Palghar Tragic incident : धक्कादायक! शाळेतील वर्गातच साप चावल्यानं पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू

11-year-old girl dies due to snakebite in Palghar school : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. शाळेतील वर्गातच साप चावल्याने पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शाळेच्या वर्गातच सर्पदंश, पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू
11-year-old girl dies due to snakebite in Palghar schoolsaam tv
Published On

फय्याज शेख, साम टीव्ही

girl dies of snakebite in palghar school : शाळेतील वर्गात सर्पदंशानं पाचवीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात घडली. वेदिका प्रकाश झाटे (वय ११) असं या मुलीचं नाव आहे. शाळेतील वर्गखोलीत विषारी साप कुठून आला? असा संशय आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव या संस्थेच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. इयत्ता पाचवीत शिकणारी वेदिका प्रकाश झाटे (राहणार, बिलघर) ही नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. शाळेच्या मधल्या सुट्टीत तिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली.

वेदिका खाली कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर इयत्ता सातवीत शिकणारी तिची बहीण व अन्य दुसऱ्या विद्यार्थिनींनी वेदिकाला जागेवरून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी शाळेतील शिक्षकांना बोलावून हा प्रकार सांगितला. धक्कादायक बाब म्हणजे शिक्षकांनी तिला रूग्णालयात घेऊन न जाता तिला घरी घेऊन गेले, असा आरोप वेदिकाच्या आईवडिलांनी केला.

मुलीच्या वडिलांनी दुचाकीवरून तिला वाडा येथील रूग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. मुलीचा मृत्यूनं आईवडिलांना मोठा धक्का बसला. दुसऱ्या दिवशी वेदिकाचे मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. सर्पदंशाने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालातून समोर आले.

शाळेच्या वर्गातच सर्पदंश, पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू
Shocking Crime : एकाचवेळी २ तरुणींनी बोलावलं, हॉटेलमध्ये पोहोचताच धक्कादायक प्रकार; तरुण ३ दिवस मानसिक धक्क्यात

शिक्षकांनी या विद्यार्थ्यांनीला शाळेला लागूनच असलेल्या रूग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तिला घरी घेऊन गेले. जर तिला शाळेतूनच रूग्णालयात घेऊन गेले असते, तर कदाचित तिचा जीव वाचला असता, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. बेजबाबदार शिक्षक व शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.

शाळेच्या वर्गातच सर्पदंश, पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू
Mumbai Shocking : अस्थी विसर्जनासाठी गेले,पुन्हा परतलेच नाही; हाजीअलीजवळील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com