
परभणीच्या सेलू येथील निम्मंन दुधना प्रकल्प जायकवाडी वसाहत येथील कार्यालयालाभीषण आग लागल्याची घटना सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली, आगीत कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे जळून गेली आहे, आगीच कारण मात्र अद्याप अशपष्ट आहे,आगीवर नियंत्रण मिळवण्याच काम युद्ध पातळीवर सुरू आहे, मानवत ,सेलू येथील अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहे.
इमारतीला आग लागल्याची माहिती आहे. दुकान किंवा गोडाऊन असल्याची शक्यता आहे. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग शमवण्याचे काम सुरू आहे.
नाशिक शहरातील नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटना मूक मोर्चात सहभागी झाल्या आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबला नाही तर उद्रेक पाहायला मिळेल, हिंदुत्ववादी संघटनेचा इशारा. नाशिकच्या पंचवटी, नाशिकरोड, सिडको, गंगापूर रोड अशा विविध भागातून हिंदू संघटनांचा मोर्चा निघाला आहे.
नंदुरबार शहादा तालुक्यातील असलोद येथे दारूबंदीसाठी सुरू असलेलं मतदान संपले
शहादा तालुक्यातील असलोद येथील मतदान संपले.
1216 पैकी 677 महिलांनी बजवला मतदानाचा हक्क.
दारू बंदीसाठी महिलांनी मतपत्रिकांवर बजावला मतदानाचा हक्क.
एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक काका देशमुख यांचे हृदय विकाराच्या झटक्याने काल निधन झाले. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी देशमुख कुटुंबीयांना दिली सांत्वनपर भेट घेतलीय.
महाविकास आघाडी आता ईव्हीएम वर आक्षेप घेत आहे. पण माझं त्यांना आता आव्हान आहे. अमरावतीच्या खासदारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि आमदार रवी राणा देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील आणि ते निवडणूक देखील बॅलेट पेपरवर करा. लोकसभामध्ये जास्त जागा निवडून आल्या तेव्हा ईव्हीएमबरोबर होती आणि लोकशाही जिवंत होती, असा सवाल नवनीत राणा यांनी केलाय.
शिंदखेडा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार रावल सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले असुन, त्यांना विधानसभेत तालिका अध्यक्ष पदाचा सन्मान मिळाला आहे, उत्तर महाराष्ट्रासाठी ही सन्मानजनक बाब असून आमदार जयकुमार रावल यांचे धुळ्यात आगमन होताच गोंदूर विमानतळ या ठिकाणी त्यांचे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले आहे, धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी देखील जयकुमार रावल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे
राज ठाकरे यांची निवडणुकीत हवा गेली त्यांना वाटायचे माझ्याशिवाय सत्ता येणार नाही मात्र त्यांचे स्वप्न भंग झाले - रामदास आठवले
काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात लोकशाही वाचविण्यासाठी EVM हटाओ स्वाक्षरी मोहिम राबविली जात असून याच धर्तीवर नांदेडच्या मुदखेड तालुक्यात EVM हटविण्यासाठी 50 हजार स्वाक्षरीचा संकल्प काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. या मोहिमेची सुरवात मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.मुदखेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.लोकसभा निवडणूक असो की, महाराष्ट्र तथा हरियाणा विधानसभा निवडणुक असो यांच्या निकालात झालेला संख्यात्मक गोंधळ आणि निवडणूक आयोगाकडून न मिळणारी समाधानकारक उत्तरे यामुळे देशात EVM विरोधात मोठा रोष व्यक्त होत आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर पोलिसांनी रात्री सापळा रचून राजस्थान मधून महाराष्ट्रात प्रतिबंधित घुटका वाहतूक करणारा कंटेनर राष्ट्रीय महामार्गावर पकडला . या कंटेनर मध्ये जवळपास 63 लाख रुपयांच्या घुटक्यासह पोलिसांनी 86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अलीकडच्या काळात ही पोलिसांची मोठी कारवाई मानल्या जात आहे. या कारवाईत पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय.
दिग्रस मतदारसंघातून सलग पाच वेळा मोठ्या मताधिक्य घेऊन निवडुन येणाऱ्या आमदार संजय राठोड यांना महायुती सरकारच्या मंत्री मंडळात मंत्रीपद मिळावं यासाठी बंजारा समाजातील नागरिकांसह महिलांनी पोहरादेवी रॅली काढली.दिग्रस इथे हजारोंच्या संख्येने बंजारा समाज एकवटला असून मंत्रीपद मिळावं यासाठी पोहरादेवी येथील मंदिरात जगदंबा माता आणि सेवालाल महाराज यांना साकडे घालणार आहेत.
मारकडवाडीतून शरद पवार माघारी फिरताच माजी आमदार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत जय श्रीराम असा नारा दिला. ईव्हीएम हटाव देश बचाओ असा नारा देत येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मारकडवाडी येथे येऊन ग्रामस्थांची संवाद साधला. शरद पवार गावातून माघारी फिरताच भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी माजी आमदार राम सातपुते यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत उत्तम जानकर यांच्यावर टीका केली आहे.
राज्य मंत्री मंडळात समावेश करण्यासाठी शिनसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केले.
शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास.
बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे सेनेचे वरिष्ठ नेते लवकरच बेळगावला जाणार
शिंदे सेनेचे वरिष्ठ नेते उदय सामंत आणि अन्य दोन नेते सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समिती च्या नेत्यांसोबत बोलणार
राजकीय नेत्यांना बंदी घालण्याच्या मराठी एकीकरण समितीच्या निर्णयाबाबत चर्चेने मार्ग सोडवणार
धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या हवामानातील बदलाचा परिणाम हा रब्बी पिकांवर दिसून येत आहे, अरबी समुद्रात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव राज्यातील अनेक भागात दिसून येत आहे. फेंगल चक्रीवादळाने ढगाळ वातावरण निर्माण झाले असून वातावरणातील बदलाचा रब्बी पिकांना मोठा फटका बसणार आहे, यामुळे धुळे जिल्ह्यात तुर, कापूससह गहू, हरभरा ही रब्बी पिके धोक्यात सापडली आहेत.
दरम्यान ढगाळ वातावरण काही दिवस राहणार असून पुन्हा एकदा लवकरच थंडी परतायला सुरूवात होईल असा विश्वास कृषी तज्ञांनी व्यक्त केला असून, शेतकऱ्यांनी वातावरणातील बदलास घाबरून न जाता योग्य पद्धतीने पिकांची काळजी घ्यावी असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.
महाविकास आघाडी देखील विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार?
महाविकास आघाडीच्या बैठकीत अध्यक्ष पदाबाबत चर्चा
शपथविधी पार पडल्यानंतर लगेच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बसणार आणि विधानसभा अध्यक्ष पदासाठी फॉर्म भरणार की नाही याबाबत निर्णय घेणार
सूत्रांची माहिती
राहुल नार्वेकर थोड्याच वेळात भरणार अर्ज
विधानसभा अध्यक्ष पदासाठी भरणार उमेदवारी अर्ज
चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत नार्वेकर भरणार अर्ज
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातून ईव्हीएमला विरोध होत आहे. बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. आज मारकडवाडी गावाला शरद पवार यांनी भेट दिली आहे. याच दरम्यान गावातील दुसरा गट पुढे आला आहे. गावातून भाजप उमेदवार राम सातपुते यांना जे लीड मिळालं ते त्यांच्या विकास कामांमुळे मिळालेला आहे. ईव्हीएम मशीनमध्ये कुठलाही घोळ झाला नाही. आमदार उत्तम जानकर यांची स्टंटबाजी सुरू आहे. असा आरोप आता मारकडवाडी गावातीलच दुसऱ्या गटांनी केला आहे. शरद पवारांच्या सभेला स्थानिक मारकडवाडी मधील एकही मतदार उपस्थित नाही. गावाच्या बाहेरचे लोक आलेले आहेत असा आरोप केला आहे.
मारकडवाडी ग्रामस्थांनी लोकशाहीतील हुकुमशाहीच्या थोबाडीत मारली आहे. फक्त मारकडवाडीच नाही तर माळशिरस च्या मतमोजणी विरोधात संपुष्टात तालुक्यात आक्रोश आहे. बॅलेट पेपरवरील मतमोजणीसाठी सर्व उमेदवारांना आमंत्रित केले होते. पण इतर उमेदवार आले नाहीत. बॅलेटवरील मतमोजणी होऊ नये, यासाठी सीआरपीएफच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. मी खरोखरचा राजीनामा देतोय. हे कोणालाच मान्य नाही, असे उत्तम जानकर म्हणाले.
उत्तम जानकर, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट
अकोल्यातल्या अकोट तालुक्यातील कावसा-कुटासा रस्त्यावर दोन दुचाकी आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर अकोला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरुये. कावसा-कुटासा रस्त्यावर काल रात्री हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. अविनाश मांगीलाल चव्हाण याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दिनेश चव्हाण, राहुल कास्तकार, लखन चव्हाण, आणि शिवा पाटील हे चौघे गंभीर जखमी झाले.
शरद पवार माळशिरसमधील मारकडवाडी येथे दाखल झाले आहेत. आज ते गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. बॅलेट पेपरवर मतदान घेण्यामुळे मारकडवाडी चर्चेत आी.
ठाण्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा मृत्यू नंतर त्यांच्यावर काही दिवस जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.दुपारी त्यांच्यावर ठाण्यातील जवाहर बाग स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मारकडवाडीमध्ये जाण्यासाठी शरद पवार कोल्हापूरवरून रवाना झाले आहेत.
हिवाळी अधिवेशना संदर्भात आज मुहूर्त ठरणार
नागपूर अधिवेशनाची तारीख आजच ठरणार
विधानसभेसाठी काय कामकाज ठेवता येईल? यावरही होणार चर्चा
विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सामील होणार का? याकडे लक्ष
मराठा आरक्षणाच्या संदर्भात आजपर्यंत आडमुठी भूमिका घेतल्यामुळेच मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे असा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी नाव न घेता जरांगे पाटील यांच्यावर केला आहे.मात्र आता समाजाला सत्य सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही लवकरच मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा बांधव बैठकीचे आयोजन करून निर्णय घेणार असल्याचं नागणे यांनी सांगितले.मराठा समाजाला घटनात्मक पद्धतीने 50% च्या आतून ओबीसी मधून आरक्षण द्यावे अन्यथा आम्ही शांत बसणार नाही असा इशारा सरकारला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.