Beed Accident News: बीड - सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची दुचाकीचा धडक

Beed Car And Bike Accident: याप्रकरणाचा तपास बीड पोलिसांकडून (Beed Police) सुरु आहे.
Beed Car And Bike Accident
Beed Car And Bike AccidentSaam Tv
Published On: 

Beed News: बीडमधील (Beed Accident) बीड - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Beed Solapur Highway) अपघाताची मालिका सुरूच आहे. आज पुन्हा या महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणाचा तपास बीड पोलिसांकडून (Beed Police) सुरु आहे.

Beed Car And Bike Accident
Jalna Crime News : विहरीतील पाण्याच्या वादातून काकाने केला पुतण्याचा खून

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमारास बीड - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाली गावाजवळ भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरुन दोघेजण प्रवास करत होते. या अपघातामध्ये दोघे जण ही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका वृद्धाचा समावेश आहे.

Beed Car And Bike Accident
CA Final Result 2023 Declared : CA Inter आणि CA Final निकाल जाहीर, अक्षय जैन देशात पहिला; असा पाहा रिझल्ट

जखमीं झालेल्यांचा रक्तस्राव मोठ्याप्रमाण झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. या महामार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ जखमींना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जखमींवर उपचार सुरु असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातामध्ये स्कार्पिओ कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. तर दुचाकीचे देखील तुकडे झाले आहेत.

Beed Car And Bike Accident
Latur News : 'मायबाप सरकार आमचा प्रश्न साेडवेल' निरागस मुलांना का करावं लागलं झेडपीच्या गेटवर आंदाेलन ?

दरम्यान, मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महामार्गावरील खोपोलीजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास शिवनेरी बसचा अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजकाला धडकून उलटली. या अपघातामध्ये बस चालकासह ६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी खोपोली पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 3 प्रवाशांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.