विखे पाटलांवर खालच्या पातळीचे वक्तव्य केल्याने विखे समर्थकांमध्ये संताप...
लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारत आणि कुत्राच्या गळ्यात हाके यांचा फोटो लटकावून निषेध..
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सावळीविहीर येथे विखे समर्थकांनी केला हाके यांचा निषेध...
लक्ष्मण हाके यांच्या निषेधार्थ विखे समर्थकांची तीव्र घोषणाबाजी....
नाशिकच्या येवला शहरातील विंचूर चौफुली येथे वारंवार होणारे अपघात,वाहतुकीची कोंडी या विरोधात काल भ्रष्टाचार निर्मुलन समितीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला,याची दखल घेत येवला नगर पालिका प्रशासन अलर्ट मोडवर येत त्याने त्यांनी महामार्गावरील अतिक्रम काढण्यास सुरवात केली आहे,त्यामुळे छत्रपती संभाजी नगर-नाशिक,इंदोर-पुणे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे
वाशिमच्या कारंजा शहरातील कारंजा मित्र मंडळ मनोरंजन क्लब मध्ये नियमांचं उल्लंघन करून पत्त्यांचा जुगार खेळला जात असताना वाशिमचे पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई मोठी कारवाई केली आहे. या धाडीत 49 जणांवर कारवाई करत तब्बल 37 लाख 89 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईमुळे मात्र अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
अतिवृष्टी,पुरग्रस्त शेतक-यांसाठी शासनाने जाहीर केलेली मदत व प्रत्यक्षात मिळणारी मदत यामध्ये मोठी तफावत असल्याचे सांगत शासनाने शेतक-यांच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचे काम केले असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ येथील वाशी येथील छञपती शिवाजी महाराज चौकात घ्या केळ आंदोलव करुण शासनाचा निषेध करण्यात आला.व शेतक-यांना तात्काळ सरसकट कर्जमाफी,हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तसेच हक्काचा १०० टक्के पिकविमा वाटप करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थीत होते.
भाजप पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करण्यात येणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काय तयारी केली याची माहिती पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार
पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे भाजप पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत असलेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ही उपस्थित राहणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था कशा निवडणूका लढवायच्या आणि जिंकायच्या यांची रणनीती ठरणार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक भाजप स्वभावाला लढणार की युतीमध्ये यांबाबत चर्चा होणार
मुख्यमंत्री दुपारी एक वाजता पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील...
भाजप रॅली दरम्यान स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या घरावरती दारूच्या बाटल्या आणि दगडफेक झाली होती. या घटने नंतर आज शेकापच्या कार्यकर्त्यांनी गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी दहि दुध आणि पाण्याने शुद्धीकरण केले. या वेळी स्वर्गीय गणपतराव देशमुख अमर है अशा घोषणा ही देण्यात आल्या.
शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या घरावरती काल भाजपच्या रॅली दरम्यान हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी दारूच्या बाटल्या आणि दगडफेक केल्याची घटना घडली होती त्याच्या निषेधार्थ आज सांगोल्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आज सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात निषेध मोर्चा देखील करण्यात येणार आहे या निमित्ताने सांगोल्यातील सर्व बाजारपेठा दुकान ठप्प झालेली आहेत
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करून मेहकर व लोणार तालुक्यांचा मदतीच्या पॅकेजमध्ये समावेश करावा अशी ठाम मागणी केली अन्यथा आक्रमक आंदोलन करू असा इशारा दिला.
तुपकर यांनी पुढे इशारा दिला की,“जर मेहकर व लोणार तालुक्यांचा समावेश तात्काळ अतिवृष्टी ग्रस्तांच्या मदत पॅकेजमध्ये करण्यात आला नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन छेडेल. सरकारने या आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.”
