Abdul Sattar
Abdul Sattar Saam TV

लातूरमध्ये २८ शिवसैनिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात, काय आहे नेमकं प्रकरण?

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
Published on

लातूर : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडामुळं शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस (Maharashtra Government) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आज लातूर जिल्ह्यात राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत आहेत. परंतु, कृषीमंत्री येण्याआधीच शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंरतु, सत्तार यांना काळे झेंडे (Black flags) दाखवण्याच्या तयारीत असलेल्या २८ शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Abdul Sattar
उद्धव ठाकरेंचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल; म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे कान उघडण्याचे काम...

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यात राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार सोयाबीन नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सत्तार औसा तालुक्यातील विविध गावाच्या शिवारात भेट देणार आहेत. दरम्यान, औसा आणि निलंगा तालुक्यातील शिवसैनिक कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार असल्याने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

औसा पोलिसांनी तेरा तर निलंगा पोलिसांनी १५ शिवसैनिकांना काळया झेंड्यासह नजरकैदेत ठेवले आहे. तसेच कारसह काही दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. जिल्हा प्रमुख शिवाजी माने,संतोष सोमवंशी,विनोद आर्य,अविनाश रेशमे किशोर जाधव यांच्यासह पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com