

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निर्धार मेळाव्यात मतदार याद्यांची पोलखोल
मतदार याद्यांमधील बोगस नावे आणि चुकीची माहिती सर्वांसमोर आणली.
या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या निर्धार मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरेंनी मतदार याद्यांमधील घोळ सर्वांसमोर आणला. निवडणूक आयोग कशाप्रकारे जनेतच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. कसा अंदाधुंद कारभार चालू आहे, हे उदाहरणासह दाखवून दिलं. मतदार याद्यांमध्ये कसा घोळ आहे, हे दाखवून देण्यासाठी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातील मतदार याद्याचे सादरीकरण केलं. यात दाखवण्यात आलेल्या यादीतील घोळ पाहऊन अनेकांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली.
दिल्लीत राहुल गांधी यांनी जसं सादरीकरण केलं, अगदी तसेच मुंबईतील मतदार यादीतील घोळाचा सादरीकरण आदित्य ठाकरेंनी केलंय. मुंबईत शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली आहे. यात प्रचंड घोळ असून तो कशा पद्धतीने करण्यात आला? याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.
मतदार याद्यांतील मोठा घोटाळा उघड करत आदित्य ठाकरेंनी 'बोगस सरकारचे बोगस मतदार' असा घणाघात सत्ताधाऱ्यावर केला. लोकसभेत २,५२,९७० मतदार होते तर विधानसभेच्यावेळी २,६३,३५२ मतदार झाले. यात १६,०४३ नवीन मतदार जोडले गेले. तर ५,६६१ काढले गेले. यात १९,३३३ मतदारांची गडबड असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
मतदार याद्यांतील मोठा घोटाळा उघड करत आदित्य ठाकरेंनी 'बोगस सरकारचे बोगस मतदार' असा घणाघात सत्ताधाऱ्यावर केला. लोकसभेत २,५२,९७० मतदार होते तर विधानसभेच्यावेळी २,६३,३५२ मतदार झाले. यात १६,०४३ नवीन मतदार जोडले गेले. तर ५,६६१ काढले गेले. यात १९,३३३ मतदारांची गडबड असल्याचा दावा आदित्य ठाकरेंनी केला.
नावातील घोळ दाखवताना आदित्य ठाकरेंनी पहिला दाखवला तो मराठी आणि गुजराती नावाचा. मतदार मुलाचे नाव मराठी गिरीश गजानन म्हात्रे त्यामुळे वडिलांचे नाव हे गजनान म्हात्रे असणं आवश्यक होत. पण मतदार यादीत नाव हे मानजी पटेल. दुसऱ्या मतदाराचे नाव हे राम बंधन यादव आणि वडिलांचे नाव सहदेव वाघमारे. तिसरा मतदार संतोष कुमार सरोज तर वडिलांचे नाव राधे श्याम राधे श्याम. अशी नावात घोळ असलेले ४ हजार मतदार आढळून आल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.