Marathi News Live Updates : वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडाची पुणे पोलिसांनी काढली धिंड

Maharashtra Breaking News Live Updates : आज सोमवार दिनांक १९ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

Pune News : गावगुंडाची पोलिसांनी काढली धिंड

सांगवीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावगुंडाची पोलिसांनी धिंड काढली आहे. साठ फुटी रोड परिसरामध्ये गावगुंडाची पोलिसांनी धिड काढली आहे. नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी गाव गुंडाची धिंड काढली आहे.

Water Supply: पुणे शहरातील बहुतांश भागात २२ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे शहरातील बहुतांश भागात २२ ऑगस्ट रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागासह शहरातील इतर भागात संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील. जलशुध्दीकरण केंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद असणार आहे.

Pune Traffic:  पुण्यातील अनेक भागात वाहतूक कोंडी; पावासामुळे मंदावली वाहतूक

पुण्यातील शिवाजीनगर, वाघोली, खराडी भागात काही प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय. पावसामुळे वाहतूक कोंडी झालीय. अचानक आलेल्या पावसामुळं काही प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय.

Marathi News : जिंतूरचे माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी मनोज जरांगे पाटलांची घेतली भेट

परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे इच्छूक उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी आपल्या समर्थकांसह अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटलांशी भेटले, प्रताप देशमुख हे जिंतूर विधानसभा लढण्यासाठी इच्छूक असून त्यांनी आपला बायोडाटा जरांगे पाटलांकडे सादर केलाय.

Pune News : रवी लांडगे हे उद्या शिवबंधन बांधणार

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रवी लांडगे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. तसं पाहता रवी लांडगे आणि त्यांचे कुटुंबीय हे भाजपचे आणि जनसंघाचे निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत. मात्र भोसरी विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे विचार , त्यांची दडपशाही आणि हुकुमशाह प्रवृत्ती. पटत नसल्याने मी भाजप सारख्या समविचारी असलेल्या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे असा दावा रवी लांडगे यांनी केला आहे. भोसरी विधानसभा क्षेत्र हा शिवसेनेकडे असल्याने मला शिवसेनेने संधी दिल्यास मी निश्चितच महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटणार असे देखील रवी लांडगे यांनी स्पष्ट केला आहे. रवी लांडगे उद्या आपल्या जवळपास तीन चर हजार युवा कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जाऊन आपल्या हातात शिवबंधन मानणार आहेत.

Rain : बुलढाण्यातील रायपूर परिसरात मुसळधार पाऊस, नदीनाले तुडुंब

चिखली तालुक्यातील रायपूर गाव परिसरात सायंकाळच्या सुमारात दमदार पावसाने हजेरी लावली , एक तास मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील नदीनाले तुडुंब भरून वाहायला लागले, रायपूर गावा नजीक पळसखेड भट धरणात प्रथमच पाणी यायला लागले आहे... तसेच या पावसाने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे .. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचे चित्र दिसून आले आहे.. परिसरातील शेतकऱ्यांच्या हाती आलेले खरीपाचे पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

badlapur crime : मंगळवारी बदलापूर कडकडीत बंद

दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी उद्या बदलापूर कडकडीत बंद राहणार आहे. व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, ज्वेलर्स असोशियन, स्कूल बस असोसिएशनचा बंदला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला आहे. सकाळी साडेसहा वाजता संबंधित शाळेच्या बाहेर सर्व जमा होणार आहे.

ACB : विद्यार्थ्यांकडून लाच घेणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा, तीन जणांना बेड्या

Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून लाच घेणाऱ्या चौघांविरोधात ACB ने गुन्हा दाखल केलाय. त्यात तिघांना अटक करण्यात आलीय. महाज्योतीकडून पीएचडीच्या विद्यार्थ्याला महिन्याला ५० हजार ४०० रुपये फेलोशिप मिळत असते. त्यासाठी प्रोग्रेस रिपोर्ट, अटेंडंस द्यावे लागतात, ते रिपोर्ट देण्यासाठी दरमहा १० हजार रुपये असे तीन वर्षाचे एकत्रित ५ लाख द्यावेत अशी मागणी त्या विद्यार्थ्याच्या पीएचडी गाईडने केली होती. तडजोडीनंतर ५० हजाराची लाच स्वीकारताना पीएचडी गाईडच्या मुलाला रंगेहात पकडले आहे. लाचेची मागणी करणाऱ्या प्राध्यापिका संभाजीनगर शहरातील डॉ. रफिक झकेरिया महिला कॉलेजमधील ग्रंथपाल आणि पीएचडी गाईड डॉ. एराज सिद्दिकी, त्याच कॉलेज मधील कर्मचारी शेख उमर शेख गणी, पीएचडी गाईडचा मुलगा डॉ. सिद्दिकी मोहमद फैसोद्दिन, सिद्दिकी फराज मोहमद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तिघांना अटक करण्यात आलीय.

