Abdul Sattar controversy: अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजप आक्रमक, नगरसेविकेने गाठलं पोलीस ठाणे

Abdul Sattar News: शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या वाढदिवशी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. यात कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर सत्तार चांगलेच भडकले होते. हुल्लडबाज तरुणांवर लाठीमार करा, असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले.
Abdul Sattar controversy
Abdul Sattar controversySaam Tv
Published On

Abdul Sattar controversy:

शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या वाढदिवशी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. यात कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला होता. त्यानंतर सत्तार चांगलेच भडकले होते. हुल्लडबाज तरुणांवर लाठीमार करा, असे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले. यानंतर आता भाजप आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी भाजप नगरसेविका रुपाली मोरेल्लू यांनी केली आहे. त्यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. गौतमी पाटील यांच्या लावणी कार्यक्रमात अब्दुल सत्तार यांनी अत्यंत खालच्या पातळीवर व अश्लील भाषेचा वापर करून, जन्मदात्या आई-वडिलांचा अपमान करून महिलांच्या भावना दुखावल्याची तक्रार त्यांनी केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Abdul Sattar controversy
Lok Sabha Election: PM मोदी यंदा रामेश्वरममधून निवडणूक लढवणार? दाक्षिणात्य राज्य फत्ते करण्यासाठी काय आहे BJP चा प्लान?

भाजप नगरसेविका रुपाली मोरेल्लू यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, वाढदिवसानिमित्त सध्या सिल्लोड शहरात नगरपरिषद मार्फत सिल्लोड महोत्सव साजरा होत आहे. याअंतर्गत सलग दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यातच बुधवारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हीच लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये जमलेल्या जमावाने अति उत्साहात हुल्लडबाजी केली होती. कॅबिनेट अल्पसंख्यांक मंत्री स्वतः स्टेजवर स्टेजवर गेले स्टेजवर जाऊन, त्यांनी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांना आदेशात्मक लाठीचार्जचे आव्हान केले.  (Latest Marathi News)

यात पुढे लिहिलं आहे की, यावेळी सत्तार असे म्हणाले की, ए पोलीस वाले त्यांना लाठी चार्ज करा, पाठीमागच्या लोकांना इतका मारा की, त्यांची हड्डी तुटून जाईल. मारा त्यांना. ए पोलीस वाले चला पाठीमागे, असं म्हणत त्यांनी आई-बहिणीवरून खालच्या पातळीत अश्लील शिवीगाळ केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

Abdul Sattar controversy
Amol Kolhe On Ajit Pawar: 'दगा देणाऱ्यांना श्रीराम कसे पावणार?', अमोल कोल्हे यांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

रुपाली मोरेल्लू यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, ''मंत्री अब्दुल सत्तार यांनी सार्वजनिक कार्यक्रमात व स्टेजवर अत्यंत खालच्या दर्जाची भाषा व अश्लील शब्द वापरून, जन्मदात्या आई-वडिलांचा अपमान करणारे शब्द व वाक्य वापरले. त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या असून, या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन, उपलब्ध सोशल मीडियावरील पुरावे व्हिडिओ Quw आधारे तात्काळ गुन्हा नोंद करण्यात यावा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com