औरंगाबाद : आदित्य ठाकरेंच्या मध्यस्तीनंतर मार्डचा संप स्थगित

औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील ओपीडी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे.
aurangabad ghati hospital opd resumes on monday
aurangabad ghati hospital opd resumes on monday
Published On

- अविनाश कानडजे

औरंगाबाद : औरंगाबाद (aurangabad) येथील घाटी रुग्णालयातील मार्ड निवासी डॉक्टरांचा संप आज (साेमवार) मागे घेण्यात आला आहे. औरंगाबाद घाटी रुग्णालयातील मार्डच्या निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू होते. परिणामी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील ओपीडी बंद होती. आज संप मिटल्याने ओपीडी पुर्ववत सुरु झालेली आहे. aurangabad ghati hospital opd resumes on monday

aurangabad ghati hospital opd resumes on monday
४ दिवसांत विद्यापीठाने निर्णय बदलला; ऑफलाईन नव्हे ऑनलाईन परीक्षा

हा संप सुरु असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्यासमवेत मार्ड संघटनेचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांची एक बैठक झाली. या बैठकीत वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रश्नांबाबत मंत्री ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. सध्या तात्पुरत्या स्वरूपात दोन हजार पदे भरण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.

राज्यातील कौन्सिलिंग तसेच प्रवेश प्रक्रिया राज्य शासन तातडीने पूर्ण करेल असे वचन मंत्री ठाकरे यांनी दिले. त्यामुळे आज (साेमवार) हा संप स्थगीत झाला आहे अशी माहिती औरंगाबाद येथील मार्डच्या निवासी डॉक्टरांनी दिली. दरम्यान औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातील ओपीडी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com