सागर आव्हाड, साम प्रतिनिधी
पुण्यात एका हॉटेल मालकाला एअर बलून लावणं चांगेलच महागात पडले आहे. हॉटेलच्या टेरसवर एअर बलून लावल्यानं आचार संहितेचा भंग झाल्याचा आरोप ठेवत हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अक्षय अरुण पवार असे हॉटेल मालकाचे नाव आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम चालू आहे. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून राज्यात आचारसंहिता लागू झालीय. निवडणुकीच्या काळात काही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी निवडणूक आयोग सर्व निवडणुकीच्या प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून आहे. कुठल्या प्रकारे आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही यावर निवडणूक आयोगाकडून लक्ष ठेवलं जात आहे. यासाठी भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत.
निवडणुकीच्या काळात पैशांचं वाटप मोठ्या प्रमाणात होत असतं त्यामुळे जागोजागी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याच दरम्यान एका हॉटेल मालकाने एअर लावून आचार संहितेचं उल्लंघन केलंय.
त्याच झालं असं, पुण्यातील हडपसर गाडीतळ येथील एका हॉटेलवर एकाने हॉटेलच्या छतावर एअर बलून लावला होता. मात्र या बलूनवर विनापरवाना उमेदवाराचा फोटो होता. याप्रकरणी शेखर अमरदीप कांबळे (वय ३८, रा. गाडीतळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
हॉटेलच्या टेरसवर विना परवाना शिवसेना उमेदवाराच्या नावाचा एअर बलून लावल्यानेत आचारसंहितेचा भंग झाल्यने हॉटेल मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणात युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
फुरसुंगी येथील रॉयल स्टे इन लॉजिंग या लॉजच्या टेरेसवर पुरंदर विधानसभा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांचा शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण असलेला एअर बलून बांधलेला आहे. त्यावरून मालकावर कारवाई करण्यात आलीय. तक्रार आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक एस आर मोरे,व्हिडिओग्राफर एस ए आडाळगे हे तेथे पोहचले. टेरसवर एअर बलून बांधलेला दिसला. लॉजचे मालक अक्षय अरुण पवार असून ते बाहेर असल्याचे तेथील कामगारांनी सांगितले.
एअर बलूनविषयी परवानगी घेतली आहे का? याची चौकशी केल्यावर परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र अजून परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आलं. त्यांनी आचारसंहिता कक्षाकडे चौकशी केल्यावर बलुनला कोणतीही परवानगी दिली नसल्याची माहिती मिळालीय. त्यानंतर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातलेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं अनिवार्य आहे.
सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहितेच्या काळात कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही.
सरकारी वाहन, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करता येत नाही.
कोणत्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते.
कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवरदेखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रकं असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानही घेणं आवश्यक असते. तसेच विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नसते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.