Private Sector Employee: खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती उघड

Private Sector Employee: खासगी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत मोठं वृत्त हाती आलं आहे.
Private Sector Employee
Private Sector EmployeeSaam tv
Published On

Private sector Employees: देशासहित राज्यात खासगी कंपनीत काम करणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईसह राज्यातील अनेक शहरात कंपन्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे राज्यभरात खासगी कर्मचाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. याच खासगी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत मोठं वृत्त हाती आलं आहे. (Latest Marathi News)

खासगी कंपनीत काम करणाऱ्या जवळपास 81 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क आणि लाइफ बॅलन्स राखणे कठीण जात असल्याचं सर्वेक्षणात दिसून आल आहे. त्यामुळे खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Private Sector Employee
Pardeep Kurulkar: पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, शास्त्रज्ञ कुरुलकर यांना १५ मेपर्यंत कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य व निरोगी पणाचे प्रमाण यावर प्रकाश टाकणारा सर्वेक्षण आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने करण्यात आला.

त्या सर्व्हेत खासगी कंपनीत काम करणाऱ्या 81 टक्के कर्मचाऱ्यांना वर्क आणि लाईफ बॅलन्स राखणे कठीण जात असल्याचं जाणवत आहे. असे एकूण 81 टक्के कर्मचारी हे शुगर, बी पी, हायपर टेन्शन, पाठदुखी आणि मान दुःखी सारख्या आजारांना बळी पडत असल्याच निष्कर्ष या सर्वेक्षणात काढण्यात आले आहेत.

Private Sector Employee
Wadala Accident News: धावती ट्रेन पकडताना तोल गेला अन्...; काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पुण्यासह भारतातील महत्वाच्या शहरांतील, दहा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रमुख कंपन्यांतील जवळपास तीन हजार कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण या सर्वेक्षणात करण्यात आलं आहे.

व्यक्ती आरोग्य, कौटुंबिक आणि व्यक्तीक वेळ या सर्वोच्च जबाबदाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर परिणाम होतोय. पुण्यातील 81 टक्के लोक वर्क लाइफ च्या समतोल साधण्यासाठी संघर्ष करत आहेत, असे निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com