Maharashtra Election : सगळ्या योजना ढापल्या, दिल्लीतला फुसका फटाका येऊन गेला, शिंदेंची राहुल गांधींवर खरमरीत टीका

Eknath Shinde on Rahul Gandhi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका केली. दिल्लीतील एक फुसका फटाका महाराष्ट्रात येऊन गेला. आपल्या सगळ्या योजना त्यांनी ढापल्यात आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam TV
Published On

Maharashtra Assembly elections 2024: दिल्लीतील एक फुसका फटाका महाराष्ट्रात येऊन गेला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे भंडारा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले दिल्लीतील एक फुसका फटाका काल महाराष्ट्रात येऊन गेला आहे. आपले फुसके नाही जोरात फटाक्या आणि कसली तरी पंचसूत्री थापा सुत्री मारून गेला. आपल्या सगळ्या योजना त्यांनी ढापल्यात असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आपण लाडक्या बहि‍णींना दीड हजार रुपये देत होतो,कोल्हापूरच्या सभेमध्ये हे आता दीड हजारावर आपण २१०० वाढवून दिले आहेत. खरं म्हणजे मी म्हणालो होतो, तेव्हा ताकद वाढवाल शक्ती सरकारची वाढवाल आशीर्वाद द्याल तेव्हा हे पैसे वाढत जातील. पैसे तुमच्या हे सर्व सामान्यांच्या आणि म्हणून आम्ही लाडक्या बहि‍णींना ओवाळणी जेव्हा देत होतो, तेव्हा हेच विरोधक म्हणत होते भीक का देत आहे ? लाज देताय का ? विकत घेताय ? आणि या लाडक्या बहि‍णींच्या मुलांच्या तोंडाचा घास पळवण्यासाठी हिरावून घेण्यासाठी हेच विरोधक कोर्टात गेले, याच विरोधकांनी या योजनेला बदनाम केलं कोर्टामध्ये जाऊन, असा टोला शिंदेंनी लगावला.

Eknath Shinde
Maharashtra Weather : उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली, शेकोट्या पेटू लागल्या, वाचा राज्याचा हवामानाचा अंदाज

एकीकडे विरोध करायचा आणि दुसरीकडे आपल्या वचन नामातून या योजना ढापायच्या आणि म्हणायचं आम्ही आता तीन हजार रुपये देतो. पण आम्ही तर माझ्या बहि‍णींच्या खात्यामध्ये ऑलरेडी द्यायला सुरुवात केली. आपलं सरकार पहिले सरकार आहे. खरं म्हणजे आपण जे बोलतो ते करून दाखवतो. माझ्या लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे येणार नाही म्हणून सगळे लोक सांगत होते. परंतु जसे खात्यात पैसे सुरू झाले, तसे विरोधक म्हणू लागले लवकर लवकर काढून घ्या नाहीतर सरकार काढून घेईल. हे देणारं सरकार आहे, असे एकनात शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Maharashtra Election : आमदार झालो तर सगळ्या पोरांची लग्न लावून देतो, पवारांच्या उमेदवाराचं अजब आश्वासन
Eknath Shinde
Assembly Election:निकालानंतर सत्ता समीकरण बदलणार? नवाब मलिकांपाठोपाठ वळसे पाटलांचे संकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com