- नाशिक महानगरपालिकेने सानुग्रह अनुदानाला दिली मंजुरी
- Level S-17 आणि त्यापेक्षा कमी वेतन गटातील अधिकारी-कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, सफाई कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी यांना 23,500 रुपये अनुदान मिळणार
- शासन अनुदानावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 14,100 रुपये इतके अनुदान देण्यात येणार
- मनपा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी घेतला निर्णय
- महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
शेतात काबाड कष्ट करून एका शेतकरी दांम्पत्याने आपल्या दोन्ही मुलींना शिकवले. आपल्या आई वडिलाच्या या कष्टाचं सोनं करत दोन्ही मुली एमबीबीएससाठी पात्र ठरल्या. ही यशोगाथा आहेनांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील किन्हाळा येथील साक्षी आणि दिव्याची. कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर दोन्ही बहिणीने यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होतं आहे.
मीरा-भाईंदर मध्ये हनुमान मंदिरावरून पुन्हा एकदा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालेलं पहायला मिळत आहे.
भाईंदर पूर्वेच्या श्याम भवन बिल्डिंगचे रीडेव्हलपमेंट चे काम होणार आहे. या बिल्डिंगला लागून असलेले हनुमान मंदिरावरून हा वाद सुरू झाला आहे. सरनाईकांच्या या कृतीवर नरेंद्र मेहता यांनी आक्षेप् घेत सरनाईक हे नुसते धर्मावरून राजकारण करत आहे.
देशभरात मत चोरीचा आरोप होत असताना धाराशिव मध्ये आता मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप करण्यात येतोय. नगरपालिकेची प्रभागातील मतदार सोयीनुसार कमी जास्त केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. ज्या ठिकाणी लोक वास्तव्याला आहे तिथून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर मतदान असल्याचं महाविकास आघाडीचे म्हणणं आहे. मतदार यादी बाबत आक्षेप नोंदवायला कमी कालावधी असल्याचही महाविकास आघाडीचे म्हणणं आहे. दरम्यान भाजपनेही यावर पलटवार केलाय विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली त्यामुळे आरोप केले जात आहेत आम्हीही याबाबत आक्षेप नोंदवले असल्यास भाजपच्या वतीने सांगितलं. मतदार यादीतील फेरपरीक्षा मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजप आमने-सामने. मतदार यादी मध्ये आक्षेप घेण्यास मुदत देण्यात आली आहे विहित कालावधीत विहित नमुन्यात आक्षेप दाखल झाल्यानंतर त्याबाबत सुनावणी घेऊन दुरुस्ती करू अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.
- पहिल्या वर्गापासून हिंदी अयोग्य, मातृभाषेलाच प्राधान्य देण्याची गरज
* त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॅा. नरेंद्र जाधव यांनी काल जाणून घेतली नागपूरातील तज्ज्ञांची मतं
- पाचवीनंतर तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश करावी विविध क्षेत्रातील मान्यवर नोंदवली मते
- *विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून जाणून घेतली हिंदी सक्तीबाबत मतं
- जास्तीत लोकांच्या सहभागातून हा अहवाल भविष्यदर्शी तयार करण्याचे त्रिभाषा धोरण समितीचे उद्दीष्ट
- यावेळी माजी आमदार नागो गाणार, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, समितीचे सदस्य वामन केंद्रे, डॉ. अपर्णा मॉरिस बैठकीत सहभागी
- यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईचे उपसंचालक संजय डोरलीकर, नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ . माधुरी सावरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जळगाव शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जात असून, वाघूर पंपिंग स्टेशन ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रादरम्यानच्या मुख्य जलवाहिनीत एअर व्हाल बदलण्याचे तसेच उमाळा जलशुद्धीकरण केंद्रावर दुरुस्तीचे काम शनिवारी केले जाणार आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. वाघूर पंपिंग स्टेशन ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान वीजपुरवठा करणाऱ्या ३३ के. व्ही. उच्चदाब विद्युत वाहिनीवर वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे वाघूर उच्चदाब वीज वाहिनीची देखभाल व दुरुस्ती, तसेच झाडांच्या फांद्याच्या छाटणीचे देखील काम 'महावितरण'चे कर्मचारी करणार आहेत. या कामांमुळे शनिवारचा नियमित पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून, तो रविवारी होईल तर रविवारचा पाणीपुरवठा हा समवारी तर सोमवारचा पाणीपुरवठा हा मंगळवार होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
डीसीबी सीआयडीकडून गुन्हा क्रमांक 596/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(4), 61(2) आणि 3(5) अन्वये प्रसिद्ध गुन्हेगार डी.के. राव, अनिल सिंग आणि मिमित भुता यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, मिमित भुताकडे गुंतवलेले 1.25 कोटी रुपये परत मागितल्यावर डी.के. राव आणि त्याचे साथीदार अनिल परेराव यांनी फिर्यादीला गंभीर परिणामांची धमकी दिली.
