
पती सतीश वाघ यांना ठार मारण्यासाठी मोहिनी वाघने तिचा मित्र अक्षय जावळकर याला हत्येची सुपारी दिली होती. सतीश वाघ याचा खून करून आरोपींनी शास्त्र भीमा नदीत फेकून दिली होती. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुद्धा पोलिसांना मोहिनी यांच्याकडून करायचा आहे, पोलिसांच्या वतीने न्यायालयात माहिती देण्यात आली. खून प्रकरणी झालेला आर्थिक व्याव्यहर मध्ये बँकेचे खाते देखील तपासायचे असल्याची पोलिसांनी न्यायल्यायला माहिती दिली. दरम्यान आज मोहिनी वाघ याला न्यायालयीन कोठडी सुनावण्ता आली आहे.
मालमत्ता जप्त करण्याचे अजूनही काही कारवाई झालेली नाही. आज कोर्टाची ऑर्डर येईल. त्यानंतर तीन आकडी पेक्षा जास्त अधिक खाते आरोपींच्या संबंधित लोकांचे असल्याची माहिती आहे. संबंधित लोकांचे खाते गोठवले जाणार आहे. आज दिवसभरात २५ जणांची चौकशी करण्यात आलीय. मोबाईल रिकव्हर डेटा फ्रँरसिक रिपोर्ट पाच दिवसात येण्याची शक्यता आहे.
यवतमाळचे शासकीय धान्य गोधाम येथील हमाली कंत्राटदार देवानंद शेळके यांनी पुरवठा अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न केला. विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हमाली कंत्राटदाराने बनावट कागदपत्राच्या आधारे हमाली कंत्राटदारी मिळविली मात्र तक्रार झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांची हमाली कंत्राटदारी रद्द करण्यात आली. हमाली कंत्राटदार देवानंद शेळके यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी विरोधात विभागीय आयुक्ताकडे तक्रार करण्यात आली. त्यांची सुनावणी येत्या 7 जानेवारी रोजी होण्याआधीच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये येऊन विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आपला प्राजक्ता माळी यांचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. जर माझ्या विधानातून प्राजक्ता माळी आणि इतर महिलांचा अनादर झाला असेल तर मी दिलीगिरी व्यक्त करतो असं आमदार सुरेश दस म्हणालेत.
जालन्यात शस्त्र हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल केल्यास कारवाईचा इशारा जालना पोलिसांनी दिला आहे. अवैध शस्त्र बाळगने , स्टाईलबाजी करणे आणि धाक दाखवणे, हा कायद्याने गुन्हा असून अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर जालना जिल्हा पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. देसीकट्टा, पिस्तूल असो किंवा मोठा चाकू,आणि खंजिर या शस्त्राचे सोशल मीडियावरती पोस्ट अपलोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
दरम्यान जालना जिल्ह्यात कोणी अवैध शस्त्र बाळगत असेल तर त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी अस आवाहन जालन्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी केल आहे..
खंडेरायाच्या जयघोषात दुमदुमली सोन्याची जेजुरी, 5 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा संपन्न झाली. लाखो भाविक ज्या क्षणाची वाट पाहता असतात ते देवाचे कर्हा स्नान संपन्न झाला. देवासोबत लाखो भाविकांनी सुद्धा कर्हास्नान केलं.
CID कार्यालयात त्या महिलेची आज पुन्हा चौकशी केली जात आहे. काल दिवसभर केजमध्ये या महिलेची दिवसभर चौकशी झाली होती. या महिलेवर CID ची बारीक नजर आहे.
विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड पवई वरून कांजुरमार्गच्या दिशेने जाणारी बेस्ट बस मध्येच बंद पडली त्यामुळे लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झालीय. विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड पवई वरून कांजुरमार्गच्या दिशेने जाणारी बेस्ट बस मध्येच तांत्रिक कारणामुळे बंद पडली असल्याने लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे आता प्रवासी पुढील प्रवास पायी चालत करत आहे.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. सीआयडीनं आज देशमुख यांच्या भावाची चौकशी केली. तसेच वाल्मिक कराड याच्या पत्नीचीही चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे मयत सरपंच श्री. संतोष देशमुख हत्याप्रकरणी यांचे धाकटे बंधू श्री. धनंजय देशमुख यांनी माननीय उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठ येथे वकील ॲड. शोमितकुमार व्ही. साळुंके यांच्या द्वारे पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला डायरेक्शन देण्याबाबत क्रिमिनल रिट पिटीशन ( Cr.WP) दाखल करण्यात आलेली आहे.
