Ratnagiri News : घशात चॉकलेट अडकून ९ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

एका ९ महिन्यांच्या बाळाचा घशात चॉकलेट अडकल्याने मृत्यु झाला आहे.
Ratnagiri Sakhari Agar Village Chocolate
Ratnagiri Sakhari Agar Village Chocolate Canva
Published On

जितेश कोळी, साम टीव्ही

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ९ महिन्यांच्या बाळाचा घशात चॉकलेट अडकल्याने मृत्यु झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील गुहागरमधील साखरी आगर गावात ही दुदैवी घटना घडली आहे.

Ratnagiri Sakhari Agar Village Chocolate
Pune Crime : मित्रानेच केला मित्राच्या पत्नीवर अत्याचार, माणुसकीला काळीमा फासणारी घटना

रिहांश तेरेकर (वय ९ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रिहांशला त्याच्या घरच्यांनी जेलीचे चॉकलेट खाण्यासाठी दिले होते. नकळत ते खाताना त्याच्या घशात अडकले. त्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. (Latest Marathi News)

दरम्यान, कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचारासाठी गावातील एका डॉक्टरांकडे नेले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान, डॉक्टरच्या सल्ल्यावरुन त्याला घोणसरे येथे नेत असताना रस्त्यातच रिहांशचा बाळाचा मृत्यू झाला.

Ratnagiri Sakhari Agar Village Chocolate
Nitin Gadkari : रस्त्यांच्या कामात गडबड कराल, तर थेट बुलडोजरखाली घालू; नितीन गडकरींचा ठेकेदारांना दम

रिहांशच्या अचानक अशा निघून जाण्याने त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या दुर्देवी घटनेमुळे साखरी आगर गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद गुहागर पोलिसांत करण्यात आली आहे.

लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतात. त्यामुळे आई-वडील नातेवाईक त्यांना चॉकलेट घेऊन देतात. मात्र, पालकांनी आपल्या पाल्यांना कोणत्या चॉकलेट देत आहोत, तसेच ते चॉकलेट खाण्यायोग्य ते बाळ आहे की नाही, तसेच लहान वयाच्या पाल्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे, असे या आवाहन या घटनेनंतर केले जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com