

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील घाट माथ्यावर गनिमा काव्याने बैलगाडी शर्यत पार पडली आहे. पोलिसांना चकवा देत मैदान बदलून ही बैलगाडी शर्यत पार पडली आहे. या शर्यती मध्ये सात गाड्याच्या समावेश होता. ही बैलगाडी शर्यत होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
संचारबंदी ही लावण्यात आली होती. तरी सुद्धा बैलगाडी दुसऱ्या ठिकाणी भरवण्यात आली. यावेळी कार्यकर्ते आणि बैलगाडी चालक मालक यांनी एकच जल्लोष केला आहे. या ठिकाणी गोपीचंद पडळकर काही वेळा पुर्वी दाखल झाले आहेत. पोलिसांना शर्यतीचा पत्ता लागताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, राज्यात बैलगाडा शर्यत सुरु व्हावी यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत आयोजीत केली होती. सकाळी ६.३० वाजता पोलिसांच्या नाकावर टिच्चून शर्यत पार पडली आहे. ही शर्यत पार पडल्याने बैलगाडा प्रेमी आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.
सरकारने यातून बोध घेवून बैलगाडा शर्यत सुरु करावी अशी मागणी बैलगाडा मालकांनी केली आहे. ही शर्यत पार पडल्यानंतर राज्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आजची बैलगाडी शर्यती ही सुरुवात आहे, यापुढे सरकारने हालचाली केल्या नाहीत तर मंत्र्यांना मंत्रालया बाहेर पडू देणार नाही, असा इशारा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.