! हायकोर्टात याचिका दाखल; शिंदे सरकारची डोकेदुखी वाढली

Ahmednagar City Name Rename: अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. २५ जुलैला याबाबत सुनावणी होणार आहे.
Ahmednagar News: 'अहिल्यानगर' नामांतराला आव्हान! हायकोर्टात याचिका दाखल; शिंदे सरकारची डोकेदुखी वाढली
Ahmednagar renamed as Ahilyanagar SAAM TV
Published On

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. २० जुलै २०२४

छत्रपती संभाजीनगर, धाराशिवनंतर आता अहमदनगर शहराच्या नामांतराचा वादही कोर्टात गेला आहे. अहमदनगर शहराचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. २५ जुलैला याबाबत सुनावणी होणार आहे.

Ahmednagar News: 'अहिल्यानगर' नामांतराला आव्हान! हायकोर्टात याचिका दाखल; शिंदे सरकारची डोकेदुखी वाढली
Pune News: अरे देवा! ३ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा CM शिंदेंच्या जाहिरातीत फोटो; कुटुंबीय चक्रावले, दर्शन घडवण्याची मागणी केली

अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद शेख व पुष्कर सोहोनी यांनी ही याचिका दाखल केली असून याची पहिलीच सुनावणी ही 25 जुलै रोजी होणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगर नावाची घोषणा केली होती त्यानंतर अहमदनगर महापालिकेच्या प्रशासकांनी देखील तसा ठरावं पाठवला होता.

Ahmednagar News: 'अहिल्यानगर' नामांतराला आव्हान! हायकोर्टात याचिका दाखल; शिंदे सरकारची डोकेदुखी वाढली
Maharashtra Politics : विधानसभेआधीच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात; दादांच्या आमदारांच्या दाव्याने खळबळ

त्यामुळे राज्यसरकारने मंत्रिमंडळात अहिल्यानगर नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून सध्या हे प्रकरण केंद्र सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान राज्यसरकारच्या या निर्णयाविरोधात आता जनहित याचिका दाखल करण्यात आल्याने याबाबत न्यायालय काय निर्णय घेणार याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ahmednagar News: 'अहिल्यानगर' नामांतराला आव्हान! हायकोर्टात याचिका दाखल; शिंदे सरकारची डोकेदुखी वाढली
Junnar Accident : कल्याण-नगर महामार्गावर भयानक अपघात, भरधाव कारची दुचाकीला धडक, पती-पत्नी १० फूट हवेत उडाले, थरारक VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com