पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला शिक्षकाकडूनब बेल्ट अन् काठीने अमानुष मारहाण

17 Year Old Police Aspirant Beaten By Coach In India: छत्रपती संभाजीनगरातील करिअर अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला प्रशिक्षकाने बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
CCTV captures a coach brutally assaulting a 17-year-old police aspirant inside a career academy in Aurangabad.
CCTV captures a coach brutally assaulting a 17-year-old police aspirant inside a career academy in Aurangabad.saam tv
Published On

माधव सावरगावे, साम टीव्ही

छत्रपती संभाजीनगर: शहरातील एका नामांकित करिअर अकॅडमीमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अवघ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याला बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या रँगीगसदृश्य आणि छळाच्या प्रकरणामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी अकॅडमीच्या पी.टी.प्रशिक्षक आणि व्यवस्थापकाविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CCTV captures a coach brutally assaulting a 17-year-old police aspirant inside a career academy in Aurangabad.
पिता बेरोजगार असला तरीही मुलांना पोटगी देणे बंधनकारक: उच्च न्यायालय

बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरातील 'भारत करिअर अकॅडमी'मध्ये हा प्रकार घडला. येथे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न घेऊन एक १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी पूर्वतयारी करत होता. मात्र, अकॅडमीचे पी.टी. प्रशिक्षक आणि व्यवस्थापक विवेक डाकणे याने क्षुल्लक कारणावरून या विद्यार्थ्याला बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की, यामध्ये विद्यार्थ्याचा मोठा शारीरिक आणि मानसिक छळ झाला आहे.

CCTV captures a coach brutally assaulting a 17-year-old police aspirant inside a career academy in Aurangabad.
Beed Crime: बीड हादरले! सासरच्यांकडून विवाहितेची हत्या, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत संपवलं; नंतर मृतदेह विहिरीत फेकला

या धक्कादायक मारहाणीचा संपूर्ण प्रकार अकॅडमीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे फुटेज आता समोर आले असून, ज्यामध्ये प्रशिक्षक विद्यार्थ्याला बेदम मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

CCTV captures a coach brutally assaulting a 17-year-old police aspirant inside a career academy in Aurangabad.
Nashik Farmers Protest | Bharati Pawar यांच्या घरावरील बाईक रॅली पोलिसांनी अडवली

मारहाणीच्या या प्रकारानंतर पीडित विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी विवेक डाकणे याच्याविरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याचा केवळ शारीरिकच नव्हे, तर रॅगिंगसदृश प्रकारातून मानसिक छळही करण्यात आल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून छावणी पोलिसांकडून आता या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com