भंडाऱ्याच्या लेंडेझरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राखीव वनात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला. ही घटना देवनारा ते चिखली मार्गावरील राखीव वनातील देवनारा तलावाजवळ कक्ष क्रमांक ६२ मध्ये घडली. या घटनेने वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मृतक वाघ हा नर प्रजातीचा असून तो दीड वर्षाचा आहे. वाघाच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. देवनारा येथील तलावाजवळ शंकरपट बघायला गेलेल्या नागरिकांना हा वाघ मृतावस्थेत आढळून आला.
चेन्नईतील अण्णा युनिव्हर्सिटीतील लैंगिक अत्याचार प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी दिल्लीतील तामिळनाडू हाऊसबाहेर जोरदार निदर्शने केली.
खंडेरायाच्या जयघोषात दुमदुमली सोन्याची जेजुरी
कुलदैवत खंडेरायाच्या गडावर सोमवती यात्रेचा उत्साह
5 लाखांहून अधिक भाविकांची जेजुरीत गर्दी
परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी आरोपींना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी, त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपीला अटक करून कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी तसेच या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ बुलढाण्याच्या चिखली शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढला. यात पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तालुका क्रीडा संकुलापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात बाराशेपेक्षा अधिक शस्त्र परवाने दिले असताना आता क्षेत्रफळाच्या तुलनेत लहान असलेल्या हिंगोली जिल्ह्यात देखील 201 शस्त्र परवाने दिल्याची माहिती आहे. सामाजिक- राजकीय आणि लोकप्रतिनिधींना स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्र परवाने देण्यात आल्याची माहिती हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार आहे कारण एका दिवसासाठी तब्बल 65 हजार मध्ये दारू पिण्याचे लायसन्स काढले आहे. विदेशी दारूसाठी 55 हजार लायसन्स तर देशी दारूसाठी 10 हजार लायसन्स यामध्ये आहेत. तर राज्य उत्पादन शुल्काने बेकायदेशीर होणाऱ्या विक्री आणि घटना टाळण्यासाठी सात पथके तयार केली आहेत. मध्य निर्मिती कारखान्यांवर पथकाचे सीसीटीव्ही कॅमेरे लक्ष ठेवून आहेत. शहरामध्ये सात ठिकाणी पार्ट्या होणार असून त्यांनी देखील पार्टीसाठी लायसन्स काढले आहे. त्यामुळे मद्यपी जास्त झाल्यामुळे पोलिसांना आवडता येणार नाही त्यामुळे मद्यपीनो स्वतःची काळजी स्वतःच घ्या असंच म्हणावं लागेल.
आरोपी वाल्मीक कराड याला अटक केली असल्याची सध्या चर्चा आहे. मात्र बीड पोलीस आणि सीआयडी पथकाने कोणताही दुजोरा दिला नाही. आज संध्याकाळपर्यंत बीड शहरात वाल्मीक कराडला आणला जाऊ शकतो किंवा तो स्वतः शरण येईल अशी ही सध्या चर्चा सुरू आहे. त्यानंतर कोर्टामध्ये आणले जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर बीड पोलीस सतर्क झाले आहेत.
