Maharashtra News Live Updates : पंढरपुरात अवकाळी पावसाच्या धारा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 1 April 2025: आज मंगळवार दिनांक १ एप्रिल २०२५ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकीय घडामोडी, संतोष देशमुख हत्याकांड अपडेट, हवामान अपडेट, बीड क्राईम, आयपीएल २०२५,राज्यावर अवकाळीचे सावट, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Marathi Breaking Live Marathi Headlines Updates
Maharashtra Live News UpdatesSaam tv
Published On

पंढरपुरात अवकाळी पावसाच्या धारा

पंढरपुरात आज सायंकाळी अवकाळी पावसाच्या धारा कोसळल्या. मेघगर्जनेसह वादळी वारे आणि पावसाने झोडपले. दहा ते पंधरा मिनिटे झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. आज दिवसभर उकाडा जाणवत होता. सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस झाला. अवकाळी पावसाने काही प्रमाणात काढणीस आलेल्या पिकांना फटका बसला आहे. शिवाय बेदाणावर अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. या पावसामुळे काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे.

लडाखला भूकंपाचा धक्का

भूकंपामुळे थायलंड-म्यानमारमध्ये प्रचंड विध्वंस झाला. आता भारतातही भूकंप झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लडाखच्या लेहमध्ये ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.

 Rain Update : राजापुरात अवकाळी पावसाची हजेरी

दिवसभराच्या ढगाळ वातावरणानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान खात्याने अवकाळी पावसांचा अंदाज वर्तवला होता. राजापूर तालुक्यामध्ये तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे आंबा व्यापारी चिंतेत पडला आहे. आधीच उत्पादन कमी व त्यात अवकाळी पाऊस यामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे

Prashant koratkar : प्रशांत कोरटकर जिल्हा कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करणार 

प्रशांत कोरटकरच्या वतीने उद्या जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल होणार आहे. आज चौथे सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टातून जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर प्रशांत कोरटकर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहे.

Nashik News : सटाणा बाजार समिती निवडणुकीत यशवंत शेतकरी विकास पॅनल विजयी

नाशिकच्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी काल मतदान होऊन ९८ टक्के मतदान झाले होते. या निवडणूकीत शेतकरी विकास आणि यशवंत शेतकरी विकास अशा दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली. चुरशीच्या झालेल्या या निडणूकीत आज मतमोजणी होऊन यात माजी सभापती संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील यशवंत विकास पॅनलला ९ तर विरोधी शेतकरी विकास पॅनलला ६ जागा मिळाल्या. व्यापारी गटाला २ व हमाल-मापारी गटाला १ जागांवर उमेदवार निवडून आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत यशवंत विकास पॅनलने बाजी मारत पुन्हा बाजार समितीत वर्चस्व स्थापन केले आहे.

मोठी बातमी : प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला

प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला

प्रशांत कोरटकरची जेलमध्येच रवानगी

प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा केला होता अपमान

सटाणा बाजार समिती निवडणूकीत यशवंत शेतकरी विकास पॅनल विजयी

नाशिकच्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत १८ जागांसाठी काल मतदान होऊन ९८ टक्के मतदान झाले होते. या निवडणूकीत शेतकरी विकास व यशवंत शेतकरी विकास अशा दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आज मतमोजणी होऊन यात माजी सभापती संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील यशवंत विकास पॅनलला ९ तर विरोधी शेतकरी विकास पॅनलला ६ जागा मिळाल्या.

पीककर्जाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांनी काढली किडणी विकायला

वाशिम शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकात आज एक वेगळ चित्र बघायला मिळालं, पिककर्जाच्या पैशासाठी शेतकऱ्याने आपले अवयव विक्रीला काढलेत. गळ्यात अवयव विक्रीचं बॅनर टाकून आपले अवयव विक्रीसाठी वाशिमच्या मुख्य बाजारपेठेत आपण आलो आहोत, अशी उद्विग्न भावना शेतकऱ्यानं व्यक्त केली.

नांदेडच्या सहस्त्रकुंड रेल्वे स्थानकाच्या बाजूला लागली आग

नांदेडच्या सहस्त्रकुंड रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील गवताला अचानक आग लागली होती.

ही आग एवढी भीषण होती की या आगीची लोट 25 ते 30 फुटापर्यंत उंच दिसत होते. अग्निशामक दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. घटनास्थळावरून जवळच असलेले शासकीय धान्य गोदाम व महावितरण विद्युत पुरवठा करणारे सौर ऊर्जा प्लँट बचावला आहे.

या आगीमुळे अनेक हिरवी झाडे होरपळली आहेत. तर घराच्या छतावर असलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाक्याला सुद्धा या आगीमुळे मुळे झळा बसल्या आहेत.मात्र सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही.

विदर्भात पुढील २ ते ३ दिवसात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीटचा अंदाज

विदर्भात पुढील दोन ते तीन दिवसात काही भागात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि गारपीटचा अंदाज व्यक्त केला आहे...

नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केला आहे.

तसेच पश्चिम विदर्भमध्ये गारपीटीचा अदांज वर्तवला जात आहे. तेच पूर्व विदर्भात काही भागात गारपीट होणार असल्याचा अंदाज आहे.

या मध्ये हवामान खात्याकडून विदर्भातील शेतकऱ्यांना काही जिल्हा मध्ये विजेचा कडकडाट सोबत गारपीट पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यामुळे गारपीटमुळे शेतीचे आणि पशुधन नुकसान होण्याची शक्यता असल्यानं काळजी घ्या असाही सल्ला देण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण

नंदुरबार जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण.....

अवकाळी पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज....

ढगाळ वातावरणामुळे कैरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता.....

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत.....

Pune : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा जामिनासाठी अर्ज

- स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा जामिनासाठी अर्ज

- चार्जशीट दाखल होण्यापूर्वी जमीनासाठी अर्ज दाखल

- पुणे जिल्हा सत्र न्यायालयात जमिनीसाठी अर्ज दाखल केला

- या प्रकरणी दोन ते तीन दिवसात जामिनावर सुनावणी होणार

- वकील वाजीद खान यांच्या मार्फत करण्यात आला आहे अर्ज

राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या भाषणानंतर संभाजीनगरमध्ये मनसे आक्रमक

- राज ठाकरे यांच्या गुढी पाडव्याच्या भाषणानंतर संभाजीनगरमध्ये मनसे आक्रमक

- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना औरंगजेबाच्या कबरीवरून दिले निवेदन

- औरंगजेबच्या कबरीजवळ जर सजावट असेल तरी ती त्वरीत काढली जावी

- औरंगजेबच्या कबरीचा कुठलाही सरकारी खर्च येथे करायचा नाही.

