मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 43,211 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 71,24,278 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 33,356 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 67,17,125 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. (Maharashtra Corona Update)
गेल्या 24 तासात 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,41,756 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,61,658 रुग्ण अॅक्टीव आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.
ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती
२४ तासात राज्यात 238 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक 197 रुग्णांची पुण्यात नोंद झाली झाले. आतापर्यंत राज्यात 1605 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे तर 859 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.