Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा नवा डाव? मराठेतरांनाही सोबत घेण्याची रणनीती

Assembly Election : मनोज जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केलीय. त्यातच आता जरांगेंनी निवडणुकीसाठी नवी रणनीती आखलीय.. जरांगेंची ही रणनीती नेमकी काय आहे? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Manoj Jarange Patil: विधानसभेसाठी मनोज जरांगेंचा नवा डाव? मराठेतरांनाही सोबत घेण्याची रणनीती
Manoj Jarange Patil
Published On

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंनी एकाच जातीवर निवडणूक जिंकता येणं शक्य नसल्याचं म्हणत जरांगेंनी सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र करत उमेदवार देणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय.. तर जरांगेंनी राज्यातील 23 पेक्षा जास्त जिल्ह्यांतील इच्छुकांची मुलाखत घेत नवी रणनीती आखलीय. मनोज जरांगेंनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचं स्पष्ट केलंय. त्यासाठी जरांगेंनी तीन टप्प्याची रणनीती आखलीय.. ही रणनीती नेमकी काय आहे? पाहूयात.

जरांगे गेम करणार?

मराठा समाजासह मुस्लीम, दलित व इतर जातींसोबत समन्वयावर भर

प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्याची रणनीती

मराठा आरक्षणाच्या अजेंड्याला समर्थन देणाऱ्यालाच पाठींबा

मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडण्याची रणनीती

मनोज जरांगेंनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर भाजपसह निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले नेते समर्थनासाठी जरांगेंचा उंबरठा झिजवत आहेत. मात्र आता जरांगे मराठा, मुस्लीम, दलित यांच्यासह मायक्रो ओबीसींना एकत्र करून सत्ताधाऱ्यांना धक्का देणार की मतफुटीचं कारण ठरून महाविकास आघाडीचा सत्तेत जाण्याचा मार्ग रोखणार? याकडे लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com