- सर्व शाळातील मुलांच्या शैक्षणिक सहली तिथ काढण्याचा आदेश काढण्यात यावा.

- इथे एक बोर्ड लावन्यात यावा आम्हा मारण्यांराना संपावयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला

- या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे.

पलावा पुलाच्या कामावरून मनसे नेते राजू पाटील प्रशासनासह सत्ताधाऱ्यांना डिवचले

कल्याण शीळ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दोन्ही पलावा पुलाचे काम सुरू झाले असून अनेक वर्षापासून हे काम सुरू आहेत. संथ गतीने सुरू असलेल्या या कामावरून मनसे नेते राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना लक्ष केलंय . मनसे नेते राजू पाटील यांनी काम सुरू असलेल्या पुलाच्या समोर भला मोठा एक बॅनर लावला आहे. या पुलाचे उद्घाटन ३१ एप्रिल रोजी स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराच्या हस्ते होणार आहे, असे लिहिले आहे. एवढेच नाही तर तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल! कधी होणार पलावा पूल?… की बनत होता.. बनत आहे.. आणि बनतच राहील पलावा पूल? असा सवाल देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक्सच्या माध्यमातून राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

डोंबिवलीतील उद्यानात होणाऱ्या वाचनालयावरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली

डाेंबिवलीतील सुनिलनगरमध्ये कवियत्री बहिणाबाई चौधरी उद्यानात तयार करण्यात येणाऱ्या वाचनालयावरुन शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार जुंपली आहे.

लहान मुलांसाठी असलेल्या या बगिच्यात वाचनालय झाले तर लहान मुले काय करतील ? आम्ही अजिबात वाचनालय होऊ देणार नाही. याला स्थानिक नागरीकांचा प्रचंड विरोध आहे. अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे.

तर नागरीकांच्या सोयी सुविधांसाठी सुसज्ज वातानुकूलीत आधुनिक वाचनालय आम्ही तयार करतोय खासदारांची २५ लाखाचा निधी दिला आहे. त्यामुळे काही लोकांची पोट दुखी आहे. ते लोक अनधिकृत जाहिराती आणि अनधिकृत वाचनालयावर का बोलत नाही असा टोला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नितीन पाटील यांनी लगावला आहे.

त्यामुळे आता उद्यानातील या वाचनालयाचा मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट हे आमने-सामने उभे ठाकल्याने राजकीय वातावरण तापले आहे

पुणे जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून सतेज पाटील यांची नियुक्ती

- काँग्रेसच्या संघटनात्मक बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात

- काँग्रेसकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला निरीक्षक नियुक्त

- पुणे जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून सतेज पाटील यांची नियुक्ती

- जिल्ह्यात पक्षाची परिस्थिती काय आहे, याचा अहवाल १५ दिवसात पक्षाला सोपवायची जबाबदारी निरीक्षकावर

- ब्लॉक अध्यक्ष, जिल्ह्याचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत हे निरीक्षक साधणार संवाद

- शहर आणि जिल्ह्यामध्ये संघटनेची ताकद वाढवणे, गटबाजी संपवणे, निवडणूक जिंकण्याची रणनीती आखणे अशी जबाबदारी

ओन्ली इन पुणे! सुविधा न देणं पेट्रोलपंप चालकाला पडलं महागात

पुण्यातील एका पेट्रोल पंपावर पाणी, हवा आणि स्वच्छतागृह यासारख्या सुविधा नसल्याने एका जागरूक पुणेकराने याबाबत तक्रार केली आणि त्या पेट्रोल पंप चालकाला दंड आकारला गेलाय.

प्रफुल सारडा या युवकाने कोंढवा मुल्ला नगर परिसरात असलेल्या एका पेट्रोल पंपाची तक्रार कंपनीकडे केली होती. कंपनीने पडताळणी करून सदर पेट्रोल पंप मालकाला 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला. यामध्ये हवा भरण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याने 10000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच प्रथमोपचार पेटी मध्ये औषधे नसल्याचे आढळून आले, त्याचबरोबर स्वच्छतागृह स्वच्छ नसल्याने 25000 हजार दंड ठोठावण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या गणवेशाबाबतची नियमावली न पाळल्याने 25000 एवढा दंड देखील कंपनीकडून दंड आकारण्यात आला आहे.

nashik-manmad-बीएसपी धरणे आंदोलन

परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्युला जबाबदार असलेल्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नाशिकच्या मनमाडला बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ धरणे आंदोलन सुरु करण्यात आले असून न्यायलयीन कोठडीत असताना सूर्यवंशी याचा पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.मात्र अद्याप पर्यंत मारेकऱ्यांवर कुठलीही कारवाई झालेली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

कळंब येथील महीला हत्या प्रकरणातील आरोपींना उद्या कळंब न्यायालयात हजर करण्यात येणार

कळंब येथील महीला हत्या प्रकरणातील आरोपींना उद्या कळंब न्यायालयात हजर करण्यात येणार

मनिषा कारभारी बिडवे या महीलेच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भोसले सह उस्मान सय्यद यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अनैतिक संबंध व पैशाच्या कारणावरुनच हत्या झाल्याची पोलिसांची माहिती

मागील वर्षीच्या तुलनेत मालेगाव बाजार समितीत मक्याची बंपर आवक

नाशिकच्या मालेगाव बाजार समितीत मागील वर्षीच्या तुलनेत मक्याची आवक वाढली आहे.खरीप व लेट खरीपात मालेगाव तालूक्यात सुमारे ५३ हजार हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड करण्यात आली.गेल्या वर्षीच्या तुलेत मक्याला सरासरी २२०० रुपयाच्या पुढे भाव मिळाला.मागिल वर्षी १७ हजार क्विंटलच्या दरम्यान आवक झाली मात्र यंदा त्यात वाढ होऊन ती २३ हजार क्विंटलच्या पुढे गेली.म्हणजे २ लाख क्विंटल ने आवक वाढली.यावेळी कसमादे पट्ट्यातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड केल्याने तसेच अन्य जिल्ह्यातील शेतकरी मालेगाव बाजार समितीत मक्याच्या विक्रीसाठी येत असल्याने त्याचा फायदा बाजार समितीला तसेच शेतक-यांना चांगला दर मिळात असल्याने आणि मक्याचा इथल मध्ये वापर सुरु झाल्याने त्याचा परिणाम सुध्दा मक्याच्या दरात वाढ झाल्याचे व्यापारी सांगताय.

Maharashtra News Live Updates: कोरटकर प्रकरणी सुनावणीला सुरुवात

कोरटकर प्रकरणी सुनावणीला सुरुवात

जामीन नामंजूर करण्यात यावा याबाबत पोलिसांनी लेखी म्हणणे कोर्टात सादर केलं

वकील सौरभ घाग व्हीसीद्वारे हजर

कोरडकर ला V C द्वारे हजर करण्यात आले

सरकारी वकील आणि जुना राजवाडा पोलीस, तपास अधिकारी संतोष गळवे न्यायालयात उपस्थित

लोणी काळभोर मध्ये शेतकऱ्याचा डोक्यात दगड घालून खून.

