Aapli Aaji : लिहिता-वाचता येत नाही, पण महिन्याला कमावते ७ लाख, नगरची 'आपली आजी' देशात फेमस, वाचा

Aapli Aaji Recipe Youtube Channel: आपली आजी हे युट्यूब चॅनल खूप प्रसिद्ध आहे. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अहिल्यानगरच्या ७४ वर्षीय आजी महिन्याला लाखो रुपये कमवतात.
Aapli Aaji
Aapli AajiSaam Tv
Published On
Summary

आपली आजी युट्यूब चॅनल

युट्यूबच्या माध्यमातून ७४ वर्षीय आजी कमवतायत लाखो रुपये

नातवाची आयडिया अन् आजी झाली फेमस

सोशल मिडिया हे प्रसिद्धीसाठी खूप मोठं माध्यम आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण खूप प्रसिद्ध होतात.यामध्ये युट्यूब, इन्स्टाग्रामचा समावेश आहे. या प्लॅटफॉर्मवर आपले व्हिडिओ टाकतात. हे व्हिडिओ व्हायरल होतात त्याला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळतात. या माध्यमातून अनेकजण लाखो रुपयांची कमाईदेखील करतात. अशीच एक आजी युट्यूबच्या माध्यमातून खूप प्रसिद्ध झाली. आजीने स्वतः चं युट्यूब चॅनल सुरु केलं आहे. या माध्यमातून त्या महिन्याला लाख रुपये कमवतात.

Aapli Aaji
Success Story: १०वीत नापास; सलग ६ वेळा सरकारी परीक्षेत फेल; वडिलांच्या एका सल्ल्यामुळे झाले IPS; ईश्वर लाल गुर्जर यांचा प्रवास

गोष्ट एका आजीची (Aapli Aaji Youtube Channel)

अहिल्यानगरच्या ७४ वर्षीय आजी सोशल मीडियावर खूप फेमस झाल्या आहेत. त्यांचे युट्युबवर लाखो फॉलोवर्स आहेत. त्यांनी वयाला कोणतंही बंधन नसतं हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं आहे. अहिल्यानगरच्या ७४ वर्षीय सुमन धामणे या महिन्याला लाखो रुपये कमवतात.

सुमन धामणे यांनी नातवाच्या मदतीने युट्यूबवर आपली आजी या नावाने चॅनल सुरु केलं. त्यांचे लाखो सब्सक्रायबर्स आहेत. महिन्याला त्या ५ ते ६ लाख रुपये कमवतात.

Aapli Aaji
Success Story: बाईपण भारी देवा! गृहिणी ते डीएसपी; संसारचा गाडा ओढत स्पर्धा परीक्षेत यश; अंजू यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

नातवाची आयडिया अन् आजी झाली युट्यूब स्टार (Aapli Aaji Youtube Success Story)

२०२० मध्ये या आजीने स्वतः चं युट्यूब चॅनल सुरु केलं. यामागे त्यांच्या नातवाची कल्पना होती. नातवाने आजीचा पावभाजी बनवतानाचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर त्यांनी असे अनेक व्हिडिओ बनवायला सुरुवात केले. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि मनोरंजक व्हिडिओने त्या सर्वांच्याच मनाला भिडल्या. त्यामुळे त्यांचे सबस्क्रायबर वाढत गेले. त्यांना युट्यूबकडून सिल्व्हर प्ले बटणदेखील मिळाले.

धामणे आजी यांचा प्रवास सोपा नव्हता. त्या कॅमेरा समोर येण्यास खूप घाबरत होत्या. त्यांना तांत्रिक गोष्टीही समज नव्हत्या. परंतु त्यांनी तरीही जिद्द सोडली नाही. नवीन गोष्टी स्विकारण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपला प्रवास सुरु केला.आज त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत.

Aapli Aaji
Success Story: कॉल सेंटर ते IPS, ८ बँकांच्या परीक्षा केल्या क्रॅक; दोनदा UPSC पास; सुरज सिंह परिहार यांचा प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com