Chandrapur News: शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीन वाढ; सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझेक रोगाचे आक्रमण

Yellow Mozak Disease On Soybean: कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळीच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Chandrapur News
Chandrapur NewsSaam TV
Published On

Agriculture News:

यंदा जुलै महिण्यात मुसळधार पाऊस बरसला. मात्र नंतर दीड महिन्यांची विश्रांती घेतल्यामुळे शेती संकटात आली आहे. त्यातच आता सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझेक रोगाचे आक्रमण दिसून येतेय. यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळीच काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Latest Marathi News)

चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझेक रोगाचे आक्रमण झाले आहे. जिल्ह्यातील वरोरा आणि चिमूर तालुक्यात या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलाय. याविषयीची माहिती मिळताच कृषी विभागाने तातडीने नियंत्रण पथकासह शेतशिवारांना भेटी दिल्या.

Chandrapur News
Uttar Pradesh Crime News: मुलगा सर्व पगार बायकोवर खर्च करतो म्हणून सासू भडकली; सुनेची सुपारी देत केली निर्घृण हत्या

हा विषाणूजन्य रोग सोयाबीन पिकाची वाढ तसेच फुलोरा आणि शेंगाधरणीच्या काळात फोफावत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होतेय. यापासून बचावासाठी रोगग्रस्त झाडे मुळातून उखडून जमिनीखाली पुरणे अथवा निळे व पिवळे सापळे लावणे हा उपाय करण्याची सूचना कृषी विभागाने केली आहे. 

या रोगामुळे उत्पादन क्षमता 30 ते 90% पर्यंत घटत असल्याने शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात धान आणि सोयाबीन या पिकांमुळे शेतकरी आपला प्रपंच कसाबसा पुढे रेटतो. या परिस्थितीत सोयाबीनसारख्या नगदी पिकावर घातक रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक स्थिती बिघडवणारा ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com