पत्नी आणि मुलगा घरातून निघून गेल्याने साताऱ्यात सत्वशील नगर येथे राहत असलेला यवतमाळ जिल्ह्यातील एका तरुणाने आपण शेतात गळफास घेणार असल्याचा व्हिडिओ तयार करून हा तरुण बेपत्ता झाला आहे. दिशांत दत्तात्रय पारंगकर असे तरुणाचे नाव आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एक पथक तयार करून दिशांत या तरुणाचा शोध सुरू केला आहे. दिशांतच्या पत्नी आणि मुलाला पोलिसांनी शोधून त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान दिशांतला शोधण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे
माजलगाव ते छत्रपती संभाजी नगर बस सेवा आजपासून बंद करण्यात आली असून बस गाड्यांची कमतरता असल्याने ही बस सेवा बंद करण्यात आली आहे माजलगावहून दररोज 300 ते 400 प्रवासी छत्रपती संभाजी नगर येथे प्रवास करायचे मात्र आता अचानक ही बस सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे
माजलगाव आगारातून सकाळी आणि दुपारी दोन बस छत्रपती संभाजी नगर येथे सोडण्यात येत होत्या आणि त्यातून आगाराला उत्पन्न देखील चांगला मिळत होतं मात्र आता या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. माजलगाव ते छत्रपती संभाजी नगरची बस सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी गैरसोय होत असल्याने ही बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे
राज्यातील सर्वात मोठे असलेल्या सोलापूरच्या उजनी धरणावर पर्यटन केंद्र उभारले जाणार आहे. याचबरोबर कृषी पर्यटन देखील सुरू केले जाणार आहे. कृषी पर्यटनासाठी राज्य शासनाने 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.
कृषी ,जल पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकारने उजनी धरणावर पर्यटन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. जानेवारी अखेर उजनी धरणामध्ये जल पर्यटन सुरू होणार आहे. 33 बोटी खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. जल पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटन देखील सुरू केले जाणार आहे. कृषी पर्यटनासाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी रिसाॅर्ट बांधण्यात येणार आहे. यासाठी देखील 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. येथील पर्यटन केंद्रामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. पंढरपूर ,तुळजापूर अक्कलकोट या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आता उजनी धरणावरील पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत
हडपसरचे आमदार चेतन तुपे पाटील शरद पवारांची मोदी बाग या कार्यालयात घेणार भेट
चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार
नववर्षाचा जल्लोष साजरा करताना कुठलीही घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त
गुन्हे आणि वाहतूक शाखेची स्वतंत्र पथके देखील असणार रस्त्यावर.
ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम राबविण्यात येणार.
भरधाव वेगाने चालवणाऱ्या दुचाकी चालकावर देखील होणार कारवाई..
अमरावती शहरातील प्रमुख चौकांमध्ये दामिनी पथक सुद्धा राहणार गस्तीवर..
अमरावती शहरातील 31 डिसेंबर रोजी 3 उड्डाणपूल देखील बंद ठेवण्यात येणार..
सायंकाळी 6 ते सकाळी 5 वाजेपर्यंत उडान पूल राहणार बंद.
या संदर्भात अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे..
कुठला ही आरोप धनंजय मुंडेवर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचे कोणतेच प्रयोजन नाही. कारण यात राजकारण आहे. आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचा मित्र आहे नातलग आहे याला महत्व नाही. वाल्मिक कराडला शभंर टक्के अटक होणार यात कोणतीही शंका बाळगू नये.
दीपक केसरकर
बीडच्या शासकीय विश्रामगृहावर दमानिया यांनी घेतली भेट..
दमानिया यांना जो व्हॉईस मेसेज आला होता, तो आठवलेंना ऐकवला..
मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न..
मात्र मी लढत राहणार, आपणही यात लक्ष घाला
भेटी दरम्यान संतोष देशमुख खून प्रकरणासह हत्या प्रकरणा विषयी नाही नाही झाली चर्चा
राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलाय
जळगाव, धुळे, सांगली या तिन्ही जिल्ह्यांत सुमारे दोन हजार सहाशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले
या व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी पावसाची नोंद असून या नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता पुणे कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर या केळीबहुल भागाला बसला. वादळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात गव्हाचे पीक आडवे झाले आहे. तर अनेक ठिकाणी हरभरा पिकाची फुलगळ झाल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी पुणे, मुंबईसह देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेत. खंडाळा लायन्स आणि टायगर पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची गर्दी झालीय. लोणावळ्याच निसर्ग सौंदर्य आणि प्रदूषणमुक्त वातावरण अनुभवण्यासाठी लोणावळ्यात आल्याचं पर्यटकांनी सांगितलं. अनेक पर्यटक कुटुंबासह लोणावळ्यात दाखल झाले असून पर्यटनाचा आनंद घेत असल्याचे चित्र सध्या लोणावळ्यात पाहायला मिळते.नवीन वर्ष साजरा करण्यासाठी पर्यटकांची पाऊले लोणावळ्या च्या दिशेने वळताना दासात आहे. दरवर्षी येथे पर्यटक हजारोंच्या संख्येने येत असतात. यंदाच्या वर्षी देखील सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोणावळा येथे पर्यटकांची गर्दी झाली आहे.