- राजेंद्र काशिनाथ काळभोर राहणार वडाळे वस्ती रायवाडी रोड असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव.

- मयत राजेंद्र काळभोर हे लोणी काळभोर परिसरात कुटुंबासमवेत राहतात. काळभोर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात

- ⁠उन्हाळा असल्याने रात्री काळभोर हे घराच्या समोर खाटेवर झोपले होते.

- आज सकाळी त्यांना घरच्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणते प्रतिसाद दिला नाही त्यानंतर घरच्यांना खाटे जवळ येऊन पहिले असता काळभोर यांचा डोक्यातून मोठा रक्त स्राव झाल्याने ते खाटीवरच निपचीत अवस्थेत पडले होते.

- ⁠घटनास्थळावर पोलिस दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत

शोले स्टाईल आंदोलन

पुण्याच्या राजगुरुनगर नगरपरिषदेच्या करवाढविरोधात सुरु असलेल्या शोले स्टाईल आंदोलन पोलीसांनी दडपले

पाण्याच्या टाकीवर चढलेल्या दिपक थिंगळे आणि स्वप्निल माठे ला पोलीसांनी घेतलं ताब्यात

पाच तासांपासुन राजगुरुनगर शहरातील उंच पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरु होते या आंदोलनाला मदमाशांचा हल्ल्याचा धोका असल्याने आंदोलकाला आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती मात्र आंदोलक आक्रमक असल्याने पोलीसांनी पाण्याच्या टाकीवर चढुन आंदोलकाला ताब्यात घेण्यात आले

लातूरच्या देवणी तालुक्यात गुप्तधनासाठी आघोरी पूजा...महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल

लातूरच्या देवणी तालुक्यातील पंढरपूर गावात मध्यरात्री गुप्तधनासाठी अघोरी पूजा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. जमिनीतून गुप्तधन काढण्यासाठी मध्यरात्री गावात आघोरी पूजा करत असल्याची माहिती .. काही गावकऱ्यांना मिळाली गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर देवणी पोलिसांनी एका महिलेसह चार जणांवर विरुद्ध जादूटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.. गावातील पडेक जागेत हळदी कुंकू, बाहुली, आणि लोखंडी फावडे आढळून आले आहे...

बीड जिल्हा कारागृहात मारहाणीच्या घटनेनंतर आरोपींना हलवले नाशिक कारागृहात

- बीड जिल्हा कारागृहात मारहाणीच्या घटनेनंतर अक्षय आठवले, मनीष शिरसागर व ओंकार सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवले.

- मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीते यासह इतर चौघांना संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले होते.

- आज अक्षय आठवले यांच्यासह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आले आहे.

बीडच्या दगडवाडीत गायरान जमीन प्रश्नावरून शेतकरी आक्रमक

बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडी येथे गायरान जमीन प्रश्नावरून शेतकरी आक्रमक.

दगडवाडी येथे काही लोक गायरान जमिनीची खरेदी विक्री करत असल्याचा आरोप.

गायरान जमीन गावकऱ्यांच्या हक्काचे आहे, त्याचे संरक्षण करण्याची मागणी.

पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन.

नागपुरात काँग्रेसला मोठा धक्का, १२ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का देत ९ विद्यमान नगरसेवकांसह महाविकास आघाडीच्या १२ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश.

- कुही नगरपंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाचे विद्यमान नगरसेवक भाजपात.

- भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ग्रामीण काँग्रेसचे पदाधिकारी यांचा भाजपात प्रवेश.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपुरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस नगरसेवकांचा भाजपात प्रवेश.

कळंब येथील महिला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भोसलेला एल सीबिने घेतलं ताब्यात

रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले असे आरोपीचे नाव

महिला हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

तर उस्मान गुलाब सय्यद असे हत्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचे नाव

कळंब महिला हत्या प्रकरणात पहाटे पाच वाजता कळंब पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल

दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज येथील

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनीषा बिडवे या महिलेचा वापर केला जाणारा असल्याचा होतोय आरोप

अनैतिक संबंधातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच दाखवण्यासाठी या महिलेचा वापर केला जाणार होता असा आरोप

बिबट्याच्या हल्ल्यात ६५ वर्षीय आजीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जिरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका ६५ वर्षीय आजीचा मृत्यूबिबट्याच्या हल्ल्यात एका ६५ वर्षीय आजीचा मृत्यू झालाय. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हल्ला केला. जिरी शिवारातील गट नं २८मध्ये झुंबरबाई माणिक मांदाळे रा. वय ६५ तिंत्तरखेडा जिरी असे मयत महीलेचा नाव आहे. यासंदर्भात वनविभागाला सकाळी साडेसहा वाजता माहीती देण्यात आली मात्र दहा वाजेपर्यंत वनविभाग हजर नव्हता. जो पर्यंत बिबट्याचा बंदोबस्त वनविभाग करत नाही तो पर्यंत अंत्यविधी होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. गेल्या ३ महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra News Live Updates: सांगोल्यात टेंभू योजनेचा कालवा फोडला; दहा गावातील शेतीचा पाणी पुरवठा बंद

सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी परिसरात टेंभू योजनेचा कालवा आज पहाटे काही अज्ञात शेतकर्यांनी फोडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कालवा फोडल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले आहे.

उन्हाळी हंगामासाठी टेंभू उपसा योजनेचे कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान आज पहाटे सांगोल्यातील हटकर मंगेवाडी परिसरात अज्ञात लोकांनी कालवा फोडून पाण्याची नासाडी केली आहे.

अधिकार्यांच्या दुर्लक्षितपणा हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. कालवा दुरूस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी या भागातील शेतकर्यांनी केली आहे.

राज्यात 36 टक्के रुग्णांना फुफ्फुसांबाहेरचा क्षयरोग

राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून माहिती आली समोर..

राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवाडेवारिनुसार गेल्या वर्षी राज्यभरात नोंदवलेल्या 36 टक्के रुग्ण हे फुप्फुसांच्याबाहेरील क्षय रोगाचे होते..

साधारणपणे मायक्रो बॅक्टेरियम से रोगाचा फुफुस आणि श्वसनसंस्थेवर सर्वाधिक परिणाम होतो..

