विधानसभा निवडणुकीनिमित्त राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालाय. मविआ आणि महायुतीमध्ये राजकीय युद्ध सुरु असताना नाराजांची संख्या पक्ष नेतृत्वाला डोकेदुखी ठरत आहे. शिस्तीचा पक्ष असलेल्या भाजपलाही बंडखोरीचं ग्रहण लागलंय. अगदी मुंबईपासून ते विदर्भ, मराठवाड्यात बंडाची लागण लागली आहे.
आज उमेदवारी दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यावेळी अनेकांनी तिकिट न मिळाल्यानं अपक्ष अर्ज दाखल केला. या बंडखोरांमध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजे माजी खासदार गोपाळ शेट्टी....बोरीवलीतून संजय उपाध्याय यांना उमेदवारी मिळाल्यानं शेट्टी नाराज होते. लोकसभेलाही तिकीट कापल्यानं नाराज असलेल्या शेट्टी यांनी विधानसभेला अपक्ष अर्ज दाखल केला. ही बंडखोरी भाजपला महागात पडू शकते. राज्यातील काही बंडखोरांची नावं पाहूया.
- बोरीवली - माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला
- मालाड पश्चिम - भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उत्तर भारतीय मोर्चा महामंत्री ब्रिजेश सिंह यांनी देखील पक्षाच्या विरोधात जाऊन मालाड पश्चिममधून उमेदवारी अर्ज दाखल केला
- शिवडी - भाजपने उमेदवार न दिल्याने नाना अंबोले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला
- बीड - भाजप नेते रमेश आडसकर माजलगाव मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला
- आष्टी - भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा आष्टी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल
गेवराई -आमदार लक्ष्मण पवार यांचाही अपक्ष अर्ज दाखल
- बडनेरा - भाजपच्या तुषार भारतीय यांची रवी राणांविरोधात बंडखोरी
- साक्री - मोहन सूर्यवंशी यांनी भाजपमधून बंडखोरी केली आहे
- नांदगाव - भाजपाचे जिल्हा पदाधिकारी पंकज खताळ यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला. अर्ज माघारी घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर आहे. त्यामुळे तोपर्यंत या बंडोबांची मनधरणी करण्यात भाजपच्या श्रेष्ठींना यश येतं का ? हे पाहणं महत्वाचं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.