खाजगी अनुदानित शाळेमध्ये 19 लाख विद्यार्थी बोगस; कोट्यवधी रुपयांचा अपहार

दहा वर्षांपूर्वी बोगस पटपडताळणी मोहीमेत २० लाख बोगस विद्यार्थी सापडले होते. बोगसपणा होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची आधारकार्डद्वारे नोंदणी करण्यात आली आहे.
19 lakh students bogus in private School
19 lakh students bogus in private SchoolSaam TV
Published On: 

औरंगाबाद: राज्यातल्या खाजगी अनुदानित शाळेमध्ये १९ लाख विद्यार्थी बोगस असल्याचं समोर आलं आहे. या विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या संस्थाचालक, शिक्षक आणि सरकारी अधिकाऱ्यांचे पितळ उघडं पडणार आहे. राज्य सरकारने (State Government) राज्यातल्या खाजगी अनुदानित शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आकडेवारी औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad Bench) सादर केल्यानंतर धक्का बसला आहे. कारण तब्बल १९ लाख विद्यार्थ्यांचे बोगस नावे शाळांमध्ये असल्याचं समोर आलं आहे. आणि त्या विद्यार्थ्यांच्या नावावर संस्थाचालक, शिक्षक, सरकारी अधिकारी कोटयवधी रुपयांची लूट करीत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दहा वर्षांपूर्वी बोगस पटपडताळणी मोहीमेत २० लाख बोगस विद्यार्थी सापडले होते. बोगसपणा होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची आधारकार्डद्वारे नोंदणी करण्यात आली आहे. त्यानंतर बोगस विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याऐवजी ती वाढली. राज्यात तब्बल २४ लाख विद्यार्थी बोगस असल्याचा दावा करणारी याचिका ब्रिजमोहन मिश्रा यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने आधारकार्डसोबत जोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला खंडपीठाने दिले होते. त्यात राज्य सरकारने सादर केलेल्या आकडेवारीत समोर आले आहे.

19 lakh students bogus in private School
पैशाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलाने केला पित्याचा खून...

आकडेवारी

पुणे २,४३,५८२

नागपूर १,८४,२६२

जळगाव १,७२,५३४

नांदेड १,५२, ७२३

यवतमाळ १,१७,५१९

बुलढाणा ९८,४८८

धुळे ८५,१५७

मुंबई ८०,८००

नाशिक ०, २५३

अहमदनगर ६०,९५१

अकोला ५६, ४७८

अमरावती ५,१०७

औरंगाबाद १०,६६६

बीड ८,५२८

अनुदानित खासगी शाळांचे संस्था संचालक, मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने विद्यार्थी बोगस दाखवून राज्य सरकारची मोठी फसवणूक झालीये. आता त्याचे चेहरे समोर येऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.