Rahul Gandhi :  राहुल गांधी यांना ४ ऑक्टोबर रोजी पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

राहुल गांधी यांना ४ ऑक्टोबर रोजी पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य प्रकरणी कोर्टाने आदेश दिले आहेत.

राहुल गांधी यांना न्यायालयाने समन्स बजावल्यानंतर तो स्वीकारणं त्यांच्यावर बंधनकारक आहे. जर समन्स मिळून सुद्धा अनुपस्थित राहिल्यास त्यांच्याविरुद्ध न्यायालय अटक वॉरंट सुद्धा काढू शकतं. स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधींना आज प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पुण्यातील सत्र न्यायालयाने दिले होते.

Pune Crime News : पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा हवेत गोळीबार

पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलाने वडिलांचे रिव्हॉल्व्हर घेऊन हवेत गोळीबार केला. वालचंदनगर पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद नोंद केली आहे.

Pune Porsche Car Accident: पुण्यातील कल्याणीनगर अपघातप्रकरणी आरोपींच्या जामीनावर उद्या निकाल

विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड येरवडा कारागृहात आहेत.

Pune Porsche Car Accident:  पोर्शे कार परत मिळण्यासाठी अगरवाल कुटुंबीयांनी केला अर्ज

पोर्शे कारच्या सुटकेचा निकाल २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. अपघातातील कार परत मिळण्यासाठी अग्रवाल कुटुंबीयांनी बाल न्याय मंडळात अर्ज केला आहे. या अर्जावर २८ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे पोर्शे कार अग्रवाल कुटुंबीयांना कधी परत मिळणार याबाबत त्याच दिवशी निर्णय होवू शकतो.

Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये CRPFच्या ताफ्यावर हल्ला, एक जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये CRPFच्या ताफ्यावर हल्ला जवान झाला आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे.

Dhule Rain : धुळ्यात पावसाची दमदार हजेरी

धुळ्यात पावसाची दमदार हजेरी

गेल्या कित्येक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा

गर्मीपासून हैराण झालेल्या नागरिकांना देखील वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे मिळाला दिलासा

अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ

Pune Traffic News : पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी

पुणे-नगर रस्त्यावर काहीशी वाहतूक कोंडी झाली आहे. सोमवारी संध्याकाळी आलेल्या पावसामुळे वाहतूक मंदावली. पुण्याती वाघोली परिसरात काही वेळापूर्वी पावसाने दमदार हजेरी लावली.

MIMच्या पत्रकार परिषदेत राडा

MIMच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये राडा झाला आहे. मुंबई प्रदेशाध्यक्षपद बदलण्यावरून काही चर्चा होती. मुंबई प्रदेश अध्यक्ष बदलला आणि त्यावरून राडा झाल्याची माहिती आहे. यावेळी इम्तियाज जलील पण होते. मुंबई अध्यक्ष फैयाज अहमद यांना पदावरून हटवले. त्यानंतर फैयाज यांच्या समर्थकांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये राडा केला.

Baramati Rain : बारामती शहरात जोरदार पावसाची हजेरी

बारामती शहर आणि परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच परिसरात कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारी अचानक ढग दाटून आले. तसेच वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला आहे.

Ahmednagar News: अहमदनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात

अहमदनगर शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Mumbai News: मुंबई -अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई -अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झालाय. ट्रक चालकच्या धडकेत दुचाकीवर असलेल्या पती आणि पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मिरारोडवरून विरारला भावाला राखी बांधण्यासाठी बहीण निघाली होती त्यावेळी हा अपघात झाला.

Pune News: पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील उपनगर भागात मुसळधार पाऊस पडत आहे. सलग तिसऱ्या दिवशी दुपारनंतर पाऊस पडत आहे. पुण्यातील हडपसर भागात जोरदार पाऊस पडत आहे.

