Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२५, मुंबईमध्ये मविआचा मतचोरीविरोधात मोर्चा, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

धाराशिवच्या ₹140 कोटींच्या कामावरून महायुतीत वादाचा भडका

धाराशिव शहरातील ₹140 कोटी निधीवरून सुरू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाही.या कामामुळे महायुतीत वादाचा भडका उडाला आहे. शिवसेना आणि भाजप आमने-सामने आलेत. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांनी या कामांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचे गंभीर आरोप केले आहेत.तर जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी महायुतीत भाजप शिवसेनेला विचारात घेत नसल्याचा आरोप करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा जाहीर निषेध केला. त्यामुळे महायुतीतला वाद वाढण्याची चिन्ह आहेत.

Crime : ॲल्युमिनीयमची तार चोरणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

धाराशिव तालुक्यातील ढोकी हद्दीतील गोवर्धनवाडी परीसरातुन ॲल्युमिनीयमची तार चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडुन वाहनासह दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अब्दुल जोहर शेख अस पकडलेल्या संशयीत चोरट्याचे नाव आहे.पोलिस कळंब परीसरात गस्त घालत असताना चोरट्याची माहीती मिळाली असता पोलिसांनी छापा टाकला असता पाच किलोमीटर लांबीची तार व वाहन जप्त करण्यात आले असुन आरोपी ढोकी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

मुंबईमध्ये मोर्चा निघणार, पोलिासांची अद्याप परवानगी नाहीच

मतदार यादी मधील घोळ विरोधकांनी पुढे आणल्यानंतर आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेसचे नेते विजय वद्देतीवार खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीच्या रेखा जाधव असे अनेक नेते या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत फॅशन स्ट्रीट पासून सुरू होणारा मोर्चा महापालिका मुख्यालयासमोर समाप्त होणार आहे. या मोर्चाची पूर्ण तयारी झाली आहे मात्र अद्यापही मुंबई पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी दिली जरी नसली तरी विरोधक मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत

Mumbai News : मविआचे कार्यकर्ते मुंबईत दाखल 

महाविकास आघाडी कडून मत चोरी आणि निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ सत्याच्या मोर्चाच आयोजन करण्यात आल्याने महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते रेल्वेने चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये दाखल . कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता चर्चगेट रेल्वे स्थानकावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात.

Rain Update : भंडाऱ्यात पावसाने झोडपले,कडपा भिजल्या

भंडारा जिल्ह्यात निसर्गाने प्रलय ओतला आहे. दिवाळीनंतरही पावसाने थैमान घातले असून भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. परिपक्व झालेले धान बांधात पाण्यात भिजले असून धानाचा कडपाला अंकुर फुटले आहेत. हे धान वाचवणे अथवा कोरडे करणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे चित्र आहे.उभे पीक पाण्याखाली गेले असून, चिखलात अडकलेल्या पिकाची कापणी करणेही शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी-तीहेरी संकट कोसळले आहे. यामुळे पाच महिन्यांची मेहनत, कर्जाचा भार आणि कुटुंबाचा घाम एका झटक्यात वाहून गेला आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खचला असून, हतबलतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

dharashiv : धाराशिव जिल्ह्यात चार लाख शेतकरी अतिवृष्टीने बाधित; फक्त 90 हजारांनाच मिळालं अनुदान

सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत धाराशिव जिल्ह्यातील तब्बल चार लाख शेतकरी बाधित झाले,मात्र आतापर्यंत फक्त 90 हजार शेतकऱ्यांनाच अनुदान मिळालं आहे.जिल्ह्यात अतिवृष्टीसाठी 223 कोटींचं अनुदान प्राप्त झालं असल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.अतिवृष्टीने बाधित झालेल्या दोन लाख 30 हजार शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे.उर्वरित शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण झाल्यानंतर अनुदान वितरित केलं जाणार आहे.

Rohit Arya Encounter | मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार

राज्य सरकारकडे पैसे थकल्यानंतर 17 मुलांना ओलिस ठेवल्यानंतर एन्काऊंटर (Rohit Arya Encounter) झालेल्या रोहित आर्यचे शवविच्छेदन करण्यात आलं आहे. तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रोहित आर्यचं शवविच्छेदन करण्यात आलं. यावेळी रोहित आर्यच्या कुटुंबातील एक व्यक्ती शवविच्छेदन कक्षबाहेर उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय गुन्हे शाखेचे पोलिसही त्या ठिकाणी उपस्थित होते.

रोहित आर्यचे संपूर्ण शवविच्छेदन हे व्हिडीओ कॅमेऱ्यासमोर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. लवकरच हा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूबाबत पुढील गोष्टी स्पष्ट होतील अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे रोहित आर्यचा एन्काऊंटर हा बनावट होता की रियल होता हेदेखील स्पष्ट होणार आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला (Sikandar shaikh) पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिंकदरचा सहभाग असल्याचा आरोप प्राथमिक दर्शनी तपासातून समोर आला आहे. राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी त्याचा संबंध असल्याचे पोलिस (Police) तपासातून समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सिकंदरच्या कुटुंबीयांना बोलण्यास नकार दिला असून खोट्या गुन्ह्यात आमच्या मुलाला अडकवलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सिकंदरच्या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीला तर, दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीला सुरू होणार आहे.

MUMBAI | अतिवृष्टीग्रस्तांना २,५४० कोटींची मदत

राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार रुपयांच्या निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे. यात रब्बी हंगामासाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजचाही समावेश आहे. या मदतीचे चार शासननिर्णय आज प्रसिद्ध करण्यात आले. आजपर्यंत शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ११ हजार ५९३ कोटी ९४ लाख रुपयांचे वितरण केले आहे.

YAVATMAL: महसुली यंत्रणेची सुधारित पैसेवारी जाहीर

महसूल यंत्रणेकडून पीक परिस्थितीचा अंदाज घेऊन पीक पैसेवारी जाहीर करण्यात आली असून तीन टप्प्यात जाहीर होणाऱ्या या पीक पैसेवारीमध्ये सुधारित पैसेवारी जाहीर करताना यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे मान्य केले आहे.जिल्हा प्रशासनाने सुधारित पैसेवारी जाहीर केली असून जिल्ह्यातील 2046 गावांची पैसेवारी जाहीर करताना पीक परिस्थितीचा अंदाज घेऊन महसूल यंत्रणेत सुधारित अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालानुसार जिल्ह्याची पैसेवारी 48 टक्क्यापर्यंत खाली आली आहे.

Maharashtra Live News Update: मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

मुंबईतील आझाद मैदान येथे महाविकास आघाडीच्या होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी पालघर मधून मनसैनिक तुलसी जोशी सह कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

राज ठाकरे यांची सभा असो वा आंदोलने तुलसी जोशी यांचा नेहमी चलचित्र मार्फत हटके आणि वेगळापण दाखवण्याचा प्रयत्न

मानवी चलचित्राच्या माध्यमातन पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र  आल्याचे दाखविण्याचा प्रयत्न

मतचोरी करणाऱ्या सरकारविरोधात ठाकरे बंधूकडून चाबकाने मारत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com