गोंदियात शासकीय नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा

45 Nursing Students Food Poisoning Case In Gondia: गोंदिया येथील शासकीय नर्सिंग कॉलेजमधील 45 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. सर्व विद्यार्थिनींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून अन्न व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
Nursing students receiving treatment at Government Medical College after suspected food poisoning incident in Gondia
Nursing students receiving treatment at Government Medical College after suspected food poisoning incident in GondiaSaam Tv
Published On

शुभम देशमुख, साम टीव्ही

शासकीय नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थिनींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून अन्न आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहे. गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत येणाऱ्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे.

Nursing students receiving treatment at Government Medical College after suspected food poisoning incident in Gondia
Maharashtra Weather: मुंबईसह राज्यात पाऊस कोसळणार, वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

गोंदिया येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय नर्सिंग कॉलेज आहे. येथे एकूण 185 विद्यार्थिंनी हॉस्टेलमध्ये राहून नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. या सर्व विद्यार्थिनींना काॅलेजच्या कॅन्टीनमधून जेवण आणि नाश्ता दिला जातो. नेहमीप्रमाणे काल रात्री विद्यार्थिनींनी जेवण करुन झोपायला गेल्या. यानंतर पहाटे दोन तीन विद्यार्थिनींना पोटदुखीचा त्रास आणि उलट्या होऊ लागल्याने त्यांना त्वरित उपचारार्थ मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले.

Nursing students receiving treatment at Government Medical College after suspected food poisoning incident in Gondia
Maharashtra Politics: 'सत्तेपेक्षा देश महत्वाचा..' नवाब मलिकांना महायुतीत 'नो एन्ट्री'; फडणवीसांचे अजित पवारांना पत्र

मात्र गुरुवारी सकाळी नर्सिंग कॉलेजच्या 45 विद्यार्थिंनींना नेमका असाच त्रास होऊ लागला. त्यामुळे या सर्व विद्यार्थिंनींना तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. सध्या या सर्व विद्यार्थिनींची परिस्थिती धोक्यावर असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे यांनी दिली आहे.

मात्र नर्सिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यानाच असे निकृष्ट जेवण मिळत असेल, तर व्यवस्थापनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची संतापजनक बाब समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com