काही रुग्णांमध्ये शरीराच्या इतर भागावर सर्वाधिक परिणाम होतो राज्यात एकूण क्षयरोग रुग्णांपैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त रुग्णू फुफुसांबाहेरील क्षयरोगाचे असल्याचे समोर आले आहे

हरवलेल्या अकरा वर्षीय मुलाचा पंधरा दिवसात पोलिसांनी घेतला शोध

क्लासला गेलेला 11 वर्षीय अथर्व चाळके हा घरी परत न आल्याने कुटुंबियांनी एन.आर.आय पोलीस ठाण्यात अथर्व हरवल्याची तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारी वरून पोलीस उपायुक्त पंकज डहाने यांनी नवी मुंबई पोलीसांची तीन पथके तयार करत अथर्वचा शोध सुरु केला. यावेळी साधारण 300 पेक्षा अधिक सिसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले तसेच काही संशयित ठिकाणी कोम्बिंग ऑपेरेशन देखील राबविण्यात आले. अखेर तब्बल 15 दिवसानंतर पोलीसांच्या शोध मोहिमेला यश आले असून नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात अथर्व मिळून आला. नवी मुंबई पोलीसांनी अथर्वला त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले असून यावेळी कुटुंबियांचे डोळे आनंदाश्रुनी भरून आले होते.

Maharashtra News Live Updates: संत तुकाराम महाराज संस्थान च्या अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे

देहूच्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे यांची निवड झाली आहे. तर दिलीप महाराज मोरे, विक्रम सिंग महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, या सहा जणांची विश्वस्तपदी निवड झालेली आहे. अध्यक्षपदाचे कार्यकाल हा दोन वर्षाचा राहणार आहे. संस्थांच्या बाजूलाच असलेल्या धर्म शाळेमध्ये पोलिसांच्या चोख बंदोबस्तात ही निवडणूक संपन्न झाली. संस्थांच्या अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात उभे होते. जालिंदर महाराज मोरे यांना 163 मतदान झाले तर कैलास मोरे यांना 83 मते तर विश्वजीत मोरे यांना 107 मते मिळाली या निवडणुकीसाठी एकूण 377 मतदानापैकी 355 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत 94.45 टक्के मतदान झाले. अशी माहिती निवडणूक अधिकारीण अंकुश महाराज मोरे यांनी दिली आहे....

मुलुंडच्या म्हाडा कॉलनीमध्ये आढळला गोल्डन जॅकल

मुलुंडच्या म्हाडा कॉलनीमध्ये आढळला गोल्डन जॅकल

Raw संस्था आणि वनविभाग यांच्यामार्फत गोल्डन जॅकल ला आले पकडण्यात

सकाळी ६ वाजता आढळल्यामुळे नागरिकांची तारांबळ

जखमी अवस्थेत आढळल्याने पुढील औषध उपचार सुरू

- सोलापुरात उन्हाच्या तीव्रतेने कडब्याला लागलेल्या आगीमुळे टेम्पो जळाला..

- उत्तर सोलापूर तालुक्यात कडबाने भरलेल्या मालवाहू टेम्पोला अचानक लागली होती आग..

- उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापूर गावाजवळील मालवाहू टेम्पोला आग लागल्यामुळे टेम्पोचे आगीत मोठं नुकसान

- मालवाहू टेम्पो मध्ये कडबा भरला असताना उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज..

- यामध्ये मालवाहू टेम्पोच्या मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बीड:सरपंच संतोष देशमुख यांच्या गावात मुस्लिम बांधवांनी साजरी केली नाही ईद

मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मसाजोग गावात आज मुस्लिम बांधवांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. धनंजय देशमुख यांच्या भेटीला मुस्लिम बांधव आल्यानंतर सर्वांना अश्रू अनावर झाले.. तसेच मागच्या वेळेस आठवण देखील मुस्लिम बांधवांनी बोलून दाखवली.. यावरून गावातील मुस्लिम बांधवांचे संतोष देशमुख यांच्यावरील प्रेम लक्षात येते..

यावेळी एक पोस्ट वायरल होत आहे.. संतोष अण्णा दरवेळेस तुम्ही मोठ्या उत्साहात आमच्या सोबत ईद साजरी करत होतात आणि तुम्ही या वर्षी हॉलमध्ये मोठी ईद साजरी करायची इच्छा देखील व्यक्त केली होती दुर्दैवाने आज तुम्ही आमच्यात नाहीत याचा आम्हाला फार दुःख आहे म्हणून तुमच्या सर्व मुस्लिम बांधवांनी साजरीकरणाचा निर्णय घेतला आहे.. समस्त मुस्लिम बांधव मसाजोग असा आवाहन मुस्लिम बांधवांनी केला आहे

पुण्यात सायबर चोरट्यांकडून ६२ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी दोन महिलांसह तिघांची ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

विश्रांतवाडी भागातील एका ३८ वर्षीय महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी ४२ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर जानेवारी महिन्यात संदेश पाठविण्यात आला होता.

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले.

अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या खून प्रकरणातील चारही आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी 

बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील ज्ञानेश्वर मस्के या पोलीस कर्मचाऱ्याचा गळा आवळून खून केल्या प्रकरणी चारही आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपींमध्ये एका बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.. दिलीप बाजीराव वाघ असे या आरोपीचे नाव असून तो छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पोलीस विभागात अंमलदार म्हणून कार्यरत होता, मात्र एका गुन्ह्यात सहभाग असल्याने त्याला बडतर्फ केल्याची माहिती आहे...

- कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, आजपासून कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य

- मागील महिन्यात १ एप्रिलपासून कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा केंद्राने घेतला होता निर्णय

- आजपासून कांदा निर्यातीवर शुल्क लागणार नाही

- कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य झाल्यानं आज नाशिकच्या बाजारसमित्यांमध्ये कांद्याला किती दर मिळणार? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष

- आवक वाढल्याने मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने होतेय घसरण

- मात्र आजपासून कांदा निर्यात शुल्क शून्यावर आल्यानं कांदा निर्यात वाढण्याची शक्यता

- कांदा निर्यातीला चालना मिळाल्यास कांद्याचे भाव देखील वाढण्याची शक्यता

कळंब येथील महिलेच्या हत्ये प्रकरणातील एक आरोपी पोलिसांनी घेतला ताब्यात

धाराशिव च्या कळंब येथील मनीषा कारभारी बिडवे या महिलेच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपीवर पोलिसांना संशय आहे. त्यापैकी एका आरोपीला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. तर प्रकरणातील मुख्य आरोपी फरार आहे. पहाटे पाच वाजता याप्रकरणी कळंब पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची हत्या आणि संतोष देशमुख प्रकरणाशी काही संबंध आहे का हे पाहणे गरजेचे आहे .