Nashik News: नाशिक शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक शहरात तब्बल तासभर झालेल्या पावसानं नागरिकांची दाणादाण उडाली. मुसळधार पावसाने नाशिक शहरातील रस्ते जलमय झाले आहेत.

Pune News: बाजार समितीचे माजी संचालक नरसिंग तुपे यांचे निधन

बाजार समितीचे माजी संचालक नरसिंग तुपे यांचे निधन झाले. वृद्धापकाळाने तुपे यांचं निधन झालं. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. माजी खासदार अण्णासाहेब मगर यांच्या सोबत गुलटेकडी येथील नवीन मार्केट उभारणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

Delhi News: शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं राष्ट्रपतींना पत्र

शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचं राष्ट्रपतींना पत्र. महाराष्ट्र शक्ती फौजदारी (महाराष्ट्र सुधारणा) कायदा 2020 कायद्याला मंजुरी देण्याची केली विनंती. तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने महाराष्ट्र विधानसभेत मंजूर केला होता कायदा.

Pimpari Chinchwad:  संत मुक्ताबाईं देवस्थानांकडून ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी मुक्ताईनगर वरून आणलेली राखी अर्पण

मुक्ताईनगरच्या संत मुक्ताबाई देवस्थानच्या वतीने आजही शेकडो वर्ष चालत आलेल्या रक्षाबंधन सणाची परंपरा जोपासली जात आहे, संतोष श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची धाकटी बहीण असलेल्या संत मुक्ताबाईं देवस्थानांकडून ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी मुक्ताईनगर वरून आणलेली राखी अर्पण करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: महायुतीत मिठाचा खडा, दिलीप वळसे पाटील यांच्या जागेवर शिवसेनेचा दावा

वळसे पाटील यांनी नाईलाजास्तव निवडणूक लढविण्यापेक्षा मोठ्या मनाने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांची मागणी

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षमपणे काम करते आहे. जनतेचा जनाधार देखील त्यांच्या सोबत आहे.

महायुतीतील सर्व घटकपक्ष आपापल्या पद्धतीने सरकारची विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. महायुतीतील जागावाटप अजूनही ठरले नाही. जागा वाटप ठरविण्याचा अंतिम अधिकार महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना आहे.

Dhule News: धुळे शहरातील आग्रा रोड परिसराची अत्यंत दयनीय अवस्था

धुळे शहरातील आग्रा रोड परिसरात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून, या रस्त्यामध्ये खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले असून या ठिकाणी या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे, बऱ्याच वेळा या रस्त्यावरून प्रवास करत असताना खड्ड्यांमुळे अपघात देखील घडत असून, समोरच कॉलेज असल्याकारणाने या ठिकाणी नेहमीच विद्यार्थ्यांची वर्दळ असते, आणि याकडे प्रशासनाच दुर्लक्ष होत असल्यामुळे वाहनधारकांना याचा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे,

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची हजेरी, पिकांचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये आज दुपारी काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वैजापूर शहरांमध्ये सुरू असल्या आठवणी बाजारात पाणी घुसल्याने बाजारपेठ ठप्प झाली तर काही प्रमाणात नुकसानही झाले. त्यासोबत यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी मका बाजरी आडवी झाली. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेला आहे.

Matoshree News: 

मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांना रक्षाबंधननिमित्त सोलापूर, पुणे, परभणी, अकलूज येथील महिला भगिनींनी राखी बांधून आजचा दिवस साजरा केला. ही राखी विश्वासाची, प्रेमाची असून राज्यातील प्रत्येक माताभगिनींच्या पाठीशी ‘कुटुंबप्रमुख’ भाऊराया सदैव उभा आहे, हा विश्वास उद्धव ठाकरे यांनी ह्यावेळी व्यक्त केला.

