मुंबई : विधानसभेचं बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरु आहे. काही जागांवरील तिढा सुटला असून अद्याप काही ठिकाणी बोलणी सुरु आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत सर्वच पक्षाचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या संभाव्य ३२ उमेदवारांची नावे साम टीव्हीच्या हाती लागली आहे.
शिवसेना ठाकरे गट आगामी विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा लढवण्याची शक्यता आहे. यातील अर्ध्या उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी बहुतांश उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तर काहीजणांना लवकर एबी फॉर्म घेऊन जाण्याचे सुद्धा सांगितले गेले आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात अब्दुल सत्तार यांना धडा शिकवण्यासाठी सुरेश बनकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे.
१) आदित्य ठाकरे - वरळी
२) अजय चौधरी - शिवडी( सुधीर साळवी इच्छुक) पुनर्विचार होणार
३) राजन साळवी - राजापूर
४) वैभव नाईक - कुडाळ
५) नितीन देशमुख- बाळापूर
६) सुनिल राऊत - विक्रोळी
७) सुनिल प्रभू - दिंडोशी
८) भास्कर जाधव - गुहागर
९) रमेश कोरगावंकर - भांडुप पश्चिम
१०) प्रकाश फातर्फेकर - चेंबूर / (अनिल पाटणकर इच्छुक) पुनर्विचार होणार
११) कैलास पाटिल - धाराशिव
१२) संजय पोतनीस - कलिना
१३) उदयसिंह राजपूत - कन्नड
१४) राहुल पाटिल - परभणी
१५) ऋतुजा लटके - अंधेरी पूर्व
१६) वरुण सरदेसाई - वांद्रे पूर्व
१७) स्नेहल जगताप - महाड मतदारसंघ
१८) सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम
१९) अद्वय हिरे - मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
२०) नितीन सावंत - कर्जत मतदारसंघ
२१) अनिल कदम - निफाड
२२) दीपेश म्हात्रे -डोंबिवली
२३) सुभाष भोईर - कल्याण ग्रामीण
२४) मनोहर भोईर - उरण
२५) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
२६) राजू शिंदे - छत्रपती संभाजीनगर पश्चिम
२७) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
२८) कन्नड मतदारसंघ - उदयसिंह राजपूत
२९) सुरेश बनकर - सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ
३०) राजन तेली - सावंतवाडी
३१) दीपक आबा साळुंखे - सांगोला
३२) विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर - दहिसर
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.