

अहिल्यानगरच्या सोनई गावात ३ मुलांचा तलावात बुडून मृत्यू
मुलं पोहण्यासाठी तलावात उतरली होती
१ मृतदेह सापडला तर २ मुलांचा शोध सुरू
पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी
अहिल्यानगरमध्ये तलावात बुडून ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सोनई गावात ही घटना घडली. तिन्ही मुलं पोहण्यासाठी तलावात उतरले होते पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. हे तिन्ही मुलं एकाच गावातील आहेत. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनई गावामध्ये राहणारे ३ मुलं पोहण्यासाठी साठवण तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावामध्ये पोहण्यासाठी त्यांनी उडी मारली. पण ते बाहेर आले नाहीत. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका मुलाचा मृतदेह काढला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
दोन मुलांचे मृतदेह अद्याप सापडले नाही. पोलिस आणि स्थानिक या दोन्ही मुलांचा शोध घेत आहेत. सध्या घटनास्थळी बचावपथक देखील दाखल झाले आहे. त्यांच्याकडून देखील दोन्ही मुलांचे मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर तलावाजवळ गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. मृत्यू झालेले तिन्ही मुलं ८ ते १२ वयोगटातील आहेत. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.