Maharashtra Election : ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर, भुजबळ यांच्या दाव्याने खळबळ

Chhagan Bhujbal : ईडीपासून मुक्ती मिळावी, त्यामुळे भाजपमध्ये गेल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेय, त्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
Chhagan Bhujbal
छगन भुजबळSaamTV
Published On

Chhagan Bhujbal News : ऐन विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असतानाच छगन भुजबळ यांच्या दाव्याने महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीपासून मुक्तीसाठी भाजपमध्ये गेल्याचं छगन भुजबळ म्हणालेत. ओबीसी असल्याने कारवाई झाल्याचेही भुजबळ यांनी म्हटलेय.राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात हा दावा करण्यात आलाय.

छगन भुजबळ यांनी नेमकं काय म्हटले?

राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असतानाच भुजबळांच्या या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण मिळू शकते. ओबीसी असल्याने माझ्या मागे यंत्रणा लागल्या. ईडीपासून मुक्ती मिळाली, त्यामुळेच भाजपसोबत गेल्याचा आनंद.. असे छगन भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात म्हटलेय.

Chhagan Bhujbal
Maharashtra Election : शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? मुंबईचा आखाडा तापणार, मैदानासाठी ठाकरे गट-मनसेनं दंड थोपटले

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात नोंदवण्यात आला आहे. या पुस्तकातील ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाच्या प्रकरणात राज्यातील राजकारणावर भाष्य करण्यात आले आहे.

अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मी, नवाब मलिक, अनिल देशमुख तुरुंगात गेलो होतो. ईडीपासून सुटका हवी असेल तर भाजपसोबत जावं लागेल, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती. शरद पवारांनाही याबाबत माहिती होती, पण ते अनुकूल नव्हते. त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला,असा दावा पुस्तकात करण्यात आला.

Chhagan Bhujbal
Maharashtra Election : सगळ्या योजना ढापल्या, दिल्लीतला फुसका फटाका येऊन गेला, शिंदेंची राहुल गांधींवर खरमरीत टीका

ओबीसी असल्यानेच कारवाई

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला. कारण ईडीपासून सुटका…त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला… ईडीपासून सुटका म्हणजे माझ्यासाठी तर एक प्रकारे पुनर्जन्मच होता.

ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते, असेही भुजबळ यांनी म्हटलेय.

Chhagan Bhujbal
Price Hike News : लसूण ५००, वाटाणा २५० पार, कांदा ८०, निवडणुकीत दरवाढ, सर्वसामान्यांचे बजेट बिघडले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com