Nashik : घरच्या घरी उपचार करणं बेतलं जीवावर; 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू (पहा व्हिडीओ)

घटनेनंतर पत्नीने पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
girl died
girl diedSaamTV
Published On

नाशिक : वैद्यकीय क्षेत्रातले अर्धवट ज्ञान असलेल्या बापाने अवघ्या 14 महिन्याच्या मुलीवर घरीच चुकीचे उपचार (Treatment) केल्याने त्य़ा चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर पत्नीने पतीच्या विरोधात तक्रार करत गुन्हा दाखल केला आहे. अर्धवट ज्ञान असणाऱ्या अर्धवट उपचार करणाऱ्या व्यक्तीचं नाव हेमंत शेटे असं आहे.

पहा व्हिडीओ -

सविस्तर घटना अशी की 14 महिन्याचा मुलीची तब्बेत बिघडल्याने नंतर तिला एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. 6 दिवस ती मुलगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट (Admitted to hospital) होती. मात्र पती हेमंत शेटे याने मुलीला डीस्चार्ज द्या मी दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो आणि माझ्या जबाबदारी वर डिस्चार्ज द्या असा तगादा हॉस्पिटल मधील लोकांसमोर आणि त्याच्या पत्नीजवळ लावला होता. 6 दिवसानंतर डॉक्टरांनी तुम्ही तुमच्या जबाबदारीवर पेशंट घेऊन जा असं सांगितलं होत.

girl died
RSS च्या उमेदवाराला भाजपने केला होता विरोध, काँग्रेसमुळे झाला विजयी !

यानंतर आपल्या मुलीची मी जबाबदारी घेतो म्हणून डिस्चार्ज केला आणि घरी घेऊन आल्यानंतर पत्नी वारंवार आपण मुलीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ बोलत होती मात्र तिच्या पतीने तीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तीच काहीही ऐकलं नाहीच उलट मी याआधी हॉस्पीटलमध्ये काम केलं आहे आणि मला खूप अनुभव आहे असं पत्नीला सांगून त्याने बळजबरी मुलीवरती घरातच उपचार द्यायला सुरुवात केली. मुलीला त्याने सलाईन लावली काही औषध दिली आणि 2 तासात तिची तब्बेत जास्त बिघडली म्हणून तिला शासकीय रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरनी तपासून तिला मयत घोषित केलं. तसेच अशाप्रकारचे उपचार घरी करू नये असं मुलीच्या आईने सांगितलं असून आपल्या पतीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com