Assembly Election: कोणालाच तिकीट देऊ नका,तिघेही अपक्ष लढू; उमेदवारीवरून सुरेश धस यांची अजब विनंती

Suresh Dhas : विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून सामोरे जा, अशा सुचना भाजप नेते अमित शहा यांनी दिल्यानंतरही नेत्यांमधील हेवेदाव्यामुळे वाद समोर येत असल्याने महायुतीचं टेन्शन वाढलंय. एकाच जागेसाठी दोन-दोन उमेदवार इच्छुक असल्याने महायुतीत वाद चव्हाट्यावर येत आहे.
Assembly Election: कोणालाच तिकीट देऊ नका, तिघेही अपक्ष लढू; उमेदवारीवरून सुरेश धस यांची अजब विनंती
Assembly Election
Published On

विनोद जिरे, साम प्रतिनिधी

बीडमधील आष्टी मतदार संघातील एका जागेसाठी तीन उमेदवार इच्छुक असल्याने महायुतीसमोर वेगळाच पेच निर्माण झालाय. या पेचातून बाहेर पडण्यासाठी भाजप नेते सुरेश धस यांनी वेगळाच पर्याय पक्षासमोर ठेवलाय. महायुतीमधून तिन्ही उमेदवारांपैकी कोणालाच तिकीट न देता तिघांना अपक्ष लढण्याची परवानगी द्यावी, असा पर्याय धस यांनी दिलाय.

विधानसभेत सुरेश धस यांना उमेदवारी मिळत नसल्यानं नाराज झालेल्या कार्यकर्ते नाराज झालेत. धस यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्ते करत आहेत. त्यावेळी नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढतांना हा वेगळा पर्याय दिलाय.

महायुतीतील पक्षांनी आपआपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारांची नावे जाहीर करताच महायुतीत नाराजीचा सुरू उठू लागलाय. आपल्याला मिळणारी जागा मित्र पक्षातील उमेदवाराला गेल्याने नेत्यांची नाराजी उफाळून आलीय. तर काही ठिकाणी महत्त्वकांक्षी उमेदवारांनी पक्षात बंड करत अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. तर काहींनी थेट पक्षांत्तर करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उमेदवारीची संधी मिळाली नसल्यांपैकी एक असलेल्या सुरेश धस यांनी तर इच्छुक उमेदवारांना थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचा अगळा-वेगळा पर्याय पक्षासमोर ठेवलाय.

महायुतीच्या नेत्यांना माझी विनंती आहे तिकीट कोणालाच देवू नका, आम्ही तिघे उमेदवारीसाठी इच्छुक आहोत. तेव्हा तिघांना अपक्ष उभा करा, जे होईल ते पाहू. असं भाजपचे माजी मंत्री सुरेश धस यांनी जाहीर भाषणातून वक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे बीडमध्ये निवडणूक लढवायचे म्हटलं की, अंगावर काटा येतोय, असं देखील सुरेश धस म्हणाले आहेत. त्याचबरोबर उमेदवारीवरून पेच निर्माण झाल्याने धस समर्थक आक्रमक झाले आहेत.

तुम्ही निवडणूक लढवाच, असा आग्रह धरला जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आष्टी येथील निवासस्थानाच्या समोर घोषणाबाजी केलीय. तर यावेळी सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढताना असं वक्तव्य केलंय.

कोणालाच कोणाचा राग नको,रणिंगच पाहिजे, आम्ही तिघे एकाच महायूतीचे आहोत. तेव्हा आसा निर्णय पक्षांनी घ्यावा महायुतीचे सरकार याव, यासाठी आम्हा तिन्ही ईच्छूक उमेदवारांना कोणतच पक्षाच तिकीट देऊ नका व उपक्ष उभे करा, ज्याचं जास्त वजन आहे, तो निवडून येईल व ह्या जागेचा पेच सोडवावा अशी माझी विनंती आहे. आस मत भाजपाचे नेते माजी आमदार सुरेश धस यांनी कार्यकर्त्यां व्यक्त केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com