या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
धाराशिव तालुक्यातील आळणी येथील पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे.कला केंद्राला घालु दिलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार परवाना तत्काळ रद्द करण्यात आला आहे.या कलानाट्य केंद्राच्या संचालकाने परवाना मिळालेल्या अटींचे पालन न करता बेकायदेशीर कृत्ये केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासणीत आढळून आले. त्यामुळे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला होता.या अहवालाच्या आधारे परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला.
नांदेडच्या बिलोली तालुक्यातील चिंचाळा ग्रामपंचायत मध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केल आहे. चिंचाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर हे उपोषण सुरू करण्यात आल आहे. चिंचाळा गावात 15 वित्त आयोग योजनेअंतर्गत करण्यात आलेली कामे बोगस असून सरपंच आणि ग्रामसेविकेनी हा निधी परस्पर लाटल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. गावातील अनेक कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार सरपंच आणि ग्रामसेविकेने केला असल्याचा आरोप देखील यावेळी उपोषणकर्त्यांनी केला आहे.या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे.
सांगली महापालिके कडून सांगली शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे.विशेष म्हणजे मध्य रात्रीच्या सुमारास पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.दिवाळीच्या निमित्ताने शहरातल्या बाजारपेठ मधील असणाऱ्या विक्रेत्यांकडुन दुकानांच्या पुढे मंडप टाकण्यात आले आहेत,मात्र यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत, असल्याने महापालिकेकडुन ऐन रात्रीत बुलडोझर लावून रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मंडपाचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आले आहेत,यावेळी काही विक्रेत्यांकडून कारवाईला विरोध करत रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या कारवाई बद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पहाटेपासून दौरा सुरु
पुण्यातील वारजे भागातील विविध विकास कामांची अजित पवार पाहणी करणार
वारजेतील चौधरी चौकापासून पाहणीला सुरुवात करणार
वाहतूक कोंडी आणि रस्त्यांचा अजित पवार यांच्याकडून पाहणी
महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित
यवत पोलीस स्टेशन हद्दीत बोरीऐंदी येथील झुरंगे मळा या ठिकाणी सुत्रांच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, हा साठा नियमांबाहेर बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात येणार होता. स्थानिक पोलीसांनी त्वरित कारवाई करून साठा ताब्यात घेतला. Psi विजय कोल्हे यांनी ही कारवाई केली.
संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला नसुन रात्री उशिरा पर्यंत अवैध गुटखाचा पंचनामा चालू होता.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी अकोल्यात सुसाईड नोट आणि व्हाट्सअपवर स्टेटस ठेवत ओबीसी कार्यकर्त्याने आत्महत्या केली होती. विजय बोचरे असे या आत्महत्या केलेल्या ओबीसी कार्यकर्त्याचं नाव होतं. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या आलेगाव या ठिकाणी बस थांबा येथे मध्यरात्री त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपलं होतं. दरम्यान, आज बोचरे कुटुंबांयांची प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर सात्वन भेट घेतली. विजय बोचरे हे शेतकरी व ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते होते. तर छगन भुजबळ यांचे खंद्दे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्यानंतर जिल्हाभरात संतापाची लाट होती. आज सायंकाळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी आलेगाव येथे बोचरे यांच्या घरी जात कुटुंबाचे सांत्वन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.