Crime News : पोलिसांची झाली नाचक्की; गंभीर गुन्ह्यातील संशयित तावडीतून पळाला

पोलिसांनी भांडण करणाऱ्या दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.
arrest, hingoli
arrest, hingoliSaam Tv

Hingoli Crime News : एका गंभीर गुन्ह्यातील संशियत आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाल्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. नरसी पोलिसांच्या तावडीतून संबंधित संशयित आरोपी पळून गेला आहे. वैद्यकीय तपासणीसाठी पोलीसांनी संबंधितास आणले हाेते. यावेळी पोलिसांच्या तावडीतून त्याने पलायन केले. (Hingoli Latest Marathi News)

नरसी पोलीस स्थानकात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांच्या काेठडीत असलेल्या संशियत आरोपीने वैद्यकीय तपासणी करत असताना पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे हिंगोली पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

arrest, hingoli
Satara News : साता-यातील राजवाडा परिसरात गाेळीबार; आप्पा मांढरे जखमी

नरसी नामदेव पोलीस स्टेशन हद्दीतील पुसेगाव येथे काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून हाणामारीची घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी भांडण करणाऱ्या दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. यामध्ये पोलिसांनी प्रवीण सुभाष देशमुख याच्यासह इतर दोन संशयितांना अटक (arrest) देखील केली होती.

arrest, hingoli
Kolhapur Crime News : काेल्हापूरात खळबळ; मित्राचा खून करुन युवक पाेलिसांना शरण

या तिघांना आज न्यायालयात हजर करावयाचे असल्याने पोलीस तिघांची आरोग्य तपासणी करण्यासाठी नरसी येथील आरोग्य केंद्रात घेऊन गेले, मात्र यावेळी त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेत असताना प्रवीण सुभाष देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन पलायन केले.

arrest, hingoli
Shivsena : संजय राऊतांनंतर ठाकरे गटाचा बडा नेता अडचणीत; कोर्टाने बजावलं समन्स

पोलीस आरोग्य केंद्राच्या बाहेर येईपर्यंत प्रवीण देशमुख हा फरार झाला होता. दरम्यान संशयित आरोपी पलायन प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रवीण देशमुख याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com