Mira Bhayandar News: घोडबंदर किल्ल्यावर दारूच्या बाटल्यांचा खच, गड प्रेमींकडून आंदोलन

मिरा-भाईंदर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्श असलेल्या प्रसिद्ध घोडबंदर किल्ला मद्यपींचा अड्डा बनू लागला आहे. या विरोधात जंजिरे धारावी किल्ला जतन समितीकडून भाईंदर पश्चिम येथे उपोषण करण्यात येत आहे.वारंवार प्रशासनाकडे किल्ल्यावर चोवीस तास सुरक्षारक्षक ठेवण्यात यावा,सीसीटीव्ही लावण्यात यावे मात्र पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून किल्ल्याचे संवर्धन करण्यात येत आहे मात्र सुरक्षा रक्षक नसल्याने किल्ला मद्यपींचा अड्डा बनू लागला आहे तसेच अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांचे प्रमाण देखील वाढले आहे या विरोधात गडप्रेमींकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Ahmednagar News: आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य तसेच धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिटकरींच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध नोंदवत हिंदुत्ववादी संघटनांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

Nashik News: पालकमंत्री दादा भुसे यांना राखी बांधण्यासाठी लाडक्या बहिणींची मोठी गर्दी

लाडकी बहिण योजनेसाठी नाशिकच्या मालेगाव मधिल महिलां रक्षा बंधना पुर्वी पैसे हाती मिळाले होते.त्यासाठी मालेगावची प्रशासकीय यंत्रणेने रात्रीचा दिवस केला होता.तर पालकमंत्री दादा भुसे जास्तीत जास्त भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सतत प्रयत्नशिल होते.आज रक्षा बंधना निमित्ताने भुसे यांच्या कार्यालयात शेकडो महिलांनी योजनेचा लाभ मिळवून देणा-या भावाला राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी केली होती.लाडक्या बहिणींची संख्या मोठी असल्याने दोन्ही हातांना राखी बांधून घेण्याची वेळ दादा भुसे यांच्यावर आली.

Shirdi News: शिर्डी साईबाबांना 35 किलो वजनाची राखी अर्पण

रक्षाबंधना निमित्‍त छत्तीसगडमधील प्रबोधराव या भाविकाने साईबाबांना 35 किलो वजनाची तसेच 36 फुट लांब आणि 5 फुट रुंद अशी भव्‍य राखी समर्पित केली.. ही राखी बनवण्यासाठी 10 दिवस लागले असून यामध्ये फायबर प्लाय, मोती, जरी, बुटी आदींचे नक्षीकाम काम करण्यात आले आहे. साईबाबांनी आपल्या हातातीत लक्ष्मीबाईंना दिलेल्या नऊ नाण्यांची थीम या राखीमध्ये साकारण्यात आली आहे...

NCP Jansanman Yatra Mumbai: राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेत काँग्रेस आमदाराची बाईक रॅली

अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेनिमित्त काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांची बाईक रॅली.

बाईक रॅलीत वाहतूक नियमांना केराची टोपली. एकाही बाईक स्वाराकडून हेल्मेट सक्तीच पालन नाही, वाहतूक नियमांच्या सर्रास उल्लंघनाकडे वाहतूक पोलिसांचा देखील कानाडोळा

Amravati Rain: अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस; रस्त्यांना नदीचे स्वरुप

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यात मुसळधार पाऊस

चांदुर बाजार तालुक्यातील थुगाव पिपरी येथे मुसळधार पावसामुळे गावातील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. अनेक घरामध्ये पाणी शिरल्याने गावातील मोठे नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अति पावसाने शेती पिकांचे सुद्धा झाले नुकसान...

सोयाबीन ,तूर, कपाशी पिके पाण्याखाली..

तात्काळ प्रशासनाने पंचनामे करण्याची ग्रामस्थांची मागणी

Rakshabandhan 2024: चेंबूरमधील महिला आणि समाजसेवकांनी अनोखे रक्षाबंधन

चेंबूर मधील महिला आणि समाजसेवकांनी आज अनोखे रक्षाबंधन साजरे केले. चेंबूर च्या घाटला परिसरात असलेल्या कोळेकर हॉस्पिटल जवळ मोठ्या प्रमाणात वाईन शॉप, बार आहेत. इथे रस्त्यावरच अनेक जण रस्त्यावर दारू पित उभे असतात. या बाबत वारंवार तक्रार करून ही कारवाई होत नाही. म्हणून आज रस्त्यावर उतरत इथल्या महिलांनी व्यसनाच्या आहारी गेलेल्याना राखी बांधून व्यसन सोडवायच्या दृष्टीने ओवाळणी मागितली. या भावाला व्यसनमुक्ती करण्याचासाठी आणि इथली समस्या ही या निम्मितने प्रशासनासमोर मांडण्यासाठी हे अनोखे रक्षाबंधन पार पडले. या वेळी काही नशेच्या आहारी गेलेल्यानी या महिलांच्या पाया पडून दारू सोडण्याचे वचन ही दिले.दारू मुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत त्यामुळे दारू बंदीची मागणी देखील महिलानी केली.

