Maharashtra Election : माझ्या मागून आलेले मंत्री झाले, अजून किती दाढी पिकवायची? निलेश राणेंची खदखद!

Maharashtra Election : निलेश राणे यांनी आपल्या मनातील खदखद जाहीर सभेत बोलून दाखवली. त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election : मी अजून किती दाढी पिकवायची? माझ्या मागून आलेले अनेकजण मंत्री झाले. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, अमित देशमुख, विश्वजीत कदम हे सर्व माझ्यानंतर आमदार-खासदार होऊन मंत्री झाले. असं सांगत निलेश राणेंनी मंत्री होण्याची इच्छा मालवण येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलून दाखवली.

मला कुडाळ मालवणमधील लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी, असही निलेश राणे यांनी म्हटलं आहे. जिथे राणे साहेबांचा (नारायण राणे) पराभव झाला तिथेच मला निवडून यायचं आहे, म्हणून कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक लढतोय असंही ते म्हणाले. मालवणमधील सभेत बोलताना निलेश राणेंनी हे वक्तव्य केलंय.

वैभव नाईक यांनी विधिमंडळात एक जरी भाषण केलं असतं तरी मला समाधान वाटल असतं. मी त्यांचं अभिनंदन केलं असतं. वैभव नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी करोड रुपये सभागृहात जाऊन आणले असते तर मी त्यांचा जाहीर सत्कार केला असता, असा टोला निलेश राणेंनी लगावला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com