बीडमध्ये एसीबीची मोठी कारवाई; मुंडेंना लाच घेताना रंगेहाथ पकडलं; राज्यात खळबळ|VIDEO

Beed Parli Tehsildar Vyankatesh Munde Bribery Case Details: बीड जिल्ह्यातील परळी येथे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच प्रकरणात एसीबीने सापळा रचून कारवाई केली. सोलंसी प्रमाणपत्रासाठी लाच मागितल्याचा आरोप असून पुढील तपास सुरू आहे.
ACB officials conduct trap operation in Parli, Beed district, as Tehsildar faces bribery allegations.
ACB officials conduct trap operation in Parli, Beed district, as Tehsildar faces bribery allegations.Saam Tv
Published On

बीड: राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता बीडमध्ये ही एका तहसीलदाराला अटक केली आहे. बीड जिल्ह्यातील परळीमध्ये वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. तक्रारदाराकडून सोलंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

या तक्रारीनंतर लाच लुचपत पथकाने सापळा रचून कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. तक्रारदाराकडून सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर सौदा ठरल्याची माहिती समोर आली आहे. लाच लुचपत विभागात तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. दरम्यान, तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही एसीबीने आवश्यक पुरावे संकलित करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातही या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड एसीबीकडून केला जात आहे. भ्रष्टाचाराविरोधातील या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अशा कठोर कारवाया आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com