छत्रपती संभाजीनगर- जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील अजिंठा घाटात एसटी बस आणि आयशर ट्रक मध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला होता.सुदैवाने या अपघातात एसटी बस मधील 39 प्रवासी आणि चालक वाहकासह एकूण सर्व 41 जण सुखरूप बचावले आहेत.तर आयशर च्या कॅबिन मध्ये अडकून आयशर चालक जखमी झाला आहे.पांडुरंग मोहन पाटील असे अपघातातील जखमी ट्रकचालकाचे नाव आहे.

पुण्यात घरे महागणार

रेडीरेकनर मध्ये पुण्यात 4.16 तर पिंपरी चिंचवड मध्ये 6.69 टक्के वाढ

चालू आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनर मध्ये वाढ

रेडीरेकनर दर दोन वर्षांनी वाढल्याने शहरातील घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे

यंदाचा मार्च महिना पुणेकरांसाठी ठरला अधिक तापदायक

वातावरणातील प्रतिकूल घडामोडीमुळे मार्च महिना यंदा अधिक तापदायी ठरला आहे.

संपूर्ण महिना कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदविण्यात आले आहे

शिवाजीनगर केंद्रावर कमाल तापमान 40 आकडा ओलांडला नसला तरी दोन दिवस 39 अंशाच्या पुढे तर पंधरा दिवस हा पारा 38°c च्या पुढे होता.

महिनाभर सरासरी दोन अंशाने तापमान वाढले.

हवामान विभागाने यंदाचा उन्हाळा अधिक तीव्रतांना असल्यास अंदाज फेब्रुवारीच्या अखेरीस वर्तवला होता.

मार्च महिन्यातच पुणेकरांना त्याची प्रचिती आली.मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारा 38 अंशावर पोहोचला तर किमान तापमान सरासरीपेक्षा चार अंशाने अधिक होते.

जिल्ह्यातही उन्हाची तीव्रता वाढली होती. 12 ते 16 मार्च दरम्यान पुणे सह मध्य महाराष्ट्रात तापमानात लक्षणे वाढ नोंदविण्यात आली आहे.

याही वर्षी लोहगाव,कोरेगाव पार्क, चिंचवड,हडपसर भागात उष्णता अधिक जाणवली.शहराचे तुलनेत जास्त

तापमान नोंदविले गेले.महिनाभरात या भागात तीन वेळा पारा 40 अंशाच्या पुढे गेला होता.

गोवा येथील एलईडी नौका मालवण समुद्रात पकडली. मत्स्य विभागाची धडक कारवाई

मालवण समुद्रात अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईटद्वारे मासेमारी करणाऱ्या गोवा येथील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली. ही नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. मत्स्य विभागाचे अधिकारी दांडी मालवण समुद्रात नियमित गस्त घालत होते. यावेळी गोवा राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली बलाका जेजू नामक नौका महाराष्ट्रातील हद्दीत मालवण समुद्रात ११ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईट व्दारे मासेमारी करत असताना दिसून आली. या नौकेवर तांडेलसह ३० खलाशी होते. या नौके वरील मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही सुरु होती. वागटी, सुरमई, बांगडा इत्यादी प्रकारचे मासे नौकेवर होते. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त केले असून ६ ते ७ लाख रुपयांची लाईट, जनरेटर व इतर सामग्री जप्त करण्यात आली आहे.

- नागपूरचे कामठी येथे शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीने कन्हान नदीच्या घाटावर शिव तांडव स्तोत्र पठनाचा कार्यक्रमाचे आयोजन

- या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिनय फुके, यांच्यासह अनेक मान्यवरांनी शिवतांडव स्तोत्र पठन केले.

- यामध्ये कामठी आणि नागपूर परिसरातील 3 हजार पेक्षा अधिक महिला आणि पुरुषांनी शिवतांडव स्तोत्राचे पठण करत शिवमहिमा गायली.

- यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भगवान शिवयाच्या आरधानेतून यशाचा मार्ग सापडतो असे प्रतिपादन हे केले.

यवतमाळचे जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर,कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तलाठ्याचं निलंबन

यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील झुल्लर येथील घाटावर रेती तस्करीचा पर्दाफाश एसडीओ यांनी केला होता त्यानंतर त्यांनी खडकी येथील तलाठ्याने कर्तव्यात कसूर करीत रेती तस्करीला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी विकास मीना यांना अहवाल पाठविला. त्यावर जिल्हाधिकाऱ्याने आदेश काढून तलाठी खडसे याला तडकाफडकी निलंबन केल्याने जिल्हधिकारी अ‍ॅक्शन मोडवर आल्याची चर्चा आहे.

पुणे शहरात बंद वाहनांमुळे वाहतूककोंडी

जानेवारी 2025 मध्ये 184 फेब्रुवारी 2025 मध्ये 118 मार्च 2025 मध्ये 126 अशा एकूण 428 घटना घडल्या आहेत., मार्च महिन्यात सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या घटना झाल्याचे समोर आल आहे.

वाहतूक कोंडीच्या 428 घटनापैकी सर्वाधिक 128 घटना वाहनांची क्षमतेपेक्षा अधिक वर्दळ झाल्याने तर 114 घटना रस्त्यावर वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले.

- "सार्वजनिक जागेवरील कोणतेही प्लॉट्स नियमित करू नका", हायकोर्टाचे नागपूर सुधार प्रन्यासला आदेश

- नागपूर शहरात यापूर्वी सार्वजनिक उपयोगाकरिता आरक्षित जमिनीवरील अनेक अनधिकृत प्लॉटसचे नियमितीकरण झाले आहे

- सार्वजनिक उपयोगाकरिता जागा नसल्यामुळे शहरातील अनेक भागातील नागरिकांचा श्वास गुदमरला आहे

- या संदर्भात स्थानिक पीडित रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती

- त्यावर सुनावणी करत पुढील आदेशापर्यंत अशा प्रकारचे कोणतेही प्लॉट्स नियमित करू नका असे निर्देश हायकोर्टाने नागपूर सुधार प्रन्यासला दिले

- तसेच येत्या 21 एप्रिल पर्यंत या निर्देशाच्या अंमलबजावणीवर प्रतिज्ञापत्र सादर करण्यास हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले आहे

आज नागपूर सत्र न्यायालयात फहिम खान यांच्या जामीन अर्जावरही सुनावणी होणार

- नागपुरातील महाल परिसरात झालेल्या हिंसाचार घटनेतील कथित सूत्रधार फहिम खानला 11 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी

- दिवाणी व सत्र न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करताना पोलिसांना कधीही पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार राखीव ठेवण्यात आली आहे

- विशेष म्हणजे फहिम खान याच्यावर गणेशपेठ, तहसील आणि सायबर पोलीस या तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे..त्यामुळे इतर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात सुद्धा त्याला अटक होऊ शकते.

- कोर्टाच्या आदेशावरून इतर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस कोठडी घेऊ शकतात.