सध्या उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बर्फवृष्टी देखील होत आहे. याचा थेट फटका जालन्यातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय. उत्तर भारतात थंडी असल्यामुळे मोसंबीची मागणी घटल्याने मोसंबीला तीन रुपये किलो ते दहा रुपये किलो पर्यंतचा निश्चांकी दर मिळतो आहे. उत्तर भारतासह ,कानपूर, बनारस या मार्केटमध्ये देखील मोसंबी विक्रीसाठी अडचणी येत असल्याने आजपासून पुढील सात दिवस कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोसंबी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने घेतलाय. दरम्यान या सात दिवसात शेतकऱ्यांनी मोसंबी विक्रीस आणू नये अस आवाहन देखील बाजार समिती प्रशासनाने केल आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संत गजानन महाराजांच्या मंदिर परिसरामध्ये भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.. सलग नाताळ चे सुट्ट्या, सरत्या वर्षाचा निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी मोठ्या संख्येत राज्यभरातून भावीक शेगाव मध्ये दाखल झाले आहेत... आज सकाळपासून गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे... भाविकांची गर्दी लक्षात घेता भाविकांची कुठलीच गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून देखील विशेष अशी खबरदारी घेतली जात आहे..
पालघर शहरात एका आठ वर्षीय बालिकेवर लगतच्या ५४ वर्षीय किराणामाल दुकानदाराने विनयभंग केल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध (पॉक्सो) अंतर्गत पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाय आरोपीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
:तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या पुर्वी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस मंगळवारी सायंकाळी प्रारंभ होणार आहे.या पाश्र्वभूमीवर मंदीर संस्थानने मंगळवारी सायंकाळच्या तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधीच्या वेळेत बदल केला आहे.दरम्यान तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र महोत्सव ७ जानेवारीला घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे.शाकंभरी नवरात्र महोत्सव ३१ डिसेंबर ते १४ जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.
वाशिम जिल्ह्यात या वर्षात जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत सायबर चोरट्यांनी ७०६ घटनांमधून तब्बल ४ कोटी ५७ लाख ६९ हजार रुपयांवर हात साफ केला आहे. सायबर चोरट्यांकडून गुंतवणूकदारांना विविध प्रलोभने दाखवून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली बनावट व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुपद्वारे नागरिकांना फसवले जात आहे.
* चाकूने वार करुन जरीपटका कब्रस्तानातील व्यवस्थापकाची हत्या करण्यात आली आहे..
* मेकोसाबाग येथील प्रोस्टेट ख्रिश्चन कब्रस्तानातील रविवारी दुपारी तीन वाजता दरम्यानची घटना..
* भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जरीपटका पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे..
* एनॉन पियरजी असे अटक कऱण्यात आलेल्या आरोपीचं नाव रमेश शिंदे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून शिंदे हे जरीपटका कब्रस्तानात व्यवस्थापक होते..
* घटनेची माहिती मिळताच झोन 5 चे उपायुक्त निकेतन कदम आणि जरीपटका ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सिंग घटनास्थळी पोहोचले व त्यानंतर आरोपीला अटक केली आहे...
Nashik News : सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी
- सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी
- येत्या २ जानेवारीपर्यंत सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार
- आजपासून सप्तशृंगी देवीचं मंदिर २ जानेवारी पर्यंत मंदिर २४ तास खुलं ठेवण्याचा निर्णय
- सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय
- भाविकांच्या सोयीसाठी २ जानेवारी पर्यंत मंदिर २४ तास खुलं ठेवण्याचा निर्णय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.