Gopal Shetty : मुंबईत भाजपला सगळ्यात मोठा धक्का, गोपाळ शेट्टी अपक्ष अर्ज भरणार
Gopal Shetty : मुंबईमध्ये भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. गोपाळ शेट्टी यांची बंडखोरी अटळ आहे. गोपाळ शेट्टी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गोपाळ शेट्टी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण गोपाळ शेट्टी निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ते आज शक्तीपर्दर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती समोर आली आहे.
भाजपला जागावाटपात १५० जागा मिळाल्या. पण अनेक ठिकाणी झालेल्या बंडखोरीमुळे भाजपचे टेन्शन वाढलेय. भाजपकडून बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पण मुंबईमध्ये भाजपला बंडखोरी रोखण्यात अपयश आल्याचे दिसतेय. कारण, मुंबईमध्ये भाजपमध्ये सर्वात मोठी बंडखोरी झाल्यात जमा आहे.
मुंबई भाजपात मोठी बंडखोरी झाली आहे. माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि माजी आमदार अतुल शाह यांच्याकडून बंडखोरी करण्यात आली आहे. गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीमधून तर अतुल शाह मुंबादेवी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार आहेत.
सोमवारी रात्री उशिरा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेट्टी निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ज्येष्ठ नेत्यांची मनधरणी करण्यात मुंबई भाजपला अपयश आल्याचे दिसतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.