Nitin Gadkari : रस्त्यांच्या कामात गडबड कराल, तर थेट बुलडोजरखाली घालू; नितीन गडकरींचा ठेकेदारांना दम

रस्त्यांच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर खाली घालू, असा सज्जड दम केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला
Nitin Gadkari Warn Contractors
Nitin Gadkari Warn ContractorsSaam TV
Published On

सांगली : रस्त्यांच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर खाली घालू, असा सज्जड दम केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला आहे. नितीन गडकरी आज सांगली जिल्ह्यातील अष्टा या ठिकाणी रस्त्याच्या भूमिपूजनासाठी आले होते. यावेळी त्यांनी ठेकेदारांना हा दम दिला आहे. (Maharashtra Political News)

Nitin Gadkari Warn Contractors
Sanjay Gaikwad : एकनाथ शिंदेच खरे हिरे, आमचे मंत्री सुद्धा लखलख करतात; 'त्या' टीकेला संजय गायकवाड यांचं उत्तर

सांगली शहराला पुणे बंगळुरू महामार्गाला जोडणारा पेठ-सांगली रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या रस्त्यावर असणारे खड्डे आणि रस्त्याचे झालेलं अर्धवट काम यामुळे वाहनधारक नागरिकांच्या मधून सरकार विरोधात नेहमीच रोष व्यक्त करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

हा रस्ता केंद्राच्या माध्यमातून करण्यासाठी खासदार, आमदार यांनी पाठपुरावा केला होता. अखेर केंद्रीय राष्ट्रीय रस्ते विभागाच्या माध्यमातून हा रस्ता सांगली पेठ चौपदरीकरण रस्ता करण्यात येत आहे. या रस्त्याचे या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते संपन्न झाले.

Nitin Gadkari Warn Contractors
Ashish Shelar Threat : आक्रमक राहिलात तर जीवे मारून समुद्रात फेकू, आशिष शेलार यांना पत्राद्वारे धमकी

या रस्त्याच्या कामाला एक महिन्यात सुरुवात होईल त्यानंतर पुढील 25 वर्ष या रस्त्यात एकही खड्डा पडणार नाही, अशा पद्धतीचे काम केलं जाईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. मी रस्त्याच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची टक्केवारी घेत नाही. या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी गडबड करता कामा नाही. अन्यथा ठेकेदाराला बुलडोझर खाली टाकू अशा शब्दात नितीन गडकरींनी दम भरला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com