Badlapur News :   बदलापूर प्रकरण; हलगर्जीपणा वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली 

लहान मुलींच्या अत्याचार प्रकरणातील हलगर्जीपणा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भोवलाय. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची बदली झालीय. नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून किरण बालवडकर यांनी पदभार स्वीकारला आहे.

Nanded News : नांदेडमध्ये धनगर समाजाच्या उपोषणाचा सातवा दिवस, एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी 

नांदेडमध्ये धनगर समाजाचे उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी नांदेडच्या मुखेड येथील तहसील कार्यालयासमोर अशोक नाईक या धनगर समाज बांधवाने आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका या उपोषणकर्तेनी घेतली.

Aalandi News : आळंदीत संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताई बहिण भावांचा रक्षाबंधनाचा सोहळा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज व संत मुक्ताई या बहिण भावांचा रक्षाबंधनाचा सोहळा समाधी मंदिरामध्ये संपन्न झाला. खानदेशातील मुक्ताईनगर येथून संत मुक्ताई देवस्थानकडून संत ज्ञानेश्वर महाराजांना रक्षाबंधनानिमित्त राखी पाठवली जाते. ही राखी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर ठेवून विधिवत पूजाअर्चा करून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत मुक्ताई यांचा रक्षाबंधनाचा सोहळा समाधी मंदिरात पार पडला..

Parbhani Rain : दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर परभणीच्या सेलू शहरात पावसाची हजेरी 

दोन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर परभणीच्या सेलू शहरासह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. सेलू शहरातील तेली गल्लीतील नाल्याला मोठया प्रमाणात पाणी आले. ह्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून नागरिकांना प्रचंड उकाड्या पासून दिलासा मिळालाय.

Nandubar News : सुरक्षा रक्षकासोबत नवनीत राणा यांनी साजरं केलं रक्षाबंधन

भाजप नेत्या नवनीत राणा यांना वाय प्लस पोलिस सुरक्षा आहे. त्यामुळे 24 तास नवनीत राणा यांची पोलीस सुरक्षा करतात, तर आज नवनीत राणा यांनी आपल्या सेवेत असलेल्या पोलिसांना राख्या बांधत रक्षाबंधन सोहळा साजरा केलाय. नवनीत राणा यांच्यासोबत असलेले पोलीस आपल्या घरी बहिणीला राख्या बांधायला जाऊ शकत नाही. त्यामुळे नवनीत राणा यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत उत्साहात रक्षाबंधन साजरं केलंय.

Mumbai News : कोलकाता घटनेप्रकरणी डॉक्टर आज देखील आक्रमक, आंदोलन सुरूच

कोलकाता घटनेप्रकरणी डॉक्टर आज देखील आक्रमक आहेत. आज देखील सकाळपासून देशभरात विविध ठिकाणी डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे. दिल्लीतील आरोग्य भवन असलेल्या निर्माण भवन समोर डॉक्टरांनी ओपीडी लावली. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा डॉक्टरांनी पवित्रा घेतलाय.

Pandharpur News : पंढरपूर पेड दर्शन प्रकरणी खासगी एजंटविरुद्ध गुन्हा दाखल

चार हजार रुपये घेऊन विठ्ठलाचे पेड दर्शन देणाऱ्या एका खाजगी एजंटविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील चेतन काबाडे या भाविकांकडून सुमित शिंदे या खाजगी एजंटने चार हजार रुपये घेऊन व्हीआयपी दर्शन दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वतः भाविकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यक्रमात नरहरी झिरवळ यांचा फोटो

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या फोटोने पुन्हा संभ्रम निर्माण झालाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यक्रमात नरहरी झिरवळ यांचा फोटो पुन्हा समोर आलाय. दिंडोरी तालुक्यातील जउळके गावतील आरोग्य केंद्राचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सुप्रिया सुळे, खासदार भास्कर भगरे यांच्या बरोबरच नरहरी झिरवळ यांचे फोटो लागल्याने चर्चांना उधाण आलंय.

Buldhana News : बुलढाण्यात कृषी विज्ञान केंद्रात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव संपन्न

कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथे कृषी विभागाचे वतीने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सातपुड्याच्या पायथ्याशी राहत असलेल्या गावातील महिलांनी आणि बचत गटाचे महिलांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता . या महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच त्यापासून बनवलेले पदार्थ सुद्धा तयार करून ठेवण्यात आले होते .

