Beed News: आर्थिक विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने संपवलं जीवन; कुटुंबावर शोककळा

Beed crime news: आर्थिक विवंचनेतून 27 वर्षीय तरुण शेतकऱ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Beed News
Beed NewsSaam tv
Published On: 

Beed News: आर्थिक विवंचनेतून 27 वर्षीय तरुण शेतकऱ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यात असणाऱ्या खळवट लिमगाव गावामध्ये घडली आहे. दत्ता अंबादास पाटोळे असं जीवन संपवलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. (Latest marathi News)

शेतकरी दत्ता पाटोळे यांना केवळ दीड एकर शेती आहे. शेतीवरच त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र अस्मानी संकटांने दत्ता पाटोळे हे मानसिक तणावत होते.

या आर्थिक संकटाच्या विवंचनेतून मानसिक तणावाखाली आलेल्या दत्ता पाटोळे यांनी त्यांच्या राहत्या घरी पत्राच्या शेडमध्ये जीवन संपवलं. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी बीडच्या वडवणी पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली आहे.

दीड वर्षाच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील रांजणगाव खुरी येथे दुर्दैवी घटना समोर आली आहे. दीड वर्षांच्या चिमुकलीसमोर शेतकरी दाम्पत्यान जीवन संपवल्याची घटना घडली आहे. गरिबी आणि आर्थिक विवंचनेतून संसाराचा गाडा हाकताना आलेल्या नैराश्यातून या शेतकरी दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

Beed News
Mumbai Crime News: बनावट बँक हमीपत्र सादर करत मिळवलं कंत्राट; महापालिकेच्या आर उत्तर विभागातील खळबळजनक घटना

शेतात कामासाठी गेलेल्या शेतकरी दाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. राजू दामोधर खंडागळे आणि अर्चना राजू खंडागळे असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.