नागपूर दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याची संधी नागपूरच्या 'चहा वाल्याला मिळाली

- नागपूर विमानतळावर नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते

- यावेळी नागपूरचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील 'चहावाला' गोपाळ बावनकुळे हे देखील उपस्थित होते

- देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथ ग्रहण समारोहाचे निमंत्रण गोपाळ बावनकुळे यांना मिळाले होते..

- त्यावेळी 'एका सामान्य चहावाल्या'ला शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याने गोपाळ बावनकुळे प्रकाशझोतात आले होते

- त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानतळावरील आगमन प्रसंगी गोपाळ बावनकुळे हे स्वतः पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होते

- पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेट हा आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असल्याची भावना गोपाळ बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

बांधकाम विभागाकडून २ हजार ६०० कोटी रुपयांचा महसुल गोळा

महापालिकेच्या उत्पन्नाचा कणा समजल्या जाणाऱ्या बांधकाम विभागाने २ हजार ६०० कोटी रुपये, तर मिळकत कर विभागाने २ हजार ३५५ कोटी रुपये इतक्‍या महसुलाची महापालिकेच्या तिजोरीत भर घातली. मिळकतकर विभागाला अंदाजपत्रकानुसार उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठता आले नसले, तरीही मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात मिळकत कर विभागाने १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक महसुल मिळविला आहे.

राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यात मनसे ॲक्शन रोडवर

आज पासून मनसे पुणे शहरातील सर्व आस्थापनांना देणार निवेदन

मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे पुन्हा आग्रही

राज ठाकरे यांनी दिलेला सूचनेनुसार आजपासूनच मनसे मोहीम हातात घेणार असून बँक आणि ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी मराठीचा वापर केले जात आहे का? नाही याची तपासणी करणार आहे. तसेच वेळ पडल्यास खळ-खट्याक देखील करण्यात येणार असल्याचं मनसेतून स्पष्ट करण्यात आला आहे

पुण्यात १ ते ३ एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

IMD ने दिलेल्या सात दिवसीय हवामान अंदाजानुसार, पुण्यात ३१ मार्च रोजी आकाश अंशतः ढगाळ राहील, आणि तापमान २१° सेल्सिअस ते ३७° सेल्सिअस दरम्यान राहील. विशेषत: १ ते ३ एप्रिल दरम्यान वादळ आणि पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात उष्णतेपासून आराम मिळू शकतो. या कालावधीनंतर, आकाश पुन्हा निरभ्र होईल आणि तापमान ३७° सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहील

डोणजेतील योगेश भामेवर टोळीवर ‘मकोका’ कारवाई

दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून खून प्रकरणात डोणजे येथील योगेश ऊर्फ बाबू भामे आणि त्याच्या टोळीतील सराईत गुन्हेगारांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मकोका कायद्यान्वये कारवाई केली.

पुण्यात ज्येष्ठ महिलेला ‘डिजिटल कैदेत’ ठेवून अडीच कोटींना लुटले

डेक्कन परिसरातील एका ६० वर्षीय महिलेला ‘तुमच्या बँक खात्याचा वापर एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झाला आहे. तुमच्या मुलाचंही नाव त्यात आहे. तुमच्यावर अटक वॉरंट निघू शकते...’ सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेस महिनाभर ‘डिजिटल अरेस्ट’ करून तब्बल दोन कोटी ५७ लाख ५५ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले.

कोथरूडमध्ये ज्येष्ठ महिलेचा संशयास्पद मृत्यू

कोथरूड परिसरातील एका सोसायटीत ७६ वर्षीय ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत मृत आढळली. त्यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याचा संशय कोथरूड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ

पुणे विमानतळावरून दिवसाला 30 हजारांपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास

पुणे शहरातून दिल्लीसाठी सर्वाधिक उड्डाणे

पुण्यातून दिवसाला साधारण 20 पेक्षा जास्त उड्डाणे दिल्लीला

पुण्यातून सध्या साधारण 36 शहरांसाठी विमान सेवा सुरू आहे

पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून असल्याच प्रशासनाचे स्पष्टीकरण

लाखो भाविकांच्या उपस्थितीत नागेवाडीत पार पडला बगाड पळवण्याचा सोहळा 

सांगलीच्या विटा येथील नागेवाडी मध्ये बगाड पळवण्याच्या सोहळा उत्साहात पार पडला आहे.नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्ताने बगाड पळवण्याची ऐतिहासिक परंपरा आहे,सुमारे अडीचशे वर्षांहून अधिक काळापासून नागेवाडी येथे नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्ताने नवस फेडण्यासाठी बगाड पळवलेले जातात,मानाचे सात बगाड या निमित्ताने धावत असतात,लाकडी चाकांपासून बनलेल्या बगाडांना नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण बांधलं जातं,त्यानंतर बगडाकडून नागनाथ मंदीराला प्रदक्षिणा घातल्यानंतर नवस पूर्ण होतो,अशी आख्यायिका आहे.यंदाही गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात नागेवाडी मध्ये नागनाथाच्या नावाने चांगभलंच्या गजरात बगाड पळवण्याचा सोहळा पार पडला,या निमित्ताने अडीचशेहुन बैल जोड्या देखील बगाड सोहळ्यासाठी दाखल झाल्या होत्या,तर यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविकांनी नागेवाडी मध्ये हजेरी लावली होती.

nashik-malegaon-पंचवीस लाखाची लूट करणारे पाच आरोपी पकडले

नाशिकच्या मालेगाव येथील टेहरे चौफुली येथे सहा दिवसा पुर्वी व्यापारी मनोज मुथ्था यांची कार आडवत त्यांच्या गाडीची मागिल काच कोयत्याने फोडत २५ लाख रुपयांची लूट केल्याची घटना घडली होती.जिल्हा ग्रामिण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथकाच्या शाखेने तपास करत पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्या कडून लूटीतील सात लाख वीस हजाराची रोख रकमेसह आयफोन,गुन्ह्यात वापरलेली वाहने अशा सव्वा अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय.पकडण्यात आलेले पाच ही जण हे सराईत गुन्हेगार असल्याच पोलिसांनी सांगितल आहे.

पंढरपूरजवळ एसटी बस ट्रक चा भीषण अपघात

पंढरपूर आळंदी पालखी महामार्गावर पंढरपूर जवळच्या बोंडले गावाजवळ आज सकाळी एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील महिला‌ वाहक गंभीर‌ जखमी झाली असून उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले आहे.

अकलूज आगाराची एसटी बस दसूर गावाकडे निघाली असता संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून येणार्या ट्रकची जोरदार धडक बसली.

बसमधील इतर प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती आहे.

