Mahrashrtra Politics: मंत्रिमंडळात फितुरी, राऊतांनी बाण सोडला; नेम कोणावर?

Sanjay Raut News: मंत्रिमंडळाच्या एका संभाव्य निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असताना त्यावर फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे.
sanjay Raut
Sanjay Raut On cabinet meetingSaam Tv
Published On

मुंबई: मंत्रिमंडळ निर्णय होण्याआधीच त्याच्या एका होणाऱ्या निर्णयाबाबतच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना तंबी दिली. तसेच मंत्रिमंडळ बैठकीआधीच घेण्यात येणाऱ्या निर्णयांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील कारवाईचा फडणवीसांनी इशारा दिला होता.

sanjay Raut
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींकडून मोठी चूक; छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजलीऐवजी वाहिली श्रद्धांजली

त्यावर संजय राऊत यांना विचारले असता, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बैठकीतून देखील असेच अजेंडे लिक होत होते, आणि आता तेच लोक तुमच्या सरकारमध्ये आहे. जे फितूर इकडे होते तेच आता तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. ते फितूर त्यांच काम योग्य प्रकारे आहेत. तसेच तुम्हीच त्यांना सरकारमध्ये बसवून सन्मानाची पद दिले आहे. आणि ते त्यांची भूमिका योग्य पद्धतीने निभावत आहे. असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लागवला आहे.

sanjay Raut
Marathi vs Non Marathi : महाराष्ट्रातच मराठी माणसांची गळचेपी; राजकीय नेत्यांकडून संताप, परप्रांतीयांच्या मुजोरीला जबाबदार कोण? कोण काय म्हणालं?

भाजपनं शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते

एकनाथ शिंदे फार ज्युनिअर आहेत, त्यांच्या हाताखाली आमचे वरिष्ठ नेते काम करणार नाही. असे मत अनेक नेत्यांचे होते. त्यांनी जर शब्द पाळला असता 50-50 चा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. असा दावा आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री पदासाठी इतर कुठले नाव पुढे आणण्याचा प्रश्नच येत नव्हता. उद्धव ठाकरे त्या बाबतीत प्रामाणिक आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाने आपला शब्द पाळला नाही. अशी टीका ही त्यांनी केली आहे. तसेच दिल्लीमध्ये ज्यांनी त्यांचा नुकताच सत्कार केला ते शरद पवार यांनी स्वत: एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध दर्शवला होता असेही संजय राऊत म्हणाले.

sanjay Raut
Raigad Crime: पोलिस ठाण्यात दोन गट भिडले, पोलिसांसमोरच कोयत्याने सपासप वार; तिघे गंभीर जखमी, पाहा VIDEO

तुम्ही रोज उठून दिल्लीला उठाबशा काढत आहात

विधानसभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक आयोग, पैसा आणि यंत्रणेचा वापर केला त्याच्यामुळे ती झाकी आहे. या शिवाय त्यांनी वेगळं काही आणले आहे का? तुम्ही आज ज्यांच्या दावणीला धनुष्यबाण बांधलेला आहे, चोरलेला आहे ते काही योग्य आहे का? रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाबशा काढत आहात. , माननीय शिवसेनाप्रमुखांना मान्य आहे का? त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. अशी सडकून टीका खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. त्यांना जर आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल तर कामाख्या मंदिर किंवा अन्या कुठे जायचं असेल तर त्यांनी जावं आणि आत्मचिंतन करावं. आपण मूळ शिवसेनेबाबत जे विधान करतो ते किती तथ्य आणि सत्य आहे, हे तपासावं. असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com