Worli hit and run case : मुख्य आरोपी मिहिर शहा याची मुंबई उच्च न्यायालयात धाव

वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहिर शहा याची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात हेबीस कॉर्पस याचिका दाखल केलीय. २१ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

Pune News : चाकणमध्ये आगळवेगळ रक्षाबंधन; महिला शेतकऱ्यानी झाडांना बांधली राखी

भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचा रक्षा बंधणाचा आज सण आहे. प्रत्येक बहीण आपल्या भाऊ रायाला ओवाळून भावाच्या हातावर राखी बांधते, मात्र चाकणच्या चिंबळी गावातील महिला शेतकऱ्याने आपल्या शेतातील फळ झाडांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने सण साजरा केलाय. त्याचबरोबर निसर्गाचा समतोल रहावा, यासाठी वृक्षांचे किती महत्व आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.

Nagpur News : नागपुरसह संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट

आज नागपुरात अनेक भागात 10 वाजताच सुमारास पाऊस सुरू झाला. शहरात सातत्याने दररोज पाऊस पडत आहे, कधी दुपारी तर कधी संध्याकाळी पाऊस पडत आहे. आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे.

Pimpari Chinchwad News : तापकीर वस्ती, मोशी येथे दोन मुले इंद्रायणी नदीमध्ये बुडाली

पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी नदी पात्रात दोन मुलं पाण्यात बुडाली आहेत. मोशितिल तापकीर नगर भागातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी पात्रात. दोन मुलं बुडाली आहेत. इंद्रायणी नदी पात्रात दोन मुलं पोहण्यासाठी गेली असताना ही दुर्घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड मानगरपालिकेच अग्नीशमन दल नदी पात्रात बुडालेल्या मुलांचं शोध घेतं आहेत.

Mhada News : माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांनी दंड थोपटले

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी थेट कुस्तीच्या मैदानातूनच विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अजित पवार गटाचे आमदार बबन दादा शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

Vidhan Sabha Election : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे राष्ट्रीय जनहित पक्षाकडून निवडणूक लढणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची नाशिकमध्ये मोठी घोषणा. राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार. संजय पांडे यांनी नाशिकमध्ये केली चार उमेदवारांची घोषणा. ते स्वतः मुंबईतून निवडणूक लढवणार.

Kolhapur News : कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर; गावठी पिस्टल बाळगणाऱ्याला अटक

Summary

कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले असून एका तरुणांकडून गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करून त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथील नागपंचमीच्या यात्रेत किरकोळ वादात थेट गावठी बनावटीचे पिस्टल काढून धमकावल्या प्रकरणी एकास कोल्हापूर पोलिसांनी अटक केलीय.

Kolhapur News : सीपीआरच्या चौथ्या मजल्यावर उडी घेऊन रुग्णाची आत्महत्या

कोल्हापुरातील छत्रपती शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असणाऱ्या रुग्णाने काल सायंकाळी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. साताप्पा लोहार असं मृत रुग्णाचं नाव आहे.

साताप्पा लोहार यांने विषारी द्रव पिल्याने पंधरा दिवसांपासून सीपीआरमध्ये उपचार घेत होता. प्रकृती सुधारल्याने आज त्याला डिस्चार्ज देण्यात येणार होता. दरम्यान काल सायंकाळी अचानक त्याने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या मध्ये तो गंभीर जखमी झाला आणि रात्री त्याचा मृत्यू झाला.

Jalgaon News : शिरसाळा ते बोदवड रस्त्याची दयनीय अवस्था

शिरसाळातील बोदवड रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून पायी चालणे देखील कठीण झाले आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती झाली असून याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे रस्त्यात सर्वत्र पावसाळ्यात पाणी साचत असून विद्यार्थ्यांनाही आपला प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागतो या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांसह विद्यार्थी वर्गाकडून होत आहे तात्काळ रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतल्या जाईल असा इशाराही या ठिकाणी ग्रामस्थांनी दिला आहे

Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काही भागात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. शनिवारी रात्री झालेल्या मध्यरात्रीच्या मुसळधार पावसानंतर रात्री पुन्हा मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे अकोट तालुक्यातल्या रुईखेड गावात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळं येथील ग्रामस्थांच्या प्रचंड हाल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com