Vidhan Sabha Election : नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात कोण मारणार बाजी? रत्नागिरीतील 5 मतदारसंघाचा सविस्तर आढावा...

Ratnagiri District Vidhan Sabha Constituency Review : कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची इथे मोठ्या प्रमाणात ताकद होती. मात्र, बालेकिल्ल्यात आता भाजपने आपला शिरकाव केला आहे.
नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात कोण मारणार बाजी? रत्नागिरीतील 5 मतदारसंघाचा सविस्तर आढावा...
Narayan Rane vs Uddhav ThackeraySaam TV
Published On

अमोल कलये, साम टीव्ही रत्नागिरी

कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची इथे मोठ्या प्रमाणात ताकद होती. मात्र, बालेकिल्ल्यात आता भाजपने आपला शिरकाव केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला या मतदारसंघात मोठे यश मिळालं असून नारायण राणे मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. लोकसभेत सिंधुदुर्गमध्ये भाजपला लीड मिळालं. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाने आघाडी घेतली. आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल देखील वाजलं आहे.

त्यामुळे सर्व पक्षांनी या मतदारसंघांमध्ये आपली कंबर कसली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे आणि ठाकरे गटाची सारखीच ताकद आहे. कारण, दोन्ही पक्षाचे इथे प्रत्येकी 2 आमदार आहेत. याशिवाय एक आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आहे.

नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात कोण मारणार बाजी? रत्नागिरीतील 5 मतदारसंघाचा सविस्तर आढावा...
Vidhan Sabha Election : सिल्लोडमधून अब्दुल सत्तारांचा गेम होणार? सुरेश बनकर यांना अदृश्य शक्तीचं बळ

रत्नागिरीचा इतिहास पाहता शिवसेनेने इथे आपलं प्राबल्य ठेवले आहे. मात्र शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर त्याचा परिणाम जिल्ह्यातल्या मतदारसंघावरती पाहायला मिळत आहे. अनेक मतदारांनी शिवसेनेला नाकारलं असून भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत इथे भाजपची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, लोकसभेत मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेतही रत्नागिरीतील दोन मतदारसंघावरती भाजपने आपला दावा ठोकला आहे.

रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघ

भाजपने संगमेश्वर मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे. या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे वर्चस्व आहे. उदय सामंत हे मतदारसंघातून चार वेळा निवडून आले आहेत. सामंतांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून या मतदारसंघात तगडा उमेदवार दिला जाणार आहे. या मतदारसंघातून भास्कर जाधव,राजन साळवी, उदय बने, प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांची नावं चर्चेत आहेत. तर भाजपने देखील या मतदारसंघावर दावा ठोकल्याने माजी आमदार बाळ माने यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

लांजा राजापूर मतदारसंघ

लांजा राजापूर मतदारसंघांमध्ये सध्याचे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी आहेत. राजन साळवी या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. पक्ष फुटीनंतर राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. शिवसेना गटात घेण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची एकनिष्ठ राहणे पसंत केलं.

राजन साळवी यांची उमेदवारी सध्या अडचणीत असल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळतेय. या मतदारसंघावरती काँग्रेसचे अविनाश लाड यांनी देखील दावा केला आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये राजन साळवी यांच्याविरोधात अविनाश लाड यांनी निवडणूक लढवली होती. राजन साळवी यांना काटे की टक्कर या निवडणुकीत दिली होती. आता महाविकास आघाडी झाल्याने मोठी अडचण या मतदारसंघांमध्ये निर्माण झाली आहे. अविनाश लाड देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यानं हा मतदार कुणाला मिळणार हे पहावं लागेल.

त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटातून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुकी जोरदार आणि चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मतदारसंघात कुणबी फॅक्टर हा मोठा असल्याने कुणबी वोट बँक कोणाच्या पारड्यामध्ये पडेल, त्या उमेदवाराच्या विजय हा जवळपास निश्चित मानला जातो. त्यामुळे कुणबी मतदार कोणाला कौल देणार हे पहावं लागेल.

चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ

चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार शेखर निकम आहेत. शिखर निकम हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आले आहेत. शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांचा त्यांनी पराभव केला होता.राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांच्या सोबत गेले. शेखर निकम यांची या मतदारसंघावरती चांगली पकड आहे. 2019 च्या निवडणुकीमध्ये शेखर निकम यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती.

त्यांनी शिवसेनेचे सदानंद कदम यांना धूळ चारली होती. शेखर निकम यांचा मतदार संघात चांगला संपर्क आहे. मात्र या मतदारसंघावरती आता शिंदे गटाने देखील दावा केला आहे. यामध्ये मतदारसंघातून पूर्वी विरोधात लढलेले आता युतीत आहेत ते म्हणजे सदानंद चव्हाण देखील इच्छुक आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या पारड्यात पडेल हे पहावे लागेल. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भास्कर जाधव हे देखील तयारी करत आहेत. त्यामुळे भास्कर जाधव जर या मतदारसंघातून उभे राहिले तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकते.

दापोली विधानसभा मतदारसंघ

दापोली विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळते. विद्यमान आमदार योगेश कदम सध्या या मतदारसंघातील आमदार आहेत. शिवसेना नेते रामदास रामदास कदम यांचे ते पुत्र आहेत. शिवसेना फुटीनंतर या जिल्ह्यातून योगेश कदम हे पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाला आणि शिवसेनेने राष्ट्रवादीला मदत करून या मतदारसंघात योगेश कदम यांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला होता.

कदम यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात आलेले माजी आमदार संजय कदम हे निवडणूक लढवण्याची तयारी आहेत. या मतदारसंघात शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद , राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट इच्छुक उमेदवार यांच्यामुळे योगेश कदम यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना नेते रामदास कदम आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी यांच्या दुरावा या ठिकाणी पाहायला मिळतो. यामुळे योगेश कदम यांना मतदारसंघात अंतर्गत स्पर्धा निर्माण झाली आहे.

नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात कोण मारणार बाजी? रत्नागिरीतील 5 मतदारसंघाचा सविस्तर आढावा...
Maharashtra Politics : विधानसभेत भाजपला मोठा फटका बसणार? 105 पैकी तब्बल 'इतक्या' जागा धोक्यात, आमदार धास्तावले

गुहागर विधानसभा मतदारसंघ

गुहागर हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे, या मतदारसंघात या पक्षाचे आमदार भास्कर जाधव हे आहेत आणि या मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव विक्रांत जाधव प्रमोट केलं जाणार आहे. कदाचित या मतदारसंघातून विक्रम जाधव यांना उमेदवारी मिळू शकते तर या मतदारसंघावरती भाजपने देखील दावा केलेला आहे. त्यामुळे विनय नातू यांना महायुतीकडून उमेदवारी मिळू शकते.

कोकणातील संभाव्य उमेदवार कोणते ?

रत्नागिरी विधानसभा मतदार संघ

उदय सामंत ( शिवसेना) , उदय बने ( उबाठा) , प्रदीप ( बंड्या ) साळवी (उबाठा) , सुदर्शन तोडणकर , बाळ माने ( भाजपा)

गुहागर विधानसभा मतदारसंघ

सहदेव बेटकर (अपक्ष), विक्रांत जाधव (उबाठा) , विनय नातू ( भाजपा)

दापोली - मंडणगड विधानसभा मतदारसंघ

योगेश कदम ( शिवसेना), संजय कदम ( उबाठा)

लांजा - राजापूर विधानसभा मतदारसंघ

राजन साळवी ( उबाठा), अविनाश लाड ( काँग्रेस ), किरण सामंत ( शिवसेना ) , यशवंत हरीयाण ( अपक्ष)

चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ

शेखर निकम ( राष्ट्रवादी) , सदानंद चव्हाण ( शिवसेना) , भास्कर जाधव ( उबाठा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com