Maharashtra Election: ५० बंडखोरांमुळे महायुती-मविआ चिंतेत; काहींनी मित्रपक्ष तर काहींनी आपल्याच पक्षाविरोधात थोपटले दंड

Maharashtra Election Rebel: महायुती आणि मविआचं टेन्शन बंडोबांनी वाढवलंय. दोन्ही आघाड्यांमध्ये जवळपास ५० बंडखोर आहेत. यात भाजपमध्ये सर्वाधिक बंडोबा आहेत.
Maharashtra Election: ५० बंडखोरांमुळे  महायुती-मविआ चिंतेत; काहींनी मित्रपक्ष तर काहींनी आपल्याच पक्षाविरोधात थोपटले दंड
Published On

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मविआ आणि महायुतीमध्ये लढत आहे. या दोन्ही आघाड्यांएकमेकांना आव्हान देत आहेत. मात्र दोन्ही आघाड्यांना बंडखोरांनी चिंतेत टाकलंय. महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवारांविरुद्धात दंड थोपटले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीचे सुमारे 50 बंडखोर उमेदवार रिंगणात उतरलेत. बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी सर्व प्रयत्न केले, परंतु या बंडोबांनी एक न ऐकता उमेदवारी कायम ठेवली.

या ५० बंडखोरांमध्ये २६ बंडखोर हे महायुतीतील आहेत. यात सर्वाधिक बंडखोर भाजपचे आहेत. तसेच १८ बंडखोर महाविकास आघाडीमधील आहेत. काही जागा सोडल्या तर राज्यभरात हे बंडखोर अपक्ष म्हणून हे निवडणूक लढवत आहेत. तर काही जागांवर त्यांच्या पक्षाच्या किंवा अधिकृत उमेदवाराचे नुकसान करू शकतात. महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपचे १३ बंडखोर रिंगणात आहेत.

तर शिवसेनेचे १२ बंडखोर आहेत. तर नांदगावमध्ये सेनेच्या आमदाराविरुद्ध राष्ट्रवादीचा एक बंडखोर लढणार आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे ५ बंडखोर ठाकरे गट शिवसेनेचे आहेत. ते शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात उभे आहेत. उद्धव ठाकरे गटाचे २ बंडखोर पवार गटाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहेत. शरद पवार गटाचा एक बंडखोराने ठाकरे गटाविरोधात दंड थोपटले आहेत.

तिकीट नाकारल्यानंतर काही बंडखोरांनी त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध रिंगणात उतरलेत. वर्सोव्यात तिरंगी लढत होत आहे. येथे ठाकरे गटाच्या भारती लवेकर, शिवसेनेचे हारुन खान आणि राजू पेडणेकर यांच्यात लढत रंगणार आहे. काँग्रेसचे ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि ३ बंडखोर आहेत. पंढपूरमध्ये काँग्रेसचे भागीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल सावंत यांच्यात लढत होणार आहे.

Maharashtra Election: ५० बंडखोरांमुळे  महायुती-मविआ चिंतेत; काहींनी मित्रपक्ष तर काहींनी आपल्याच पक्षाविरोधात थोपटले दंड
Maharashtra Election: आचारसंहितेत निवडणूक आयोगाची 'भरारी', महाराष्ट्रात 280 कोटींचा मुद्देमाल पकडला; फक्त 78 कोटी कॅश!

४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांच्या बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी एक तासाचा अल्टिमेटम दिला होता. ज्या बंडखोरांनी माघार घेतली नाही त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असे उद्धव तेव्हा म्हणाले होते. पेण, पनवेल आणि अलिबागमध्ये बंडखोर अर्ज मागे घेतील. तसेच महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देऊ,असेही उद्धव यांनी सांगितले होते. अलिबागमधील उमेदवारानेच मातोश्रीचा आदेश मानला होता.

तर महायुतीमध्ये शिवाजी नगर मानखुर्द या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होत आहे. येथे शिंदे सेनेचे बंडखोर सुरेश पाटील आणि राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्यात लढत आहे. तर अबू आझमी हे तिथे तिसरे उमेदवार आहेत. ते मविआतचे उमेदवार असून ते सपाचे नेते आहेत. अबू आझमी यांच्याविरोधात उभे आहेत.

Maharashtra Election: ५० बंडखोरांमुळे  महायुती-मविआ चिंतेत; काहींनी मित्रपक्ष तर काहींनी आपल्याच पक्षाविरोधात थोपटले दंड
Maharashtra Election: मी शिवसेना चोरताना तुम्ही झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

नाशिकच्या दिंडोरीमध्ये सेनेने बंडखोर उमेदवार धनराज महाले यांना राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात उभे केले आहे. तेच मात्र देवळालीमध्ये घडलं नाही. येथील बंडखोर उमेदवार राजश्री अहिरराव यांनी माघार घेतील. येथे राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे या रिंगणात आहेत. त्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत.

बुधवारी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे वर्सोव्याचे बंडखोर उमेदवार पेडणेकर यांना पक्षातून काढून टाकले. तसेच कल्याण पूर्वेतून भाजपच्या उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून रिंगणात असलेले कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांची शिंदे शिवसेनेने हकालपट्टी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com