JUNNAR-शेततळ्याच्या पाण्यात पडलेल्या कोल्ह्याला जीवदान

जुन्नर तालुक्यातील कुसुर येथे पाण्याच्या शोधात भटकंती करणारा जंगली कोल्हा बंदिस्त शेततळ्यातील पाण्यात पडल्याची घटना घडली

यावेळी कोल्ह्याच्या बचावासाठी तातडीने कुठलेही साहित्य उपलब्ध नसताना वनरक्षक रमेश खरमाळे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून प्लास्टिक कॅरेट आणि रस्सीच्या जुगाडाने कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढले. १८० बाय १८० फूट आकाराच्या तळ्यातून प्राणी वाचवण्यासाठी स्थानिक धनंजय ढोमसे आणि गणेश जाधव यांनीही मोलाची मदत केली जंगल परिसरात उन्हाळ्यात पशुपक्ष्यांची पाण्यासाठी धडपड सुरु असते त्यामुळे जंगली प्राण्यांसह पक्षांच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी केले आहे.

उल्हासनगरात जीन्स कारखान्यांना भीषण आग

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील तानाजी नगर परिसरात जीन्स कारखान्यांना सोमवारी रात्री उशिरा मोठी आग लागली. या कारखान्यांमध्ये जीन्स कापड मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केलं. तानाजी नगर भागात अनेक दुकानं, जीन्स कारखाने. त्यामुळे आगीची तीव्रता वाढली. उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवलं.

शेतकर्यांना कर्ज माफी देणे शक्य नाही; क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांचा अजित पवारांच्या सुरातसुर

राज्यात कर्ज माफीचा वाद पेटलेला असतानाच राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी राज्यातील शेतकर्यांना सध्या तरी कर्ज माफी देणे शक्य नसल्याचे विधान करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरातसूर मिसळला आहे. मंत्री भरणे यांच्या विधानानंतर शेतकर्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कर्ज माफी वरुन पुन्हा एकदा सरकार विरुध्द शेतकरी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे सरकार आर्थिक ताण आला आहे. त्यामुळे सध्या तरी शेतकर्यांना कर्ज माफी देता येणार‌ नाही. या संदर्भात अजित पवारांसह इतर नेत्यांनी या संदर्भात वक्तव्य केल्याचे भरणे यांनी सांगितले.

स्टायलिश यामाहा गाडी चोरणारा चोर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिष्ठा आणि स्टाईल म्हणून फिरवली जाणारी यामा मोटरसायकलीचे उत्पादन बंद झाले आहे. त्यामुळे जुन्या गाड्या मॉडीफाय करून शहरातून रुबाबात फिरणारी मंडळी दिसून येतात. याच गाड्यांना लक्ष करत तब्बल 12 दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्यास सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सात लाखाच्या बारा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आष्टा परिसरात सापळा रचून संकेत ढगे असे चोरट्याचे जेरबंद केले आहे. संकेत हा मंगळवेढा तालुक्यातील आहेत. यामाहा फॅन चोरट्याला सापळा रचून अटक केली आहे.. यामाहा फॅन चोरट्याने डझनभर R X 100 च्या तब्बल 12 यामाहा गाडी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. तीन गाड्या आष्टा येथे आपल्या मित्राच्या घरी आणि इतर मंगळवेढा येथे दडवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्याच्याकडून सात लाख वीस हजार रुपयांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. या निमित्ताने विशिष्ट प्रकारच्या गाड्या चोरणारा चोरटा सापडला आहे.

अंबरनाथ पालिकेची चालू वर्षात तब्बल ९७ टक्के कर वसुली

अंबरनाथ पालिकेनं सरत्या वर्षात मालमत्ता कराची तब्बल ९७ टक्के वसुली केली आहे. तर मागील थकबाकीपैकी ५० टक्के वसुली करण्यात आली आहे. यासाठी कर अधिकारी नरेंद्र संख्ये यांच्या नेतृत्वाखाली मागील ३ महिने शनिवार आणि रविवारीही अविरतपणे कर विभागाचे कर्मचारी काम करत होते.

एक लाखाचे ५ लाख करून देतो! उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकाची फसवणूक

कल्याणच्या बेतुरकर पाडा भागात राहणाऱ्या रिक्षाचालक योगेश चव्हाण यांना त्यांचा मित्र गोलू याने पाच पट पैसे करून देणाऱ्या मित्रांशी ओळख करून देत उल्हासनगर कॅम्प ४ मधील CNG पंपाजवळ दिवसांपूर्वी बोलावलं तिथे आलेल्या दोन जणांनी योगेश यांचे १ लाख रुपये घेतले, तर नंतर आलेल्या दोघांनी पोलीस असल्याचा बनाव करीत तुम्ही दोघे इकडे वॉन्टेडमध्ये फिरता का? असं म्हणत १ लाख रूपयांची पिशवी घेऊन त्यांना पकडून नेल्याचा बनाव केला. दुसऱ्या दिवशी योगेश यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या समांतर तपासात उल्हासनगर गुन्हे शाखेने सापळा रचून गोलू उर्फ नरेश गायकवाड, गणेश दुर्गे , प्रशांत शेट्ये, वीरेंद्र वाल्मिकी आणि गौतम सोनी यांना ताब्यात घेत त्यांच्या कडून १३ हजार ५०० रुपये हस्तगत केले असून या ठगांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात सहा लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी

यवतमाळ जिल्ह्यात केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीत नाफेड आणि प्रशासनाद्वारे जिल्ह्यात तब्बल सहा लाख 5 हजार 660 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. ही खरेदी जिल्ह्यातील 23 केंद्रांवर करण्यात आली असून सरकारच्या नियमांना बगल देऊन मोठ्या प्रमाणावर निष्कृष्ट दर्जाचे सोयाबीन खरेदी करण्यात आली, व्यापाऱ्यांनी बाजारातून तीन हजार चारशे दराने खरेदी केलेली सोयाबीन हमीभावानुसार चार हजार 892 सरकारला विक्री केल्याचा आरोप केल्या जात असून गैरव्यवहार प्रकरणी पुनर्मूल्यांकणाची मागणी केली जातेय.

Washim :  वाशिम नगरपालिकेची पहिल्यांदा उच्चांकी कर वसुली

वाशिम नगरपालिकेने पहिल्यांदा उच्चांकी कर वसुलीचे उद्दिष्ट पार केल असून,१३ कोटी १० लाख रुपये कर वसुली झालीये. दरवर्षी 9 कोटी रुपयांपर्यंत कर वसुली होत होती. यंदा मागील दोन महिन्यापासून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठी मोहीम राबवत रस्त्यावर उतरून कर वसुलीसाठी मोठे प्रयत्न केले. त्याच फलित कर वसुलीतून समोर आलय. वाशिम नगर पालिकेचे 15 कोटी रुपयांचे यंदाच उद्दिष्ट असताना मार्च अखेरीस 13 कोटी 10 लाख रुपये कर वसुली झाली आहे. यात प्रामुख्याने पाणी कराचे दोन कोटी रुपये सुद्धा जमा झाले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनथ शिंदे गुरूवारी यवतमाळमध्ये

विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढविली होती.त्यामुळे जनादेश देणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण राज्यात आभार सभा घेत असून येत्या तीन तारखेला रोज गुरुवारला यवतमाळच्या पोस्टल ग्राउंड वर आभार सभा घेणार असल्याची माहिती यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.

