Maharashtra Kesari 2023: कुस्ती शौकिनांसाठी मोठी बातमी! ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा; कधी अन् कुठे रंगणार थरार?

या स्पर्धेसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
Maharashtra Kesari
Maharashtra KesariSaam tv
Published On

सचिन जाधव, प्रतिनिधी

Maharashtra Kesari 2023:

राज्यभरातील कुस्तीपटू आणि कुस्ती शौकिनांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणाऱ्या ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे या कुस्त्यांचा थरार रंगणार आहे.

Maharashtra Kesari
Solapur News: मनपा आरोग्याधिकाऱ्याच्या विरोधात प्रहारच चिखलात झोपून आंदोलन

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे जिल्ह्यातील वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे होणार आहे. १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

तसेच राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ५७ किलो पासून १२५ वजनी गटात ही स्पर्धा होते. यामध्ये ४७ संघातील ९०० हून अधिक मल्ल सहभागी होणार आहेत. दरम्यान, ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या घोषणेबाबत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला खासदार रामदास तड़स, संयोजक प्रदीप कंद उपस्थित होते. (Latest Marathi News)

Maharashtra Kesari
Bribe Trap: संशोधक सहाय्यक ३५ हजाराची लाच घेताना ताब्यात; जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी मागितली रक्कम

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com