Maharashtra Election: महायुतीचा तिढा काही सुटेना; अजित पवार गटाचं घोडं कोणत्या १० जागांवर अडलं?

Maharashtra Election: अजित पवार गटाने तिसरी यादी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीत १० जागांवरून तिढा कायम आहे.
Maharashtra Election: महायुतीचा तिढा काही सुटेना; अजित पवार गटाचं घोडं कोणत्या १० जागांवर अडलं?
hindu
Published On

लोकसभेसारखं जागावाटपाचा फटका विधानसभेत बसू नये यासाठी महायुतीने जागावाटपाचा लवकर निकाली काढला. मात्र अजूनही काही जागांवर महायुतीचा तिढा काय आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीचा तिढा १० जागांवर आहे. हा तिढा सोडवण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत.

Maharashtra Election: महायुतीचा तिढा काही सुटेना; अजित पवार गटाचं घोडं कोणत्या १० जागांवर अडलं?
Ramdas Athawale : आरपीआयला किमान 2-3 जागा द्या, आठवलेंची महायुतीकडे मागणी

विधानसभेसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झालीय. या तिसऱ्या यादीत चार उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलीय. याआधी अजित पवार यांनी दोन याद्यांची घोषणा केली होती. त्यानुसार अजित पवार यांनी आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५० उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. दरम्यान महायुतीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँगेस पक्षाला ६० जागा सुटण्याची शक्यता होती. त्यामुळे अजून दहा जागा सुटणार का? हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान या जागांसंदर्भात सध्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत बैठका सुरू आहेत. आष्टी,बिड,शिवाजी नगर-मानखुर्द या मतदार संघात तिढा कायम,असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तिसऱ्या यादीची घोषणा प्रेदशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली.

तसेच महायुतीत दहा जागांवर चर्चा सुरु असून त्याचा निर्णय दुपारपर्यंत येण्याची शक्यता सुनील तटकरे यांनी व्यक्त केलीय. महत्त्वाचे म्हणजे या यादीत देखील नवाब मलिक यांचे नाव नाहीये. त्यामुळे नवाब मलिक यांना संधी दिली जाणार की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याबाबतही सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. नवाब मलिक हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही भेटत असतो, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये प्रचंड मतभेद

महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये प्रचंड मतभेद असल्याचं समोर आले आहे. मुंबईतल्या ४ - ५ जागा जागी ठाकरे गटाने चर्चा न करताच उमेदवार जाहीर करून उमेदवारी जाहीर करून AB फॅार्म वाटले. महाराष्ट्रातही ७-८ ठिकाणी चर्चा न करता उमेदवार जाहीर करून AB फॅार्म दिले. यामुळे मतभेद निर्माण झालेत. चर्चा न करताच परस्पर उमेदवार दिल्याने काँग्रेस पक्ष श्रेष्ठी नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com