Maharashtra News Live Updates: जळगावत अवकाळी पावसाचा बळी

जळगाव तालुक्यातील धानवड परिसरामध्ये विजांच्या कडकडाटात

आजोबावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

या घटनेनंतर नागरिकांनी अंकुश राठोड व आजोबा शिवाजी राठोड या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वीच अंकुशचा मृत्यू झाला होता तर गंभीर शिवाजी राठोड यांच्यावर उपचार सुरू आहेl. या घटनेनंतर कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत

"फडणवीस म्हणतात सातबारा कोरा , अजित पवार म्हणतात पैसे भरा...."

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेसमोर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलन केलं. विधानसभा निवडणुकांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की ,शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कर्ज माफ करून कोरा करू... तर काल-परवा अजित पवार म्हणतात 31 तारखेपर्यंत कर्ज भरा..! सरकारमधीलच दोन नेते परस्पर विरोधी विधान करत असल्यामुळे सामान्य शेतकरी हा द्विधा मनस्थितीत असल्यामुळे आम्ही एक कर्ज भरणार नाही... आणि जोपर्यंत आमचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत आम्ही पैसेही भरणार नाही.... अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत चिखली येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.

रायगडातील धरणांनाही उन्‍हाच्‍या झळा

उन्‍हाच्‍या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्‍या आहेत. त्‍याचा परीणाम धरणांतील पाणीसाठ्यावर होता दिसतो आहे. पाटबंधारे विभागाच्‍या अखत्‍यारीत येणारया रायगड जिल्‍ह्यातील धरणांतील पाणीसाठा चिंताजनक आहे. 28 धरणांमध्‍ये 43.99 टक्‍के इतकाच पाणीसाठा असल्‍याची माहिती समोर आली आहे. मार्चअखेरीस ही स्थिती असेल तर या पाण्‍यावर पुढील अडीच महिने कसे काढायचे असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 16 धरणक्षेत्रात 50 टक्के पेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. पेणच्‍या आंबेघर धरणात सर्वात जास्त म्‍हणजे 78 टक्के तर श्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरण क्षेत्रात सर्वात कमी 12 टक्के इतकाच पाणीसाठा आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्‍त पाऊस होवूनदेखील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्‍याचे दिसून येत आहे.

Nanded : शिवसेनेच्या वतीने नांदेड शहरातील वाटसरुंसाठी थंड पानपोईची सुविधा उपलब्ध

नांदेड जिल्ह्यात तापमाणात झपाट्याने वाढ होत आहे. अशा वाढत्या तापमाणात थंड पेय आणि पाण्याला मागणी वाढलीय.दरम्यान नांदेड शहरातील वाटसरूंची तहान भागविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने थंड पानपोईची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पाणपोईचे उद्घाटन मुख्य ग्रंथी बाबा कश्मीरसिंघजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. मागील 13 वर्षापासून नांदेड शहरातील वाटसरूंसाठी थंड पाण्याची सुविधा शिवसेनेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Nanded : माहूरगडावर भाविकांची श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

नांदेडच्या माहुर गडावर चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घटस्थापना करून माहूरगडावर नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान माहूरगडावर श्री रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. माहूरची श्री रेणुका माता साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असल्याने देशभरातील भक्तांची श्री रेणुका माता ही कुलदैवत आहे. राज्यासह देशभरातून माहूरच्या रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक सध्या माहूर गडावर दाखल होत आहे. या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दरम्यान माहूरगडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलं आहे. भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी श्री रेणुका माता मंदिर संस्थांच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Akola : 15 वर्षीय विद्यार्थ्याला कॉलराची लागण

अकोल्यातल्या कासमपूर गावात 15 वर्षीय विद्यार्थ्याला कॉलराची लागण झालीए.. तर आठ जणांना कॉलराची लक्षण आहेत.. कॉलराची लागण झालेल्या विद्यार्थ्यावर अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेये. या गावात आरोग्य विभागाकडून 250 घरांची तपासणी करण्यात आली आहे.. दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे कॉलरचा उद्रेक या परिसरात दिसून येतोय.. अकोला जिल्ह्यातील अकोला तालुक्याल्या कासमपुर (पळसो) गावात कॉलराची साथ पसरली आहेय.. या अनुषंगाने अकोला जिल्हा आणि तालुका पथकाने त्याठिकाणी जात तपासणी केली. या दरम्यान, गावातील 15 वर्षीय विद्यार्थ्याला कॉलरा झाल्याचे चाचणीत समोर आले.. दरम्यान, कॉलरा उद्रेक जाहीर करताचं गावाकऱ्यांमध्ये गावात भीतीच वातावरण पसरलाय. कासमपुर (पळसो) येथे 30 मार्चपासून कॉलरा उद्रेक जाहीर करण्यात आलाये. आरोग्य पथकाकडून गावातील तब्बल 205 घरांची तपासणी करण्यात आली आहे.. ताप, मळमळ, पोटदुखी, हगवण, डोकेदुखी यासह इतर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 8 वर आहे. या सर्वांवर पळसो येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि खाजगी रूग्णालयात उपचार होत आहेत.

Chiplun : कोंडमळा गावाला भीषण पाणी टंचाई

वाढता उष्मामुळे चिपळूणमध्ये कोंडमळा गावाला पाणी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. गावातील विहीरींनी तळ गाठलाय.त्यामुळे पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागतेय.वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली.जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये वाढ होताना पहायला मिळतेय. जिल्ह्यातील ९१ गावांमधील २२८ वाड्यांतील ५६ हजार ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

Akola : दोन ट्रकची समोरासमोर धडक, दोघेजण गंभीर 

अकोल्यातल्या अकोट अकोला मार्गावर मध्य रात्रीनंतर उशिरा 2 वाहनांचा मोठा अपघात झाला आहे.. अकोट अकोला रस्त्यावरील मुडगांव फाट्याजवळ दोन ट्रकचा हा भीषण अपघात झालाय.. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झालेत.. दोन्ही ट्रक मध्ये समोर समोर झाल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजते. सद्यस्थितीत जखमी व्यक्तींवर शासकीय रुग्णालयात उच्चार सुरू आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराळा झालाय. त्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठं नुकसान झालं असून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com