Maharashtra Exit Poll : परांडाचे संभाव्य आमदार तानाजी सावंत? पाहा Exit Poll

Saam Exit Poll : परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांना एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मतदारांचा कौल मिळण्याची शक्यता आहे.
Paranda Assembly
Paranda AssemblySaamTv
Published On

परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मतदारांची पसंती मिळण्याची शक्यता आहे. सकाळच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार या ठिकाणी संभाव्य आमदार म्हणून तानाजी सावंत यांना मतदारांची पसंती मिळताना दिसत आहे.

परांड्यात शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत रंगली आहे. शरद पवार यांच्या गटकडून याठिकाणी राहुल मोटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. परांडा मतदारसंघात तानाजी सावंत यांचा जनसंपर्क चांगला आहे. पालकमंत्री असल्याने त्यांनी केलेल्या विकास कामामुळे देखील त्यांना मतदारांकडून पसंती मिळत आहे.

Paranda Assembly
Exit Poll Maharashtra : अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी पुन्हा आमदार? पाहा एक्झिट पोल

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तानाजी सावंत यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रचार दौरे करत मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोटे हे तीन वेळा अंदर राहिले आहेत. मात्र 2019 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यांना यावेळी उमेदवारी मिळाली असली तरी त्यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत तिढा निर्माण झाला होता.

Paranda Assembly
Exit Poll Maharashtra : हिंगोलीतून तानाजी मुटकुळे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

मविआमध्ये शरद पवार यांच्या पक्षाबरोबरच शिवसेना ठाकरे गट देखील ही जागा लढवण्यास आग्रही होती. ठाकरे गटाकडून रणजित पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. शेवटच्या दिवसापर्यंत हा तिढा कायम राहिला, त्यामुळे याचा फटका याठिकाणी आता महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

Paranda Assembly
Maharashtra Exit Poll: चाळीसगावचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com