Nashik Accident News : मळगाव- नांदगाव बसला अपघात, विद्यार्थ्यांसह 15 प्रवासी जखमी

या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Nahik Accident News
Nahik Accident NewsSaam TV

- अजय सोनवणे

Nashik News : नाशिक जिल्ह्यात आज सकाळच्या सुमारास बसच्या झालेल्या अपघातात सुमारे 15 जण जखमी झाले आहेत. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra News)

Nahik Accident News
Pandharpur News : विठ्ठल रूक्मिणी मंदिरावरील नियंत्रणासाठी वारकऱ्यांनी घेतला पुढाकार, बैठकीत झाला एकमुखी निर्णय

याबाबत मिळालेली माहिती अशी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जामदरी शिवारात जामदरी पांझण चौफुलीवर मळगाव नांदगाव बसचे पाटे तुटल्याने अपघात झाला. या अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला नाल्यात गेली.

Nahik Accident News
Bharat Or India? संभाजीराजे दिल्लीत दाखल, इंडिया शब्द बदलून भारत करणार असाल तर... (पाहा व्हिडिओ)

या बस मधील सुमारे 14 ते 15 शाळकरी मुले व प्रवासी जखमी झाले. या घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काहींनी जखमी प्रवाशांना नांदगाव ग्रामीण रुग्णालयात (nandgaon gramin hospital) उपचारासाठी पाठविले. सुदैवाने बस पलटी होता होता वाचल्याने मोठा अनर्थ टळल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com