Accident News: रेल्वेने प्रवास करताना प्रवासाचे नियम पाळावे असं सातत्याने सांगितलं जातं. लोकल ट्रेनमध्ये खास त्यासाठी सातत्याने सूचना दिल्या जातात. मुंबईमधील नागरिकांना रोजच्या प्रवासात कितीतरी वेळा या सूचना ऐकू येतात. काहींना तर त्या अगदी तोंडपाठ झाल्या आहेत. मात्र तरी देखील अनेक नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. आपण काही ऐकलेच नाही, अशा पद्धतीने प्रवास करतात. त्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडतात. (Latest Marathi News)
आता देखील रेल्वे प्रवासाच्या अपघाताचा एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. सदर व्हिडिओ हा वडाळा रेल्वे स्थानकातील आहे. येथे एक व्यक्ती आपल्या घरी जात असताना त्याचा तोल गेल्याने तो लोकल ट्रेनमधून पडला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सदर व्यक्ती घाईघाईने लोकल ट्रेन पकडत असतो. त्यावेळी ट्रेन सुरू झालेली असते. मात्र लवकर पोहचण्याच्या ओढीने हा व्यक्ती थेट चालती ट्रेन पकडण्याचे धाडस करतो.
ट्रेन (Train) सुरू झाल्यावर चालू ट्रेन पकडत असताना त्या व्यक्तीचा अचानक तोल जातो आणि रेल्वे रुळ-प्लॅटफॉर्मच्यामध्ये तो पडतो. ट्रेनचा वेग वाढल्याने त्या व्यक्तीला तितक्याच वेगाने धावून ट्रेन पकडता येत नाही. त्यामुळे धावती ट्रेन पकडताना त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. खाली पडताच तिथे इतर प्रवाशांचा एकच गोंधळ उडतो. प्लॅटफॉर्मवर असलेल्या इतर व्यक्ती त्याला वाचवण्यासाठी धावतात.
आरपीएफ जवानाने वाचवले प्राण
सदर घटनेमध्ये हा व्यक्ती पडल्यावर ट्रेनमध्ये अडकून काही अंतर पुढे फरपटत येतो. तितक्यात तेथे असलेल्या आरपीएफ (RPF) जवानाची नजर त्यावर पडते. नंतर क्षणाचाही विलंब न करता आरपीएफ जवान त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धाव घेतो. त्या व्यक्तीचे पाय खेचून त्याला मरणाच्या दारातून बाहेर खेचतो. काही सेकंदाचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.